Wednesday, October 28, 2015
Tuesday, October 27, 2015
Monday, October 26, 2015
प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
१५ पंढरपुरात ३ : श्रीकृष्णास
उपमन्यूकडून घेतलास दीक्षा आणि झालास तू दैवी
तुझ्याच नावाने निघावा का नवीन पंथ वैष्णवी
शिवाचा भक्त जर का होतास का पाहिलीस जातपात
कि नव्हते वाटले तुझ्या नावे होतील जात आघात
अवतार होतास का तू जर सगळ्यांचाच अन भगवंत
जात काढून महारथी कर्णाचा कसा करतोस अंत
एकलव्य तर गुरुभ्रमात अंगठा काढून मरून गेला
का नाही बनवलेस कधी अर्जुनाप्रमाणे त्याला चेला
वैश्य शूद्रांना पापयोनी अतिशुद्रांना केले दास
पाशमुक्त करण्याऐवजी निर्माण केलेस समाजपाश
कित्येक शैव मानतात कि गीता आहे शैव ग्रंथ
मला मात्र दिसतो वर्णभेद तिच्यात करताना रवंथ
ब्राह्मण क्षत्रियांची दिसते मला फक्त त्यात भलावण
टिकावे त्यांचे वर्चस्व म्हणून कि तुझे होते भगवंतपण
जो भगवान माणूससुद्धा जातीदृष्टीतून पाहतो
कसा काय त्याला जगात मानसन्मान आदर मिळतो ?
जा बाबा तुझेमाझे नाही एक मानवकुल
तू तर आहेस चालतेबोलते वर्ण व्यवस्थेचे संकुल
माझ्या मनात तुझ्याविषयी संशय आहे वारेमाप
तुझ्यासारखा ईश्वर असेल तर ईश्वराचा नकोच ताप
बस माझ्या आईच्या तू काळजीपुर्वक देव्ह्याऱ्यात
माणुसकीचा मी भक्त आहे माझी भक्ती पुरी भरात
स्वीकारावे तरी प्रॉब्लेम नाकारावे तरी प्रॉब्लेम
तुझ्यावरती वाटत नाही करावासा आता क्लेम
शेवटी आता जो तू आहेस तोच मानावा लागतो खरा
ब्राह्मण्याला बळी पडलास माणूस म्हणून असशील बरा
तुझी श्रीकृष्ण नीती घेवून सारे राजे चालवतात राज्य
तू दह्याची चोरी केलीस ह्यांना काहीच नाही ताज्य
तुला सोळा सहस्त्र नारी शिवाय राधा प्रेयसी विवाहित
लग्नाबाहेरच्या संबंधाना मान्यता द्यायची कृष्णरीत
खोटे नाही पण संदिग्ध बोलणे धूर्तपणा थोडे कपट
सगळेच तुझे अनुयायी कोणी वेळाने कोणी झटपट
कैवल्य प्राप्ती अशी असेल मिळत माझा विश्वास नाही
तुझ्या नावे धर्म निघावा हा योगायोग पचत नाही
तू कदाचित व्यासांचे काल्पनिक charactar असशील
माहित नसेल त्यांनाही तू सर्वांच्या डोक्यात बसशील
असशील सत्य वा काल्पनिक माझा नाहीस तू मार्गदर्शक
मी प्रश्न विचारणारा भक्त आहे मला नाही कुणाचा वचक
महाभारत कर वैष्णव बनव साधन बन वा बन भगवंत
मी लोजीकली चालणारा आहे मी श्रद्धेचा नाही संत
मी तुडवीत चाललो पुराणे माझ्यासमोर भगवान शिव
माफ कर मला तुझ्यावरती जडला नाही माझा जीव
ज्याचा त्याचा choice आहे ज्याचा त्याचा आहे उपाय
शक्तीपासून डावा आणि शिवापासून उजवा पाय
चाललो मी ओमं नमो शिवाय नम : नमवेल तम
शिवामध्ये शिरतांना नाहीसे होतायत तुझे भ्रम
१५ पंढरपुरात ३ : श्रीकृष्णास
उपमन्यूकडून घेतलास दीक्षा आणि झालास तू दैवी
तुझ्याच नावाने निघावा का नवीन पंथ वैष्णवी
शिवाचा भक्त जर का होतास का पाहिलीस जातपात
कि नव्हते वाटले तुझ्या नावे होतील जात आघात
अवतार होतास का तू जर सगळ्यांचाच अन भगवंत
जात काढून महारथी कर्णाचा कसा करतोस अंत
एकलव्य तर गुरुभ्रमात अंगठा काढून मरून गेला
का नाही बनवलेस कधी अर्जुनाप्रमाणे त्याला चेला
वैश्य शूद्रांना पापयोनी अतिशुद्रांना केले दास
पाशमुक्त करण्याऐवजी निर्माण केलेस समाजपाश
कित्येक शैव मानतात कि गीता आहे शैव ग्रंथ
मला मात्र दिसतो वर्णभेद तिच्यात करताना रवंथ
ब्राह्मण क्षत्रियांची दिसते मला फक्त त्यात भलावण
टिकावे त्यांचे वर्चस्व म्हणून कि तुझे होते भगवंतपण
जो भगवान माणूससुद्धा जातीदृष्टीतून पाहतो
कसा काय त्याला जगात मानसन्मान आदर मिळतो ?
