Saturday, December 12, 2015

केस /श्रीधर तिळवे -नाईक 

जाळ आणि जंजाळ 
ह्या दरम्यान 
आपल्या जीबिफुल एमबीफूल केसाचं जाळे विन्चरीत 
आपण चाललोय 

टक्कल पडेल 
आणि कनेक्शन तुटेल 
ह्या भयाने 
आपण रोज केस मोजतोय 
आणि विंचरतोय 

आपले केस थेट मेंदूत घुसून 
आता आपणावर हुकुमत गाजवतायत 

हळूहळू ते हृदयापर्यंत घुसतील 
फुफ्फुसापर्यंत पसरतील 
पोटात मूळ धरतील 

एक दिवस असा येयील 
ते थेट आपल्या यो… चो … त घुसतील 
आणि आपल्याच कंगव्याच्या सहाय्याने 
आपली सारी क्रियेटीविटी ताब्यात घेतील 

मग आपणाला Zय़ाटा एवढीही किंमत राहणार नाही 

श्रीधर तिळवे -नाईक 

(क . व्ही . ३ NET SERIES  ह्या काव्यफाईलीतील )







Wednesday, December 9, 2015

तू माझा /श्रीधर तिळवे -नाईक 

कुठूनही सुरवात केली 
तरी मी तुझ्यापाशीच पोहचतो 

तू माझा पूर्णविराम आहेस 

श्रीधर तिळवे नाईक 
 (डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /भक्ती ह्या काव्यफायलीतून )

खरेच आहे मी मूर्ख आहे /श्रीधर तिळवे-नाईक 

खरेच आहे 
मी मूर्ख आहे 

माझ्या गळ्याला त्याचा लळा लागला आहे 

भगवान शिव जगातला सर्वोत्कृष्ट शहाणपणा आहे 
एवढेच मला कळते 

बाकी तुमची वेद पुराणे वेदांत सिद्धांत 
माझ्या बुद्धीच्या आवाक्याबाहेर आहेत  पंडितानो 

मला तर अजून 
शिवलिंगही नीट पकडता येत नाही 

 श्रीधर तिळवे नाईक 

 (डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /भक्ती ह्या काव्यफायलीतून )

मोहन्जोद्डो  /श्रीधर तिळवे -नाईक 

ह्या मोह्न्जोदडोमधून चालताना 
मला फक्त तुझी राख मिळतिये 

तुझी मूर्ती वगैरे असती 
तर तुझ्याविषयी संशय निर्माण झाला असता 

विद्वानांना काय माहीत 
तुझे असली रूप राख आहे 

हा विनाश 
तू भक्तांच्या आत काहीच सोडत नाहीस 
त्याचा पुरावा आहे 

माझेही मोह्न्जोदडो करून टाक 

कविता ही माझ्या सांडपाण्याची व्यवस्था होती 
एवढेच जगाला कळू दे 
श्रीधर तिळवे नाईक 
 (डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /भक्ती ह्या काव्यफायलीतून )