मित्रहो ,
''ऐसी अक्षरे '' साठी दिलेली मी दिलेली मुलाखत प्रकाशित न करण्याचा निर्णय संपादक मंडळाने घेतला आहे . त्यामागे असलेली कारणे मला माहित नाहीत पण मी त्या कारणांचा आदर करतो . मात्र मी केलेली मेहनत वाया जाऊ नये म्हणून मी दिलेली उत्तरे इथे देत आहे . प्रश्नावर त्यांचा हक्क असल्याने प्रश्न देवू शकत नाही ह्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो तर फक्त उत्तरे
श्रीधर तिळवे
ह्याचा अर्थ सर्वच कालबाह्य झाले आहे असे नाही शैव धम्माने दिलेल्या आणि जैन , बौद्ध धम्मानी अत्यंत व्यापक आणि जगभर पोहचवलेल्या सत्य , अहिंसा , अपरिग्रह आणि अचोर्य ही मुल्ये आजही तेवढीच महत्वाची आहेत त्यामुळेच ह्या सामाजिक वास्तवात कलाकाराने आपली चीन्ह्की सत्य , अहिंसा , अपरिग्रह किंवा सुपरिग्रह , अचोर्य आणि सुकाम ह्यांच्या आधारे चालवावी असे मला वाटते विक्रयजालात उत्पादनाची जागा सेमिओडक्शनने घेतली आहे आणि त्यात तो ही एक सेमीओडीटी आहे त्याची कलाकृतीही एक सेमीओडीटी आहे अशा वेळी सत्य , अहिंसा , अपरिग्रह किंवा सुपरिग्रह , अचोर्य आणि सुकाम ह्यांना स्वत :त शाबूत ठेवणे हे अवघड काम आहे कलेने सत्य सांगितले पाहिजे , हिंसेचा प्रतिरोध केला पाहिजे , प्रचंड आणि अनैतिक उपभोगाचे समर्थन टाळले पाहिजे , शोषणाच्या विरोधात ते चोर्य असल्याने आवाज उठवला पाहिजे आणि रेप सारख्या दु : कामांची निंदा करून सुकामाची प्रतिष्ठा वाढवली पाहिजे ह्या मूलभूतच गोष्टी आहेत कला ही मुळात निसर्ग युगाची देणगी आहे . ह्या युगाने कुटुंब आणि धर्म ह्या दोन गोष्टी दिल्या आणि कलेने हया दोन गोष्टींना चांगलेच पाठबळ पुरवले आहे . ह्यातील कुटुंब व्यवस्थेला दिलेले पाठबळ योग्य होते पण कलावंतानी धर्म ह्या गोष्टीला अजिबात पाठींबा देवू नये असे माझे मत आहे रामायण आणि महाभारत ह्या वैदिक , ब्राह्मणी आणि वैष्णव धर्मांचे समर्थन करणाऱ्या सिरियल्स मुळेच भाजप वाढीस लागला असे माझे मत आहे कलेने अध्यात्माचा पाठपुरावा केला पाहिजे धर्माचा न्हवे . सृष्टीयतेने आपल्याला विज्ञान दिले आणि विचारसरणीही दिली पारंपारिक विज्ञान आउटडेटेड
''ऐसी अक्षरे '' साठी दिलेली मी दिलेली मुलाखत प्रकाशित न करण्याचा निर्णय संपादक मंडळाने घेतला आहे . त्यामागे असलेली कारणे मला माहित नाहीत पण मी त्या कारणांचा आदर करतो . मात्र मी केलेली मेहनत वाया जाऊ नये म्हणून मी दिलेली उत्तरे इथे देत आहे . प्रश्नावर त्यांचा हक्क असल्याने प्रश्न देवू शकत नाही ह्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो तर फक्त उत्तरे
श्रीधर तिळवे
उत्तरकर्ता : श्रीधर तिळवे 
१. 
खरेतर फक्त वर्तमान कालीनच अस्तित्वात असते आणि  समकालीन  म्हणजे  वर्तमानाचे  एक सौष्ठव  असते  बाकी इतिहास आणि भविष्य विज्ञान ह्या तश्या काल्पनिक गोष्टी असतात किंबहुना माइंड गेम असतात त्यामुळे कविता ही फक्त वर्तमान काळातच असते ऐतिहासिक  लिखाणात आपण तुकारामाचे समकालीन असा शब्दप्रयोग वापरतो तेव्हा तुकारामाचे वर्तमानकालीन असेच आपणाला म्हणायचे असते आत्ता आपण समकालीन म्हणतो तेव्हा आत्ताचे वर्तमानकालीन आपणाला अभिप्रेत असते असावे 
२. 