जा बाबा तुझेमाझे नाही एक मानवकुल
तू तर आहेस चालतेबोलते वर्ण व्यवस्थेचे संकुल
माझ्या मनात तुझ्याविषयी संशय आहे वारेमाप
तुझ्यासारखा ईश्वर असेल तर ईश्वराचा नकोच ताप
बस माझ्या आईच्या तू काळजीपुर्वक देव्ह्याऱ्यात
माणुसकीचा मी भक्त आहे माझी भक्ती पुरी भरात
स्वीकारावे तरी प्रॉब्लेम नाकारावे तरी प्रॉब्लेम
तुझ्यावरती वाटत नाही करावासा आता क्लेम
शेवटी आता जो तू आहेस तोच मानावा लागतो खरा
ब्राह्मण्याला बळी पडलास माणूस म्हणून असशील बरा
तुझी श्रीकृष्ण नीती घेवून सारे राजे चालवतात राज्य
तू दह्याची चोरी केलीस ह्यांना काहीच नाही ताज्य
तुला सोळा सहस्त्र नारी शिवाय राधा प्रेयसी विवाहित
लग्नाबाहेरच्या संबंधाना मान्यता द्यायची कृष्णरीत
खोटे नाही पण संदिग्ध बोलणे धूर्तपणा थोडे कपट
सगळेच तुझे अनुयायी कोणी वेळाने कोणी झटपट
कैवल्य प्राप्ती अशी असेल मिळत माझा विश्वास नाही
तुझ्या नावे धर्म निघावा हा योगायोग पचत नाही
तू कदाचित व्यासांचे काल्पनिक charactar असशील
माहित नसेल त्यांनाही तू सर्वांच्या डोक्यात बसशील
असशील सत्य वा काल्पनिक माझा नाहीस तू मार्गदर्शक
मी प्रश्न विचारणारा भक्त आहे मला नाही कुणाचा वचक
महाभारत कर वैष्णव बनव साधन बन वा बन भगवंत
मी लोजीकली चालणारा आहे मी श्रद्धेचा नाही संत
मी तुडवीत चाललो पुराणे माझ्यासमोर भगवान शिव
माफ कर मला तुझ्यावरती जडला नाही माझा जीव
ज्याचा त्याचा choice आहे ज्याचा त्याचा आहे उपाय
शक्तीपासून डावा आणि शिवापासून उजवा पाय
चाललो मी ओमं नमो शिवाय नम : नमवेल तम
शिवामध्ये शिरतांना नाहीसे होतायत तुझे भ्रम
श्रीधर तिळवे -नाईक
(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )
Saturday, October 24, 2015
प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
१४ शैव धम्म :अध्यात्म
शैवांचे अध्यात्म सांगतो आहे श्रीधर
तू कान कर उघडा मेंदूस अनबायस कर
पहिली पायरी तिला म्हणतात 'मलीन '
झाला आहेस मळाने अंतर्बाह्य हीन
ज्ञानमळ क्रियामळ भावमळ असोशीमळ
त्यांनीच झाकली आहे कैवल्याची कळ
काढण्यासाठी मळ आहे पायरी दोन
म्हणतात शैव लोक गड्या तिला ''नलीन ''
लीन नको होऊस तू ह्या समाजापुढे
समाजामुळेच अडते अध्यात्माचे घोडे
समाज म्हणेल असत्य करेल तुला मालामाल
तू मात्र जीवनात सत्याची पकड चाल
समाज म्हणेल जगण्यास आवश्यक हिंसा
उपाशी मर पण तू पाळ तत्व अहिंसा
समाज म्हणेल प्राप्तीस कर तू प्रमाद
क्राइम करशील तर होईल तुझा प्रासाद
तू मात्र कायम पाळ मेंदूत अप्रमाद
चंगळीचा चॉइस येईल घालत वाद
समाज म्हणेल तुला सेक्स कर भरपूर
तू मात्र आवश्यक तेव्हाच जाळ कापूर
फास्ट सक्सेससाठी समाज म्हणेल चोरी
तू मात्र श्रमाचीच खा तुझ्या भाकरी
