प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
४ प्रथम संन्यासक्षण :न्यू कॉलेज वाचनालय 
कणबरकर सर के आर यादव सर 
दोघांना चुकवत 
मी शिताफीने माझ्या आत 
आतील सूर्य हाताळत 
करोडो चंद्र फेटाळत 
कॉलेज म्हणजे चंद्र manufacture करणारी प्रयोगशाळा 
मी भौतिकशास्त्र शिकतोय 
पण मला अतिभौतिकात रस आहे 
मी रसायनशास्त्र शिकतोय 
पण मला माझ्या असण्याचे मुलभूत रसायन शोधायचय  
मी जीवशास्त्र शिकतोय 
पण मला जीवाची शीव ओलांडून शिव शोधायचाय 
पेठे सर म्हणतायत 
''आयुष्याचे गणित प्रथम समजून घे ''
मी विचारतोय 
''शून्य म्हणजे काय ?
ते व्याख्येत बसत काय ?
खाडे सर म्हणतायत 
''तिळवे तू उंट आहेस कायम तिरपा 
उंटावरचा शहाणा होशील 
घोळ घालशील 
भूमिती हीच मिती 
मित्या मोडून खायला त्या काय गाजर आहेत ?
ब्रेन सरळ कर 
आणि सरळ वापरायला शिक ''
''शिकण्याच्या पलीकडे काय असते सर ?''
''शिंकणे ''
सर हसत हसत उत्तरतायत 
मला माहीत आहे 
मी केऑंसमध्ये रांगणारा 
अष्टावक्र प्राणी आहे 
अमोल परेशान आहे 
अविनाश संत्रस्त आहे
अभय  चिंतेत आहे 
त्यांना वाटतय 
ह्युमन स्पेसीजला न परवडणारा हा आपला दोस्त 
बारावी पास कसा होणार ?
उत्क्रांतीला पुढे धाडू पाहणारा ह्याचा कणा 
admission च्या rat race मध्ये कसा पळणार ?
माझ्या मित्रांसाठी मी एक खेडवळ सस्पेन्स आहे 
जो अस्तित्वाच्या गावाचा सत्यानाश केल्यावरच 
उलगडणार आहे 
मी चाललोय 
न्यू कॉलेजच्या लायब्ररीत 
मी पळतोय कि शिरतोय ?
मी मरतोय कि नव्याने जन्म घेतोय ?
मी गोठ्तोय कि पाणी-पाणी होतोय ?
मला माझ्यावर आजोबा लादून घ्यायचे नाहीत 
मला माझ्यावर शैव  धम्म लादून घ्यायचा नाहीये 
मला माझ्यावर संन्यास लादून घ्यायचा नाहीये 
मी नाकारतोय कि वारश्यापासून पळतोय ?
मी भटकतोय कि भरकटतोय ?
मला प्रेषित व्हायचं नाहीय 
मला गुरु व्हायचं नाहीय 
मला फक्त निघायचंय 
मात्र कुठ पोहचायचय 
मला माहित नाही 
मी पाहतोय पुस्तकांचा प्रचंड ढिगारा 
नवे नवे दिनॉसॉर निर्माण करणारा 
मला ज्ञानाच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली ठार व्हायचं आहे काय ?
मला नव्या दिनॉसॉरला माझे हुषार मांस पुरवायचे आहे काय ?
मला ह्या लायब्ररीत नॉलेजattack न मरायचं आहे काय ?
ही सर्व माहिती घेवून मी कुठ पोहचणार आहे ?
ह्या ज्ञानामुळे मला माझा साधा पाद तरी थांबवता येईल काय ?
विज्ञानाच्या प्रकाशाने माझे करुणाडोळे उघडणार आहेत काय ?
तंत्रज्ञानाच्या ध्वनीने माझे वासनातरंग बदलणार आहेत काय ?
प्रश्नांची खेंचाखेंच 
पेचापेच 
माझा मेंदू ताणवतिये 
मी अडखळतोय 
मी अडतोय 
मी स्वत:लाच खोडतोय 
करुणेचा शुद्ध प्रकाश 
उमलतोय माझ्या आसपास 
एक स्फूर्ती मला कवेत घेतीये 
एक शांतता स्फोट करतीये माझ्यात 
मी नाहीसा होतोय माझ्यातून 
आणि देह 
ह्या मृत्यूने कमालीचा आनंदीत 
देहभर थरथरतोय 
५ संन्यास २
नाथसंन्यास घेवू कि घेवू मरुतसंन्यास ?
कि शिवसंन्यास घेवून करू पदन्यास ?
नाथसंन्यास कडक मरुत थोडा कामधारी
शिवसंन्यासात तुला पार्वती कम्पलसरी
कुठून आत्ताच्या जगात भेटणार पार्वती
मुले होतील गणपती स्कंद काय guarenti ?