नव्वदोत्तर  हा इतिहास झाला . दोनहजारोत्तर  हाही इतिहास झाला आणि दोन हजार नंतरचा द्शोत्तर  हा आत्ताचा समकालीन कालखंड आहे आणि तो ३१ डिसे २०१० ला संपेल  त्यामुळेच चौथ्या नवतेच्या ह्या तीन अवस्था आहेत असे दिसते जशा कि देशी  नवतेच्या  साठोत्तर , सत्तरोतर  , ऐन्शो त्तर , नव्वदोत्तर ,  दोनहजारोत्तर , दोन हजार नंतरचा द्शोत्तर अशा  अवस्था  दिसतात  तेव्हा  तुम्ही  जेव्हा  'नव्वदोत्तरी' वास्तव किंवा संवेदना '' म्हणता   तेव्हा त्यात चौथी नवता येतेच पण देशी नवता ही  येते  १९ व्या  शतकातील प्रबोधनवादी  नवताही  येते आणि  विसाव्या शतकातील आधुनिक  व  स्वछन्दी म्हणजे रोमांटिक नवताही येते . तुम्हाला हे सर्व अभिप्रेत आहे का ? झालय काय आपण अत्यंत बेजबाबदारपणे  शब्द  वापरून  गोंधळ उडवून देण्यात तरबेज झालोय किमान लेखकांनी तरी शब्दाबाबत चोख असायला हवे पण हा चोखपणा जायला लागलाय असं दिसतय  त्यामुळेच साठोत्तरीच्या धर्तीवर काही लोकांनी नव्वदोत्तरी  असा शब्द आणला   ह्यात  देशीवादी बोधाने लिह्णाऱ्या  शब्दवेध गोतावळ्याचा  आणि मंगेश काळेचा फार मोठा  वाटा  होता कारण   हे लोक  देशिवादाचे कट्टर समर्थक होते त्यांना बंड वगैरे  नकोच होते उलट साठोत्तरीच्या वळचणीला  जाऊन बसण्याची घाई  होती ह्या लोकांचा मुळात नवतेचा दावाच न्हवता . देशीवादी नवतेचे आपण नव्वोदत्तरी रूप आहोत एवढाच ह्यांचा दावा होता आणि शब्द्वेधच्या विचारसरणीशी तो जुळून होता त्यामुळे शब्द्वेधच्या गोतावळ्याने '' नव्वदोत्तरी '' ह्या सज्ञेला दिलेला पाठिंबा हा योग्यच होता पण चौथ्या नवतेच्या लोकांनी ह्या सज्ञेला दिलेला पाठिंबा म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी होती ह्या लोकांनी स्वत:ला पुढे न्हेले पण चिन्हसृष्टीय नवतेच्या पायावर धोंडा पाडून घेतला आणि १९९० ते २०१५ हा कालखंड देशीवादी पारंपारिक लेखनाने गाजवून सोडला आणि हिंदुवादाला ह्याने चालनाच दिली आश्चर्याची गोष्ट अशी कि एरव्ही स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे पत्रकार आणि मिडियावाले साहित्याबाबत मात्र मागासलेल्या देशिवादाचे प्रमोशन करण्यात एकमेकाशी स्पर्धा करू लागले हा एक विरोधाभास होता कारण मिडिया चौथ्या नवतेचा , चीन्ह्तान्त्रिकी चौथ्या नवतेची आणि प्रसार मात्र पारंपारिक देशीवादी नवतेचा ओसामा बिन लादेन ने टेररीझमच्या प्रसारासाठी चौथी नवता वापरली इथे चौथ्या नवतेचे अपत्य असलेल्या मिडियानेच तिसरी नवता प्रमोट केली आणि मीडियाची मागासलेली साहित्यिक संस्कृती अधोरेखित केली  ह्या सगळ्याचा एकच परिणाम झाला . मिडिया आणि प्रस्थापित देशीवादी ह्या  दोघांनीही  त्यांना  सामावूनही  घेतले   चौथ्या नवतेतल्या  हेमंत दिवटे आणि सचिन केतकर ह्यांनाही  साठोत्तरीचा  आशीर्वाद बंडापेक्षा  महत्वाचा वाटत होता  प्रस्थापित  होण्याची त्यांनाही घाईच होती त्यामुळे चौथ्या नवतेचे  असूनही ह्यांनी शब्द्वेधला पाठींबा दिला आणि ही सज्ञा  मराठीच्या बोकांडी कायमची बसली  हे सर्व लोक यशस्वी आणि प्रस्थापितही झाले हा शब्द आणताना हे लोक विसरले कि ही एक कालिक संज्ञा आहे आणि त्यात नव्वदनंतरचे सर्व सोमेगोमे आणि बाथरूम पोएट्सही  येणार आणि येतात   त्यामुळे मी इथे 'नव्वदोत्तरी' वास्तव किंवा संवेदना ह्या अंगाने बोलणार नाही  कारण  मग सर्वच नवता वर  बोलावं लागेल  .