समाज म्हणेल तुला खूप संपत्ती जमव
तू संपत्ती कमव पण अलिप्तता ठेव
मोह मद माया वाढवतात आत मळ
समाज सदा पुरवतो त्या मळास चळ
समाजाच्या चळापुढे होऊ नको तू लीन
मळापासून मुक्त हो हीच पायरी ''नलीन ''
कणाहीनही वाईट आणि अहंकारही वाईट
समतोल साधण्यासाठी कर स्वत : शी फाईट
चांगुलपणाचाही स्वस चढतो माज
म्हणूनच तिसरीचे येते कामकाज
तिसरी पायरी येते नाव तिचे ''शालीन''
चांगुलपणातही तुझ्या वाजो वीणा क्लीन
कणाहीन नको जगू पण असू दे नम्रता
कुणाचीच घृणा नको सर्वांसाठी करुणा चौथी पायरी तू हो कैवल्यकुलीन
आतुन बाहेरून एकदम क्लीन
दररोज करावे शुद्धतम स्नान
काढून टाकावी अंगावरील घाण
सूर्याला करावे पहिले नमन
पाण्याला करावे दुसरे नमन
सूर्यामुळे तुला सर्व काही दिसते
डोळ्याचे तुझ्या पाऊल पुढे पडते
सूर्यामुळेच ढग होतात तैय्यार
त्यांच्यामुळे मिळतो पाऊस अपार
सूर्यामुळे तुझे वाळतात कपडे
अंग राहिले असते नाहीतर नागडे
सूर्यामुळेच वनस्पती जगतात
त्यांच्यावरच सर्व प्राणी तगतात
पाण्यामुळेच तुझी भागते तहान
वनस्पती रोज करतात जलपान
तुझ्या शरीरात सत्तर टक्के पाणी
शरीरात पाडते रक्ताची नाणी
रक्ताच्या इंधनावर देहगाडी चालते
मेंदुची बॉडी रक्तामुळे हालते
वायु पुरवतो तुला ऑक्सिजन
त्यामुळेच सर्व जगतात जन
पृथ्वीमुळे सर्वत्र उगवते अन्न
तिच्यामुळेच तुला आधार दणण
तू तिचा पुत्र वा तू तिची कन्या
तीच आपली आई वा आपली अम्मा
पाचवे नमन कर तू आकाशास
तेच तोलून धरते सर्व अधांतरास
त्याच्यातून लहरी होतात पास
त्याच्यातून शब्दनाद करतात प्रवास
तू जो आहेस तो ह्यांच्यामुळे आहेस
ह्यांच्यामुळे आहे आयुष्याला बेस
कृतज्ञता दाखव आणि कर नमस्कार
कैवल्य कुलीन होण्याचा हाच एक आकार
पांचवी पायरीही महत्वाची आहे
म्हणतात ''तल्लीन '' ती आतून वाहे
मलीन , नलीन , शालीन अन कैवल्यकुलीन
पायऱ्या पूर्ण करून तू हो तल्लीन
आत्तापर्यंत होते सर्व काही बाहेर
देहाच्या आत आता पहायचे चौफेर
नाकाची दोन डोळ्याची दोन कानाची दोन
तोंडाचे एक मलविसर्जनाचे एक एक लिंगाचा कोन
नऊ ही दारे दहावे दार आज्ञाचक्र
दहावे थेट शिवाकडे नऊ मात्र वक्र
नऊच्या नऊ दारे टाक करून बंद
इथून पुढे शोधायचा आतला आनंद
दा र बंद करण्याकरता स्थिर कर आसन
नाकाग्रावर केंद्रीभूत कर देहस्पंदन
सर्वच इंद्रियावर कठोर संयम साध
कुठल्याच गोष्टीस नको बनवू व्यसन वा नाद
प्रत्येक अवयवावर आता हवा संयम
देहावरती हवे तुझे संपूर्ण नियंत्रण
आता सोड अवयव पकड छोटे बिंदू
मन तुझे फोकस कर तूच हो तू स्पंदू
स्पन्दुसोबत थांब मग सिंधुसारखा वहा
त्याचा कर आरसा त्यात ओम पहा
मग एकेका चक्रावर मन कर एकाग्र
पाठीचा कणा बाण कर प्राणाचे बनव अग्र
एकेका चक्रातून प्राण वर पूर्ण खेंच