शिवसंन्यास घेशील तर अडकशील संसारात
वाढतील पोरे तशी वाढतील व्यवहारपाश
नाथसंन्यासात ब्रह्मचर्याची चूल
पेटवशिल का तुझी कामवासना डाउटफुल ?
बघ काय करायचे एक कर ठीक
कुठलाही संन्यास घे रहा प्रामाणिक
५ संन्यास २
नाथसंन्यास घेवू कि घेवू मरुतसंन्यास ?
कि शिवसंन्यास घेवून करू पदन्यास ?
नाथसंन्यास कडक मरुत थोडा कामधारी
शिवसंन्यासात तुला पार्वती कम्पलसरी
कुठून आत्ताच्या जगात भेटणार पार्वती
मुले होतील गणपती स्कंद काय guarenti ?
शिवसंन्यास घेशील तर अडकशील संसारात
वाढतील पोरे तशी वाढतील व्यवहारपाश
नाथसंन्यासात ब्रह्मचर्याची चूल
पेटवशिल का तुझी कामवासना डाउटफुल ?
बघ काय करायचे एक कर ठीक
कुठलाही संन्यास घे रहा प्रामाणिक
६ संन्यास ३ : मरुत संन्यास 
मारुतीने दिला मला मरुत संन्यास 
वायूप्रमाणे हिंडावे मुक्त असावा वास 
करू नये लग्न म्हणे मांडू नये संसार 
श्वासाप्रमाणे घ्यावात आणि सोडाव्यात नार 
कुठल्याही मुलात गुंतवू नये जीव 
कुठल्याही मुलाची करू नये कीव 
जमेल तेवढी मदत सर्वांना करावी 
हात न लावता रामास बायको आणून द्यावी 
भवसागर शक्तीसंगे करावा पार 
कर्तव्याशी राहावे आपल्या इमानदार 
रामासारखे बोलवतील पण जावू नये राज्यात 
ते ठेवणार असतील तर त्यांना ठेवू दयावे काळजात 
सेवक कुणाचे बनू नये बनू नये मालक 
सुग्रीवासारख्यांना राज्याचे बनवावे चालक 
एक युध्द करावे आणि पुढे निघून जावे 
कितीही चांगले लोक असोत मागे न वळून पहावे 
करताना सर्व काही शिव असावा मनी 
लोक शिवावतार समजतील ऐकू नये कानी 
रामाला करावी मदत पण भक्ती शिवाची करावी 
वैष्णव पिकवतील कांड्या आपण धूप न घालावी 
चिरंजीव काय रामभक्त काय लोक  अफवा उठवतात 
आपण मात्र ध्यान करून चक्रे पार करावी सात 
ज्याला मोक्ष मिळतो तो चिरंजीव होतो आपोआप 
बाकी मात्र दोर समजून धोपटत राहतात नवे साप 
तेव्हा कर निमूट साधना मीच देतोय तुला संन्यास 
एवढे बोलून अंतर्धान पावला सुटला माझा पहिला पाश 
७ संन्यास ४
शैव जैन बौध्द सारेच आहेत आगम
त्यांच्यातून निघतात नीटनेटके धम्म
धम्म म्हणजे धर्म न्हवे न्हवे रम्यकथा
धम्माच्या मूळ पायात वास्तव आणि व्यथा
धर्म रानटीपणा आयुष्याला मारक
धम्म मानवता आयुष्याला तारक
घेणार तर संन्यास घे आगमित संन्यास
धर्म म्हणजे प्लास्टिक त्यास नाही खरा सुवास
घेण्याआधी संन्यास जाण यथायोग्य
धर्म रोग आहे धम्म म्हणजे आरोग्य
इतके जाणून पाऊल टाकले केली सुरवात
पोचणे होवो न होवो मजेदार होवो प्रवास
८ संन्यास ५
स्वप्नात रोज मरुत संन्यास 
अन्नालाही शिवाचा वास 
घरी भिंती महादेव उमटतो 
जैन गल्लीत तोच प्रकटतो 
बिंदू चौकात त्याचा पुतळा 
तिळवे भांडार त्याचाच टिळा 
विकताना धान्य हात महादेव 
तराजू पारड्यात त्याचाच पेव 
वजनी काळ्या शिवचेहरा 
बरण्यात दिसतो त्याचाच फेरा 
पोत्यात त्याच्या सुवर्ण खाणी 
शिवमुद्रेची गल्लीत नाणी 
इथे तिथे  सर्वत्र वावर 
संन्यास घेवू कि सांभाळू घर 
मेंदूस रोज पोखरे प्रश्न 
व्यसनांचे मी थांबवले जश्न 
हृदयी नाद ओम नमो शिवाय 
श्रीधर  हरला सारे उपाय 
घेण्यासाठी चालला संन्यास 
जे जगला तो जगण्याचा भास 
सापडली त्यास जगण्याची कळ 
मित्रांनो त्यास होऊ द्या निर्मळ 
श्रीधर तिळवे -नाईक
(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )
 
No comments:
Post a Comment