आणि  ते फार मोठे होईल असो तर मी इथे फक्त चौथ्या नवतेवर बोलेन . चौथ्या नवतेचे वास्तव अशी काही भानगड अस्तित्वातच नाही कारण चौथी नवता हिच मुळात चिन्ह्सृष्टीय महाजालत्वातून  अवतरली आणि तिने पारंपारिक वास्तव दुय्यम केले मी  सौष्ठवच्या फेब्रु  ९२ च्या अंकात चौथ्या नवतेची घोषणा केली होती आणि त्यावरून बरेच वादविवाद झाले होते पुढे  ''बांधकाम चालू आहे '' ह्या अभिधाच्या ऑगस्ट ९६ च्या  अंकात प्रकाशित झालेल्या कवितेत  मी ह्या  मायाजालाच्या बांधकामाची अभिव्यक्ति  केली होती आणि  तिच्या वरून  बरेच वादविवाद झाले होते ह्या कवितेवर केसही झाली होती . ह्या मागचे कारण , बदललेले महाजालत्व होते आणि बदललेली महाजालीय संवेदना होती आणि पारंपारीक लोकांना हा बदल मानवत न्हवताच . ह्या वेगळेपणावर माझी ''टीकाहरण '' आणि  '' चौथी नवता : नवअनियतकालिकांचा  इतिहास '' अशी दोन पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत . जिज्ञासूंनी ती वाचावी . बदल तर साफ आहे आपण एकमेकांना भेटलेलो नाही इमेल वर भेटलो  मोबाईल वर  संवाद  केला  आणि  हे सर्व मी कॉम्पुटर वर  लिहतोय आणि इमेल करेन . पूर्वी हे शक्य न्हवते ऐन्शोत्तर  कालखंडात   अवजड  प्रिमीटीव  संगणक व टीव्ही होता 
VIDEO होता  वॉक मन  होता  प्रिमीटीव  इन्टरनेट होते ही संक्रमणात्मक  अवस्था होती  ,  नव्वदोत्तर  कालखंडात मायक्रोसोफ्ट ,सीडी डीवीडी  , मोबाईल आणि  इंटरनेट  आले आणि  चौथ्या  नवतेचे  महाजालत्व  खऱ्या  अर्थाने अवतरले  ,  दोनहजारोत्तर  कालखंडात ओर्कुट आले  फेसबुक  , टच  आणि  स्मार्ट  फोन  व टीव्ही  आले  TABLET
 आले  दोन हजार नंतरच्या  द्शोत्तर कालखंडात  व्हॉटसअप  आले . आपण असे म्हणू शकतो कि चौथी नवता ही तीन टप्प्यात अवतरली १ प्रीडीजीटल २ डिजिटल आणि ३ पोस्टडिजिटल  आपण सध्या सर्वच पोस्ट डिजिटल कालखंडात वावरतो आहे ह्यापुढचा टप्पा अजून तरी प्राथमिक अवस्थेत आहे मी सध्या माझ्या कविता फेसबुक आणि ब्लॉगरवर टाकतो कारण छापीलतेची गरज संपली असे मला वाटते मी सेल्फी बाबा ही कादम्बरी ही  ब्लॉगवर टाकली ती कुणी वाचलीच नाही हे सोडून दे कारण कादम्बरी छापील किंवा मुद्रित रुपात  वाचण्याची आपली सृष्टीय आणि प्रतिसृष्टीय सवय आहे ती आणखी काही दशके तरी मोडेल असे वाटत नाही ब्लॉगरवर  साहित्य हाही बदल आहे आणि  तो मराठीत आलेला दिसतो आज संवादासाठी मला  ओंकार  किंवा प्रणवला प्रत्यक्ष भेटावे लागत नाही तशी काही गरज आहे असेही मला वाटत नाही ह्याला आपण जालीय संवाद म्हणू तर त्याचा उदय हाही मोठाच बदल आहे आता हे महाजालत्व  ज्या साहित्यात आढळते ती चौथ्या नवतेची कलाकृती होय आता त्यामागची बोधनशीलता  मनोज जोशी , निवी कुलकर्णी , हेमंत दिवटे , सचिन केतकर , संजीव खांडेकर , संदीप देशपांडे  ओंकार कुलकर्णी  प्रमाणे ''मार्गी '',  सलील वाघ  नितीन कुलकर्णी  आणि  भ्रमिष्टाचा जाहीरनामा  मधल्या  संतोष पवार  प्रमाणे देशी (देशीवादी  न्हवे ) किंवा २००० नंतरच्या अरुण काळे किंवा नितीन वाघ  प्रमाणे पोटी  किंवा  २००० नंतरच्या भुजंग मेश्राम प्रमाणे जमाती अशी असू शकते . सलील वाघ   किंवा प्रणव सुखदेव सारखा कवी मार्गी आणि देशी असा दोन्ही बोधनशिलते प्रमाणे लिहू शकतो . प्रथम इंद्रियशीलता  नंतर संवेदनशीलता  आणि मेंदूत  पोहचल्यावर  शरीरशीलता , विचारशीलता , भावशीलता , अहमशीलता , शक्तीशीलता  , क्रीयाशीलता  , अवकाशशीलता  , कालशीलता , अवस्थाशीलता  आणि   स्थितीशीलता  ह्यांच्या नेटवर्क्स मधून बोधनशीलतेचे  महानेटवर्क  ऑपरेट व्हायला लागते  आणि साहित्यात ते जाणवते . केवळ  संवेदनशिलतेच्या आधारे  कला  निर्माण करण्याचे दिवस इतिहासजमा झाले . मुळात बोधनशीलता ही अनुभव विश्वावर  अवलंबून असते त्यामुळे ती अतिवैयक्तिक असते  जी भोवतालच्या समाजाने , मेंदूने आणि जनेटिकलने प्रोग्राम केलेली असते  .  जर ती महाजालत्वाने  प्रोग्राम केलेली असेल आणि  कविचे जनेटिकल आणि ब्रेनल  महाजालत्वासाठी खुले असेल तर कवितेत ती तशीच  डीजीटेल अन्यथा रोमांटीक  अथवा देशीवादी संवेदनशिलतेने एखादा लेखक महाजालत्वाला  सामोरा जाऊ शकतो .  