साधना सोडू नको वाटेत कदाचित लागेल ठेंच
प्राणाशी संपूर्ण होऊन जा तल्लीन
मळ सारे दूर होतील निघून जाईल मलीन
शेवटची पायरी नाव तिचे ''विलीन''
प्राणाला करायचे कैवल्यात विलीन
पाठीचा कणा कर चैतन्यात जिवंत
शिवाक्षास धडकत रहा बनेपर्यंत महंत
रोज प्रयत्न करत जा एक दिवस होईल स्फोट
अंगातून आनंद्लोट उठतील कडेलोट
जेव्हा तू होशील कैव्ल्यात नाहीसा
अमृताच्या पावसात होशील शून्यसा
जा आता साधनेला जाऊन सुरवात कर
अलख निरंजन म्हणून निरोप घेतो श्रीधर
श्रीधर तिळवे -नाईक
Friday, October 16, 2015
प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
१३ पंढरपूर २
विठ्ठला तू शैव होतास डोक्यावरती शिवलिंग
हे स्पष्ट पहावयास लागते ना डोळ्यास भिंग
आसपास सर्वत्र तुझ्या शिवमंदिरेच मला दिसतायत
उघड्या डोळ्यांनी तुझी खरी ओळखही ती सांगतायत
तरी बडव्यांच्या कैदेमध्ये पाहून तुला जीव व्याकुळ
तुझ्या दारी ब्राह्मण्याची रोज भरतात वैदिक चूळ
अस्पृश्यांना प्रवेश नव्हता तू मग होतास कसला देव
चोखामेळा मेला तरी बडव्यांचा कायम चेव
वेद तीन वर्णासाठी आगम सर्वांसाठी खुले
तरी वैदिकांच्या नादी रंजलेले आणि गांजलेले
न वाचताच वेद संतांनी वेद जाणतोच्या घोषणा केल्या
वेद म्हणजे दंतकथा न जाणताच पिढ्या मेल्या
हर हरीला एकत्र जोडून शेवटी ह्यांनी साधले काय
हर बहिष्कृत झाला हरीने दिला त्याच्यावर पाय
समन्वयाच्या नावाखाली शैव केले समूळ नष्ट
आमच्यासारखे वाचलेले अजूनही भोगतात कष्ट
तुला पुन्हा शैव करावे हे आता अशक्य वाटते
तुझे दास्यत्व बघून माझ्या डोक्यावरचे आभाळ फाटते
कृष्णाचा अवतार केला खाली दिली वैष्णव वीट
ज्ञानेश्वर नामदेव तुक्याने कपडे दिले मुक्तीचे फिट
संतांच्यामुळे देव झालास खंडपतीचा हेही आक्रीत
ह्या देशी काहीही होते तू ह्याचे उदाहरण विपरीत
प्रश्न इतकाच डोक्यावरच्या शिवलिंगाचे करू मी काय
वीट देवून पाया काढून घेतला बंदिस्त केले पाय
रहा ऊभा म्हंटलेच आहे अठ्ठावीस युगे आता निमूट
पंढरपूरातून मी निघालो शिवलिंगाची घेवून चिमुट
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )
Thursday, October 15, 2015
प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
१२ पन्ढरपूरात १
विठ्ठल वैष्णव शैव पांडुरंगदोघेही उभे घेवून एक अंग
पुंडलिकाच्या विटी उभा पांडुरंग
डोईवर त्याच्या भव्य शिवलिंग
विठू विष्णू झाला आकारात सामावला
पार्वतीचा आकार रुक्मिणी झाला
हर-हरी झाला अदभूत संगम
बडवे आले गायबले जंगम
आता नाही दिसत कुठेच हर
पार्वती गायब सर्व लक्ष्मिप्रहर
विटही झाली ब्राह्म्ण्यात फीट
चोखा मेला तरी जातीची शिट
जीभ जातिमुक्त काळीज जातीयुक्त
अजिबोगरीब भक्तांचे रक्त
राम कृष्ण हरी ! राम कृष्ण हरी !
मुक्ती मात्र नाही कुणाच्याच घरी
चला श्रीधर तिळवे उठवा तुमचे बूड
ह्यांच्या नादी लागून तुम्ही व्हाल आखूड
चालला चालला ! श्रीधर चालला !
शिवलिंगांचा सोबत काफिला
हर हर महादेव! हर हर महादेव !
तुकारामासोबत संपली माझी ठेव
श्रीधर तिळवे -नाईक
(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )
Wednesday, October 14, 2015
प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
११ सनातनी ब्राह्मण्यधारकांनो
सनातनी ब्राह्मण्यधारकांनो केलात शैवधम्म भ्रष्ट
म्हणूनच पुन्हा एकदा सांगतो आहे स्पष्ट
तुम्ही sponsor केलेला शिव नाही मानत
शिवाशिव तुमची आम्ही नाही पाळत
वर्ण जाती ब्राह्मणग्रंथ आमच्यासाठी शत्रू
वेद स्मृती पुराणे नाहीत आमचे पितृ
आगमाच्या अंगाने जाते आमचे अंग
रक्तातून उठतात आगमांचे तरंग
महावीर आणि बुद्ध आमचे धाकटे भाऊ
त्यांनाही काळजाने लिहू आणि गाऊ
तुमच्या सगळ्या बंद्या नीच आणि हलकट
आम्ही मुक्त आम्हास नको त्यांची कटकट
बघा जमेल तर तुम्ही द्या त्यांना फेकून
दास करतो तोही जातो दास बनून
कधीतरी मुक्तीचा आंबा चाखा हापूस
अजून किती शतके रक्ताचा पिणार ज्यूस
स्वत : च्या पायावर पाडून स्वत : च धोंडे
स्वत : च्या हातांना घालून कड्या कोयंडे
किती काळ बसणार थोडेतरी चाला
हत्ती गेले पुढे निदान मेंदूत तरी हला
श्रीधर तिळवे -नाईक
(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )
Tuesday, October 13, 2015
प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
वैदिकांचे सनातन माठ
आदळतात सतराशे साठ
डोक्यावर बनून कर्मठ
कायम आखत नवे कट
पसरवतात कल्पित गोष्टी
दहशत, थापा आणि भीती
बुडवतात भाबडे लोक
ह्यांचे लबाड ठोक टोक
म्हणती जगास वेद पाजवा
चहु खंडात वेद गाजवा
ब्राह्मण्याची भारतभर शेंडी
भल्याभल्यांना बनवते मंडी
ह्यांच्या नादी नको लागू
मुर्खासारखे नको वागू
ह्यांना कधी शिव ना कळला
मार्केटसाठी शिव वापरला
शैवांनो ह्यांच्यापासून सावध
शिव धम्माचा करतील वध
सावधपणाची बोंब जगभर
मारत निघाला सर्वत्र श्रीधर
श्रीधर तिळवे -नाईक
Sunday, October 11, 2015
प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
कुणी सांगितले पीत होता भोळा शंकर प्रचंड भांग
हे एक गॉसीप आहे पिकवलेले पद्धतशीर छान
शिवाचे दुसरे नाव आहे वैद्येश्वर आहे का माहित
शिव उत्तम वैद्य होता मेडिकल सायन्सचा पाईक
ह्या काळात ऑपरेशनसाठी नव्हता उपलब्ध अनेस्थेशिया
शिवाने भांग शोधून वापरली करून तिचा अनेस्थेशिया
आयुष्यात कधी प्याला नाही चिमुटभर शिव भांग
त्याच्या नावे फाडू नका बिले भांगेसाठी नका लावू रांग
होळीमध्ये करायची असते अवगुणांची आपल्या होळी
व्यसने सारी सोडायची असतात शुद्ध करायची देहझोळी
सोडण्याऐवजी व्यसने पकडता हातात घेता भांगेचा पेला
हा तर शिवाचा अपमान आहे केलेला म्हणवून घेत चेला
आत्ताच फेका नाहीतर श्रीधरला होळीत तुमच्या बोलवू नका
अलख निरंजन म्हणत श्रीधरने जैन गल्लीचा सोडला नाका
श्रीधर तिळवे -नाईक
(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )
Friday, October 9, 2015
प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
संन्यास
श्रीधरा सुटत नाही घर
घेणार कसा तू संन्यास ?
जीवांत पाय गुंतलेला
शिवात धुमसता श्वास
मोहाची रक्तात दारू
व्यसनांचे मेंदूत वारूळ
चंगळीचे शिल्प मज्जेत
असण्याची प्रभा मचूळ
घर शेवटचा मोह
कळते पण वळत नाही
आवश्यक पाठ करणे
पण पाय हलत नाही
भ्रमान्कीत जीवनशीण
थकव्यांचा पेशीत थवा
हे घरही हवे आणि
संन्यासही तुला हवा
प्रपंच बाभूळघोर
कर्तव्यकाटे उमलते
जे अस्तित्वात नाहीत
पण दिसतात आत फुलते
शोध असा तू संन्यास
खांद्यावर घर टाकेल
ज्याचा कणा न मेंदू
शिवसाधनेत वाकेल
कर क्षमा महादेवा
शोधतोय मार्ग मधला
ऐकून आहे साधकास
तू सुवर्णमध्यात भेटला
खांद्यावरती घरकुल
पाठीवरती संन्यास
साधत मध्य श्रीधर
निघाला खोल अनंतात
श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )
Thursday, October 8, 2015
माझ्या आयुष्यातला कोल्हापूरमधला कालखंड हा आता प्राचीन वाटायला लागला म्हणूनच ह्या कालखंडात लिहलेल्या कवितांना मी प्राचीन कविता असे नाव द्यायला सुरवात केलीये डे कॅथलोन सिरीज मध्ये मी ह्या सर्व कविता टाकायला सुरवात केलीये . गमतीची गोष्ट अशी कि अनेकांना ह्या कविता जास्त आवडतात. हे चांगले कि वाईट हे ठरवणे कठीण आहे कारण हे कवी म्हणून माझे यश आहे कि समाज बदलला तरी वाचकाची संवेदनशीलता बदलली नसल्याचे ते लक्षण आहे कि समाज बदललेलाच नाही कि माणूस बदलत नसल्याने हे घडते ? जेव्हा जेव्हा कुणी ह्या कालखंडातील माझी कविता आवडली असे सांगतो तेव्हा तेव्हा हे प्रश्न मला पडतात .
श्रीधर तिळवे
श्रीधर तिळवे
Wednesday, October 7, 2015
Tuesday, October 6, 2015
Thursday, October 1, 2015
प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
४ प्रथम संन्यासक्षण :न्यू कॉलेज वाचनालय
कणबरकर सर के आर यादव सर
दोघांना चुकवत
मी शिताफीने माझ्या आत
आतील सूर्य हाताळत
करोडो चंद्र फेटाळत
कॉलेज म्हणजे चंद्र manufacture करणारी प्रयोगशाळा
मी भौतिकशास्त्र शिकतोय
पण मला अतिभौतिकात रस आहे
मी रसायनशास्त्र शिकतोय
पण मला माझ्या असण्याचे मुलभूत रसायन शोधायचय
मी जीवशास्त्र शिकतोय
पण मला जीवाची शीव ओलांडून शिव शोधायचाय
पेठे सर म्हणतायत
''आयुष्याचे गणित प्रथम समजून घे ''
मी विचारतोय
''शून्य म्हणजे काय ?
ते व्याख्येत बसत काय ?
खाडे सर म्हणतायत
''तिळवे तू उंट आहेस कायम तिरपा
उंटावरचा शहाणा होशील
घोळ घालशील
भूमिती हीच मिती
मित्या मोडून खायला त्या काय गाजर आहेत ?