३.  रुळलेली भाषा कमी पडणे स्वाभाविक आहे कारण चिन्हवस्तूंना तुम्ही  काय म्हणणार ? आपण ह्या संदर्भात इंग्लिश शब्द जसेच्या तसे आयात केले रूळवले मोबाईल टीव्ही इमेल वगैरे . हे भाषा कमी पडल्याने झालेले  नाही तर भाषा लवचिक  असल्याने  घडले आहे  जी भाषा आयात करत नाही ती मरून जाते  आपण  काही नवीन शब्द तयार केले उदा . चिन्हसृष्टी , बॉडीकोला , डिजिटलणे  , मांसबिल्डींग , महाजालत्व ! एका अर्थाने चौथी नवता पुन्हा एकदा भाषेच्या लवचिक असण्याचा फायदा घेत तिला रूळलेल्या भाषाजालाच्या  तावडीतून सोडवत आहे . 
४.  मुळात चौथ्या नवतेचे   ऐन्शो त्तर ,  नव्वदोत्तर ,  दोनहजारोत्तर  असे वेगवेगळे महाजालत्व  आणि  बोधना  आहेत मी स्वत : शेवटचा ऐन्शोत्तरी  व पहिला नव्वदोत्तरी लेखक!  मी हे तिन्ही प्रकारचे महाजालत्व  अनुभवलं आणि नंतर बादही केलं डेकॅथलोन ही सिरीज  ऐन्शोत्तर ,CHANNEL  ही  सीरीज नव्वदोत्तर ,  तर  आत्ताची सिरीज  दोनहजारोत्तर  असे हे टप्पे आहेत  ह्यातून चौथ्या नवतेच्या तीन पिढ्या दिसतात . आमची पिढी  चाचपणारी होती आमच्यासाठी चिन्ह्सृष्टी म्हणजे अचंबा होती . नव्वदोत्तरीत  हा  अचंबा दिसत नाही  सलील वाघ  मनोज जोशी  हेमंत दिवटे सचिन केतकर  नवीनतेने  अचंबित झालेले  नाहीत  मात्र  भारावलेले  आणि  सराव करत  सामोरे जाताना दिसतायत त्याउलट प्रणव सुखदेव किंवा ओंकार कुलकर्णी  किंवा फेसबुकवरील  अनेक  नवे कवी ह्यांचे बालपण चिन्हसृष्टीत गेल्याने त्यांचा सराव  लहानपणीच संपला होता त्यांना तिची सवयच झालेली दिसते. मोबाईल  आमच्यासाठी चमत्कार होता नव्वदोत्तरीसाठी सराव होता   नवीन लोकांसाठी ती सवय आहे  त्यामुळे संवेदनशीलता अटळपणे वेगळ्या दिसतायत . मी एक विधान १९९० पासून करतोय ते म्हणजे चौथ्या नवतेचे खरे साहित्य हे १९८५ नंतर जन्मलेले लोक लिहिणार आहेत  हे आता  घडते आहे  
५.  सम्बन्ध असतोच कलेचे एक नेटवर्क असते आणि आहे बाकी तो कसा असावा हा वैयक्तिक अभिरुचीवर अवलंबून आहे . 
६
प्रथम नैसर्गिक नंतर विश्वीय नंतर सृष्टीय नंतर प्रतिसृष्टीय आणि आता चिन्हसृष्टीय अशा पाच  टप्प्यातून आपण गेलोय आत्ताचे सामाजिक वास्तव  हे ह्या पाचही टप्प्याशी निगडीत आहे  आपण  ह्या क्षणी  निसर्गीय , विश्वीय  , सृष्टीय  ,प्रतिसृष्टीय  आणि  चिन्हसृष्टीय  अशा  पंचनयी  सामाजिकतेत  जगत  आहोत  आणि  इतिहासात  प्रथमच  ह्या  पंचनयी  सामाजीकतेला  जालीयतेने  जोडण्याची  सुवर्णसंधी  मानवाला  प्राप्त  झाली आहे  पोमो (पोस्टमॉडर्निझम ) हा  फ्रागटाइम (fragmentations चा काळ)होता तर आपला काळ हा तुकड्यांना जोडून त्यातून नेटवर्क  तयार करण्याचा काळ आहे पोमोने  मेटानारेटीव नाकारले  तर आपल्यावर netanarretiveतयार करण्याची जबाबदारी आलीये चौथी नवता हे माझे netanarretive  आहे अशी अनेक  netanarretivs जन्माला  यायला हवीत  पोमोने  सेमिओस्फिअर  तयार केले  आपणाला  बायोसाईनोवर्स 
तयार करता यायला हवे हे अत्यंत गुंतागुंतीचे आहे कारण एकीकडे ही गुंतागुंत  पकडायला दीर्घकविता , महाकविता आणि महागद्य  ह्यांची गरज आहे तर दुसरीकडे  एस एम एस , एम एम एस , ट्विट आणि फेसबुक च्या छोट्या आणि चमकदार पोस्ट मध्ये  वाढलेला नवा वाचक आहे  माझी अडॉ हॉ का  वाचली  न  जाण्याचे  एक  महत्वाचे  कारण  तिची  १०२४    पृष्ठे   आहेत  . ह्या  सामाजिक आणि सांस्कृतिक  परस्पर विरोधात   सृजनशील  काम  करणे हे  सोपे काम  नाही  . केवळ  चटकदार  किश्यातून  कंड  विझेल  लाईक्स   मिळतील  पण  आपला  भोवताल  पकडला  जाणार  नाही  एकीकडे   सिरियल्स  महिन्याला  २८०   व   वर्षाला   ३३६०    पृष्ठांचा   सलग  मजकूर  आत्ताच्या सामाजिक वास्तवावर  सादर  करत  आत्ताचे  जग  व्यावसाईक  दृष्टीकोनातून पकडत  असतांना आपले  कादंबरीकार  मुतल्यासारखे  काही लिहून  सुखी  पावतायत .२०० ,  ३००  पानांची  गोष्ट  ही  आत्ताच्या  युगात  कथा  किंवा  लघुकादंबरी  आहे  हे आता  स्पष्ट  सांगण्याची  वेळ  आली  आहे . 
ह्याचा अर्थ सर्वच कालबाह्य झाले आहे असे नाही शैव धम्माने दिलेल्या आणि जैन , बौद्ध धम्मानी अत्यंत व्यापक आणि जगभर पोहचवलेल्या सत्य , अहिंसा , अपरिग्रह आणि अचोर्य ही मुल्ये आजही तेवढीच महत्वाची आहेत त्यामुळेच ह्या सामाजिक वास्तवात कलाकाराने आपली चीन्ह्की सत्य , अहिंसा , अपरिग्रह किंवा सुपरिग्रह , अचोर्य आणि सुकाम ह्यांच्या आधारे चालवावी असे मला वाटते विक्रयजालात उत्पादनाची जागा सेमिओडक्शनने घेतली आहे आणि त्यात तो ही एक सेमीओडीटी आहे त्याची कलाकृतीही एक सेमीओडीटी आहे अशा वेळी सत्य , अहिंसा , अपरिग्रह किंवा सुपरिग्रह , अचोर्य आणि सुकाम ह्यांना स्वत :त शाबूत ठेवणे हे अवघड काम आहे कलेने सत्य सांगितले पाहिजे , हिंसेचा प्रतिरोध केला पाहिजे , प्रचंड आणि अनैतिक उपभोगाचे समर्थन टाळले पाहिजे , शोषणाच्या विरोधात ते चोर्य असल्याने आवाज उठवला पाहिजे आणि रेप सारख्या दु : कामांची निंदा करून सुकामाची प्रतिष्ठा वाढवली पाहिजे ह्या मूलभूतच गोष्टी आहेत कला ही मुळात निसर्ग युगाची देणगी आहे . ह्या युगाने कुटुंब आणि धर्म ह्या दोन गोष्टी दिल्या आणि कलेने हया दोन गोष्टींना चांगलेच पाठबळ पुरवले आहे . ह्यातील कुटुंब व्यवस्थेला दिलेले पाठबळ योग्य होते पण कलावंतानी धर्म ह्या गोष्टीला अजिबात पाठींबा देवू नये असे माझे मत आहे रामायण आणि महाभारत ह्या वैदिक , ब्राह्मणी आणि वैष्णव धर्मांचे समर्थन करणाऱ्या सिरियल्स मुळेच भाजप वाढीस लागला असे माझे मत आहे कलेने अध्यात्माचा पाठपुरावा केला पाहिजे धर्माचा न्हवे . सृष्टीयतेने आपल्याला विज्ञान दिले आणि विचारसरणीही दिली पारंपारिक विज्ञान आउटडेटेड
झाले आणि विचारप्रणाली  (आईडीयालॉजी ) मेल्या  आज आपण एका अशा युगात जगतोय जिथे धर्माचे , विचारप्रणालीचे  काय करायचे हे आपणाला कळत नाहीये त्यामुळेच विचारप्रणाली आधारित राजकारणाचा अंत झाला आणि पोकळी निर्माण झाली  ही पोकळी  इतकी  प्रचंड  होती  कि ह्या पोकळीचे काय करायचे हे न कळलेला  मतदार  पर्याय म्हणून  भाजपकडे वळला हे असे का झाले त्याची चिकित्सा अत्यंत खोलात जाऊन   करण्याऐवजी   कालबाह्य झालेल्या विचारप्रणालींना कवटाळण्यात अनेकांची बुद्धी खर्च होतांना दिसतीये . सर्व अक्कल आमच्या प्राचीन ऋषीमुनींना  होती  आणि सर्व अक्कल आमच्या विचारप्रणालीकारांना होती असे म्हणणारे दोन्ही प्रकारचे लोक  सारखेच कर्मठ आहेत त्यातील पहिले प्रतिगामी कर्मठ आहेत तर दुसरे पुरोगामी कर्मठ आहेत  चौथ्या नवतेला ह्या दोन्ही कर्मठगीरीतून वाट काढायची आहे  ज्यावेळी सगळे जग समाजवादाचा  त्याग करत होते त्यावेळी इंदिरा गांधी भारताला घटनेत समाजवाद समाविष्ट करून मागे न्हेत होत्या आपल्या आईची चूक राजीव गांधींनी सुधारली  पण विश्वनाथ प्रताप सिंग सारख्या इंदिरावादी कर्मठ लोकांनी त्यांना पाडून पुन्हा एकदा देश मागे न्हेला पुढे पुन्हा एकदा नरसिंहराव आणि मनमोहनसिंग ह्यांनी राजीव गांधींचा व्यवस्थापनवादी  दृष्टिकोन  पुढे  न्हेला  आणि  चिन्हसृष्टीला चालना  दिली . काँग्रेसचे यश  कशात आहे हे अचूक हेरलेल्या  प्रमोद महाजन ह्यांनी व्यवस्थापनवादी  दृष्टिकोन  केवळ अपनवला  नाही तर त्यापुढे जाऊन चिन्हापन मास्टर करून भाजपची प्रचारपद्धती थेट चिन्हकीत दाखल केली . त्याउलट कॉंग्रेस चौथ्या नवतेचे महत्व न कळल्याने पारंपारिक विचारप्रणालीनिष्ठ नेहरूवादी इंदिरावादी मॉडेलमध्ये पुन्हा अडकली . काँग्रेसचा सत्यानाश बुढाऊपणामुळे झाला आहे अगदी राहुल गांधी आणि सुप्रिया सुळेही साठ वर्षाच्या म्हाताऱ्यासारखे बोलतात . ज्यावेळी काँग्रेस दुसऱ्या नवतेत म्हातारत होती त्यावेळी मोदीं  महाजनवाद स्वीकारून स्वत : चे रुपांतर राजकीय ब्रांडमध्ये करत होते  . परिणामी काँग्रेस  दिसेनाशी झाली आणि मोदी सर्वत्र  दिसले आणि  भाजप  प्रथमच  बहुमताने  निवडून आली . मोदी ही  एक चांगली जाहिरात होती पण  नुसत्या जाहिरातीने मार्केटला सदासर्वकाळ  फसवता  येत नाही  प्रॉडक्टमध्ये दम  लागतो  मोदिचीं आजची अवस्था ही  चिन्हसृष्टीची मर्यादा दाखवणारी आहे मोदींनी प्रेझेन्टेशन चांगले केले परफ़ॊरमंस चांगला  दिला पण ज्या कार्यशीलतेचि अपेक्षा होती ती कार्यशीलता दिसलीच नाही त्यातच दुष्काळ ठाकलाय त्यामुळे फ्लॉप प्रॉडक्टवरचे लक्ष्य विचलित करण्यासाठी आता सगळे धार्मिक आणि भावनाशील मुद्दे पुढे आणले जाणार . जेव्हा प्रॉडक्ट अंगभूत गुणवत्तेवर चालत नाही तेव्हा जाहिरात क्षेत्रात तो भावनिक मुद्दे कॅश करून विकला जातो हे आगामी निवडणुकीत प्रचंड होणार आहे प्रश्न असा आहे कि मुळात आपण हे सर्व होऊ का दिले ? कारण आपण सर्वांनी  चौथ्या नवतेकडे पाठ फिरवली .  चौथ्या नवतेकडे पाठ फिरवून ह्यापुढे निवडणुका जिंकता येणार नाहीत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जितक्या लवकर समजतील तेवढे बरे. विचारप्रणाली  मेल्या नाहीत  आपण त्यांना आपल्या कर्मांनी मारलं आणि असं मारलं कि त्या आता जिवंत होणार नाहीत पण त्यांच्यातील काही गोष्टी कधीही मरणार नाहीत ह्या गोष्टी आहेत सर्वाना समान संधी , लोकशाही व मतदानाचा हक्क , स्वातंत्र्य  आणि बंधुता  ! ह्या गोष्टी घेवून आपणाला पुढे जावेच लागेल . निसर्गयतेतिल  सुकुटुंब आणि कला
,  विश्वीयतेतील सत्य , अहिंसा , सुकाम , अचोर्य , अपरिग्रह  आणि सृष्टीयतेतील सर्वाना समान संधी , लोकशाही व मतदानाचा हक्क , स्वातंत्र्य  आणि बंधुता ह्यांचे रुपांतर आपणाला सुचिन्ह्कीत करावे लागेल आणि मग सुव्यवस्थापन आणि सुचिन्हापन ह्यांची कास धरून लोक कल्याण साधले पाहिजे अण्णा हजारेंचे आंदोलन हे सुव्यवस्थापनाची मागणी करणारे होते कारण काँग्रेस राजवटीत  सुव्यवस्थापन पूर्ण फाफल्ले होते . पण त्याचा ताबडतोब स्वीकार करून अण्णांना शांत करण्या ऐवजी काँग्रेस पारंपारिक नेहरूवादी चालढकल करत राहिली आणि लोकांत असा मेसेज गेला कि काँग्रेसला सुव्यवस्थापनात रस नाही ह्याचा फायदा भाजपने घेतला आणि आज भाजप सत्तेवर आहे . इतिहास साक्षी आहे कि वैदिकांना कधीही सुशासन देता आलेले नाही त्यामुळे हे शासनही कुशासनाकडे वळले तर आश्चर्य नाही प्रश्न असा आहे कि आपणाला त्याचा फायदा घेता येणार आहे का ? दुर्देवाने ह्याचे उत्तर नाही असे आहे आणि ह्या क्षणी सर्वात जास्त फ्रस्टेशन देणारे काही असेल तर हे राजकीय वास्तव आहे . अशा ह्या निराश आणि उद्विग्न करणाऱ्या सामाजिक महाजालत्वात कलावंतानी
निसर्गयतेतिल सुकुटुंब आणि कला ,  विश्वीयतेतील सत्य , अहिंसा , सुकाम , अचोर्य , अपरिग्रह  आणि सृष्टीयतेतील सर्वाना समान संधी , लोकशाही व मतदानाचा हक्क , स्वातंत्र्य  आणि बंधुता ह्यांचे रुपांतर  सुचिन्ह्कीत
करत सुव्यवस्थापन आणि सुचिन्हापन ह्यांची कास कलेत धरत कलानिर्मिती
केली पाहीजे. 