ब्रेन सरळ कर
आणि सरळ वापरायला शिक ''
''शिकण्याच्या पलीकडे काय असते सर ?''
''शिंकणे ''
सर हसत हसत उत्तरतायत
मला माहीत आहे
मी केऑंसमध्ये रांगणारा
अष्टावक्र प्राणी आहे
अमोल परेशान आहे
अविनाश संत्रस्त आहे
अभय चिंतेत आहे
त्यांना वाटतय
ह्युमन स्पेसीजला न परवडणारा हा आपला दोस्त
बारावी पास कसा होणार ?
उत्क्रांतीला पुढे धाडू पाहणारा ह्याचा कणा
admission च्या rat race मध्ये कसा पळणार ?
माझ्या मित्रांसाठी मी एक खेडवळ सस्पेन्स आहे
जो अस्तित्वाच्या गावाचा सत्यानाश केल्यावरच
उलगडणार आहे
मी चाललोय
न्यू कॉलेजच्या लायब्ररीत
मी पळतोय कि शिरतोय ?
मी मरतोय कि नव्याने जन्म घेतोय ?
मी गोठ्तोय कि पाणी-पाणी होतोय ?
मला माझ्यावर आजोबा लादून घ्यायचे नाहीत
मला माझ्यावर शैव धम्म लादून घ्यायचा नाहीये
मला माझ्यावर संन्यास लादून घ्यायचा नाहीये
मी नाकारतोय कि वारश्यापासून पळतोय ?
मी भटकतोय कि भरकटतोय ?
मला प्रेषित व्हायचं नाहीय
मला गुरु व्हायचं नाहीय
मला फक्त निघायचंय
मात्र कुठ पोहचायचय
मला माहित नाही
मी पाहतोय पुस्तकांचा प्रचंड ढिगारा
नवे नवे दिनॉसॉर निर्माण करणारा
मला ज्ञानाच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली ठार व्हायचं आहे काय ?
मला नव्या दिनॉसॉरला माझे हुषार मांस पुरवायचे आहे काय ?
मला ह्या लायब्ररीत नॉलेजattack न मरायचं आहे काय ?
ही सर्व माहिती घेवून मी कुठ पोहचणार आहे ?
ह्या ज्ञानामुळे मला माझा साधा पाद तरी थांबवता येईल काय ?
विज्ञानाच्या प्रकाशाने माझे करुणाडोळे उघडणार आहेत काय ?
तंत्रज्ञानाच्या ध्वनीने माझे वासनातरंग बदलणार आहेत काय ?
प्रश्नांची खेंचाखेंच
पेचापेच
माझा मेंदू ताणवतिये
मी अडखळतोय
मी अडतोय
मी स्वत:लाच खोडतोय
करुणेचा शुद्ध प्रकाश
उमलतोय माझ्या आसपास
एक स्फूर्ती मला कवेत घेतीये
एक शांतता स्फोट करतीये माझ्यात
मी नाहीसा होतोय माझ्यातून
आणि देह
ह्या मृत्यूने कमालीचा आनंदीत
देहभर थरथरतोय
५ संन्यास २
नाथसंन्यास घेवू कि घेवू मरुतसंन्यास ?
कि शिवसंन्यास घेवून करू पदन्यास ?
नाथसंन्यास कडक मरुत थोडा कामधारी
शिवसंन्यासात तुला पार्वती कम्पलसरी
कुठून आत्ताच्या जगात भेटणार पार्वती
मुले होतील गणपती स्कंद काय guarenti ?
शिवसंन्यास घेशील तर अडकशील संसारात
वाढतील पोरे तशी वाढतील व्यवहारपाश
नाथसंन्यासात ब्रह्मचर्याची चूल
पेटवशिल का तुझी कामवासना डाउटफुल ?
बघ काय करायचे एक कर ठीक
कुठलाही संन्यास घे रहा प्रामाणिक
५ संन्यास २
नाथसंन्यास घेवू कि घेवू मरुतसंन्यास ?
कि शिवसंन्यास घेवून करू पदन्यास ?