७. 
 मला
फारशी कल्पना नाही पूर्वी माझे वाचन अद्ययावत होते २०११ ते २०१५
पर्यन्त  निर्वाण हीच  माझी प्राथमिकता  होती त्यामुळे वाचनापेक्षा तपश्चर्या आणि प्राणम  हेच चालले होते
मला आता खिडक्यातून दिसणाऱ्या आकाशापेक्षा स्वत :च्या
घराची साफसफाई जास्त महत्वाची वाटते . 
८.  
नैतिककतेमध्ये बदल झालेले तर साफच दिसतात खोटे बोलणे ही आता समाजमान्य कला झाली आहे . आत्ताची पिढी सेक्सबाबत आधीक फ्री झाली आहे मी जेव्हा  १९९४ -९८  दरम्यान लिव इन रिलेशनशिपमध्ये 
होतो तेव्हा तो एक सामाजिक आगाऊपणा होता पण आत्ता तसे कुणी मानताना दिसत नाही सेक्सची फ्रीक्वेनसी पर डे वाढलेली आहे अ . डॉ . हॉ . का . बा . ना . सु . ना . तले  काल्पनिक जग हे प्रत्यक्षात आलेले दिसते हे नवे अनुभव विश्व कलेत आलेले आहे उदाहरणार्थ संजीव खांडेकरांच्या द्र्क कलेत ते आलेले दिसते चौथ्या नवतेचे सर्वच कवी हे जग पकडतायत अर्थात पूर्वीची जुन्या पिढीची चाटुगीरीची पद्धत  ह्या पिढीत 
कळसाला पोचलेली दिसते लाइक्संना किती लाईक करायचे आणि डोक्यात घेवून नाचायचे ह्याचा विवेक अनेकांचा गेलेला आहे आत्ताचा कलावंत नैतिकतेबाबत आधिक दिवाळखोर बनला आहे कि काय अशी शंका यावी अशी काही manipulations चाललेली दिसतात कलावंताला जग फाट्यावर मारता आले पाहिजे दुर्देवाने कलावंत जगासाठी ,  यशासाठी  कला आणि नैतिकता फाट्यावर मारायला निघालेला दिसतो . 
 
९. 
एकतर मराठीचे हिंदीकरण आणि इंग्लीशिकरण
वाढलेले आहे मराठी माणसाला मराठी भाषेत प्रेम करता येत नाही अशी गैरसमजूत झाली आहे कि काय ? उर्दूचे फालतू कौतुक किती करायचे ह्याचे काही प्रमाण ? वास्तविक मराठी गझलकारांनी उर्दूपेक्षा सरस गझला लिहायला सुरवात केली आहे तरीही उर्दुचीच लाल ? एकाध्या संस्कृतीने किती आत्मविश्वास गमवावा आणि किती न्यूनगंड बाळगावा ह्याचे काही प्रमाण ? खावे तेच जे गरजेचे आहे आणि मग पचवावे तेही पोटाविषयी विश्वास बाळगत ! मराठीचे पोट दमदार आहे . परप्रांतीयांचे
हिंदी आक्रमण हा खरा चिंतेचा विषय आहे एकेकाळी मराठी बोलणारा मारवाडी गुजराती आणि दाक्षिणात्य समाजही आता महाराष्ट्राची भाषा हिंदी आहे असे गृहीत धरून हिंदीत बोलतो आहे आणि ह्याचा मराठी संस्कृतीवर होणारा परिणाम भीषण असणार आहे . मराठी संस्कृती ही दाक्षिणात्य
संस्कृति आहे ह्याचा विसर सर्वच मराठीजनांना
पडत चाललेला दिसतोय ह्याचा सामाजिक परिणाम अटळ आहे मराठी संस्कृतीचे  झपाट्याने   उत्तरीकरण  घडते आहे . हा प्रश्न जसा आहे तसा बघण्याऐवजी आपण
फक्त राज ठाकरेंना शिव्या घालतोय आणि आपला पुरोगामीपणा सिद्ध करतोय . त्याने प्रश्न
कसा सुटणार? एखादी गोष्ट जेव्हा मूळावर येते तेव्हा आईडीयोलोजी वगैरे सर्व गाढवाच्या
''गा'' त जाते . आज शिवसेनेला आधार आहे तो ह्याचा! शिवसेनेला हा प्रश्न सोडवायचा नाहीये
कारण तो सुटला तर शिवसेनेच्या अस्तित्वाची गरजच संपेल . एका अर्थाने पुरोगाम्यांनी विचारप्रणालीच्या नावाने तर प्रतीगाम्यांनी राजकारणासाठी मराठी संस्कृतीला आणि मराठी माणसाला वाऱ्यावर सोडले आहे मराठीला आता राजकीय पक्ष न्हवे तर राजकारण हादरवून गायब होणारी संयुक्त महाराष्ट्र सारखी संघटना हवी आहे जी मराठी संस्कृतीचे रक्षण करायला सर्वस्व पणाला लावेल . असे काही झाले तरच मराठी वाचेल अन्यथा हिंदी मराठीला गिळंकृत करेल . अनेकांना हे दिसत नाहीये कारण भाषा नष्ट होण्याचा इतिहास त्यांना माहीत नाहीये . 
१०.  