नाथसंन्यास कडक मरुत थोडा कामधारी
शिवसंन्यासात तुला पार्वती कम्पलसरी
कुठून आत्ताच्या जगात भेटणार पार्वती
मुले होतील गणपती स्कंद काय guarenti ?
शिवसंन्यास घेशील तर अडकशील संसारात
वाढतील पोरे तशी वाढतील व्यवहारपाश
नाथसंन्यासात ब्रह्मचर्याची चूल
पेटवशिल का तुझी कामवासना डाउटफुल ?
बघ काय करायचे एक कर ठीक
कुठलाही संन्यास घे रहा प्रामाणिक
६ संन्यास ३ : मरुत संन्यास
मारुतीने दिला मला मरुत संन्यास
वायूप्रमाणे हिंडावे मुक्त असावा वास
करू नये लग्न म्हणे मांडू नये संसार
श्वासाप्रमाणे घ्यावात आणि सोडाव्यात नार
कुठल्याही मुलात गुंतवू नये जीव
कुठल्याही मुलाची करू नये कीव
जमेल तेवढी मदत सर्वांना करावी
हात न लावता रामास बायको आणून द्यावी
भवसागर शक्तीसंगे करावा पार
कर्तव्याशी राहावे आपल्या इमानदार
रामासारखे बोलवतील पण जावू नये राज्यात
ते ठेवणार असतील तर त्यांना ठेवू दयावे काळजात
सेवक कुणाचे बनू नये बनू नये मालक
सुग्रीवासारख्यांना राज्याचे बनवावे चालक
एक युध्द करावे आणि पुढे निघून जावे
कितीही चांगले लोक असोत मागे न वळून पहावे
करताना सर्व काही शिव असावा मनी
लोक शिवावतार समजतील ऐकू नये कानी
रामाला करावी मदत पण भक्ती शिवाची करावी
वैष्णव पिकवतील कांड्या आपण धूप न घालावी
चिरंजीव काय रामभक्त काय लोक अफवा उठवतात
आपण मात्र ध्यान करून चक्रे पार करावी सात
ज्याला मोक्ष मिळतो तो चिरंजीव होतो आपोआप
बाकी मात्र दोर समजून धोपटत राहतात नवे साप
तेव्हा कर निमूट साधना मीच देतोय तुला संन्यास
एवढे बोलून अंतर्धान पावला सुटला माझा पहिला पाश
७ संन्यास ४
शैव जैन बौध्द सारेच आहेत आगम
त्यांच्यातून निघतात नीटनेटके धम्म
धम्म म्हणजे धर्म न्हवे न्हवे रम्यकथा
धम्माच्या मूळ पायात वास्तव आणि व्यथा
धर्म रानटीपणा आयुष्याला मारक
धम्म मानवता आयुष्याला तारक
घेणार तर संन्यास घे आगमित संन्यास
धर्म म्हणजे प्लास्टिक त्यास नाही खरा सुवास
घेण्याआधी संन्यास जाण यथायोग्य
धर्म रोग आहे धम्म म्हणजे आरोग्य
इतके जाणून पाऊल टाकले केली सुरवात
पोचणे होवो न होवो मजेदार होवो प्रवास
८ संन्यास ५
स्वप्नात रोज मरुत संन्यास
अन्नालाही शिवाचा वास
घरी भिंती महादेव उमटतो
जैन गल्लीत तोच प्रकटतो
बिंदू चौकात त्याचा पुतळा
तिळवे भांडार त्याचाच टिळा
विकताना धान्य हात महादेव
तराजू पारड्यात त्याचाच पेव
वजनी काळ्या शिवचेहरा
बरण्यात दिसतो त्याचाच फेरा
पोत्यात त्याच्या सुवर्ण खाणी
शिवमुद्रेची गल्लीत नाणी
इथे तिथे सर्वत्र वावर
संन्यास घेवू कि सांभाळू घर
मेंदूस रोज पोखरे प्रश्न
व्यसनांचे मी थांबवले जश्न
हृदयी नाद ओम नमो शिवाय
श्रीधर हरला सारे उपाय
घेण्यासाठी चालला संन्यास
जे जगला तो जगण्याचा भास
सापडली त्यास जगण्याची कळ
मित्रांनो त्यास होऊ द्या निर्मळ
श्रीधर तिळवे -नाईक
(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )
Subscribe to:
Posts (Atom)