खरेतर जग सपाट झालय हा भ्रम आहे जग स्क्रीनल झालय आणि प्रत्येक गोष्ट चिन्हसृष्टीमुळे
स्क्रीनवर येतीये एकेकाळी स्क्रीन सपाट होते त्यामुळे जग सपाट वाटले पण भविष्यात ते तसे राहणार नाहीत लवकरच  जग होलोग्रामिकल होईल  . ह्या  होलोग्रामिकल जगात काहीही देशीवादी टिकणार नाही जे देशी जागतिक होण्याच्या लायकीचे असेल तेच टिकेल त्यामुळे देशीवादी ह्या संकल्पनेला काहीही मूल्य राहणार नाही . ह्यावर मी टीकाहरण नावाचे एक पुस्तकच लिहिले आहे ते जिज्ञासूनी वाचावे . 
११. 
 कलाकार आणि समीक्षक ह्यांचा परस्परांशी संबंध सध्याच्या काळात ''तू माझी लाल कर मी तुझी लाल करतो '' असाच आहे एकमेकाला चढवणारे प्रमोशन ग्रुप ही तर मराठीची खासियत  आहे  निखळ  गुणवत्तेवर कलामीमांसा करणारी माणसे मराठीत नेहमीच कमी होती आणि आत्ताही ती कमीच आहेत अगदी नेमाडे सारखा लेखकही आपल्या गोतावळ्याच्या बाहेर जात नाही तिथे इतरांचा काय पाड ? खवचट बोलणे आणि स्पष्ट बोलणे ह्यात फरक आहे . मराठी माणूस स्पष्टवक्ता आहे ही मराठी माणसांनी उडवलेली अफवा आहे मराठी माणूस अमराठी माणसापुढे जे सायेब सायेब म्हणत लाचारीचे आणि लाळघोटेपणाचे प्रदर्शन  करतो ते पाहण्यासारखे
आहे  . महाराष्ट्र अमराठी माणसांना विकला कुणी ? लाच खाणारे आणि कागदपत्र बनवून देणारे अधिकारी मराठी न्हवते काय ? मराठी माणूस मराठी माणसापुढे खवचट आणि अमराठी माणसापुढे पैश्यासाठी आणि इतर गोष्टीसाठी  लाचार आणि लाचखाऊ  असा आहे . ज्ञानपीठ मराठी माणसांचे पारितोषिक असते तर मी खात्रीने सांगतो ज्याला ते मिळाले  असते त्याची खवचटपणाने मराठी माणसांनी टरच उडवली असती त्यामुळे थेट बोलणारा माणूस मराठीला आवडत नाही आणि मराठी समीक्षेला ! त्यामुळे मराठी समीक्षा जोवर एखादी नवता आऊट डेटेड होत नाही आणि त्या नवतेचे बहुतांशी लेखक मरून जात नाहीत तोवर त्यांची समीक्षाच करत नाही मेलेला माणूस हाताळणे सोपे असते मराठी समीक्षा फक्त  मेलेल्यांनाच हाताळते विलास सारंगांच्या वर लिहिताना मी म्हंटले होते '' मराठी हि प्रतिगामी
संस्कृती असल्यानेच मराठीत कायमच विचार करण्याऱ्या प्रतिभावंत माणसाला तो
हयात असताना दाबायचे ,त्याच्या
आसपासच्या  मिडीओकर
लोकांना प्रोत्साहन द्यायचे , मग तो
मेल्यानंतर त्याच्या नावाने गळा काढून त्याला डोक्यावर घेवून नाचायचे आणि आमची
मराठी संस्कृती कशी पुरोगामी आहे ते गळा फाडून सांगायचे अशी एक  मेल्यानंतर
मानसन्मान देण्याची मर्तीकी परंपरा आहे जगात विश्वीय युगात धर्माला आव्हान
देणारे जे साहित्य जन्मले  त्यातून जगातला पहिला व्यक्तिवाद जन्मला . त्याचे
स्वरूप हे प्रामुख्याने अध्यात्मिक होते.  एका अर्थाने हा
अध्यात्मिक व्यक्तिवाद होता . त्याने प्रस्थापित धर्माला गदागदा हलवले . मराठीत
ह्या व्यक्तिवादाची स्थापना ज्ञानेश्वर  चक्रधर आणि नामदेव  ह्या
त्रयीने  केली .  ह्यातील ज्ञानेश्वरांना मराठी संस्कृतीने  बहिष्कृत
केले होते  आणि पुढे त्यांना समाधी  घ्यायला लावली . चक्रधरांचा बहुधा
दाभोळकर-पान्सरेन्च्याप्रमाणे खून
झाला आणि नामदेवांना त्यांच्या घराण्याचा विठ्ठल मंदिरावरचा हक्क सोडायला लावून  शेवटी घुमान मध्ये सेटल  व्हायला भाग पाडले . ह्या व्यक्तिवादाचा
कळस होता तुकाराम ! हा एक अफलातून कवी होता आणि त्याच्या हयातीत मराठी लोकांनी  त्याला जितका त्रास देता येईल तितका दिला .  ज्ञानेश्वर
 चक्रधर आणि नामदेव  ह्या त्रयीबाबत  ती मराठीने पार पाडली
आणि ह्यातील प्रत्येक लेखक मेल्यानंतर मराठी लोकांनी
त्यांला मराठी संस्कृतीत  सेटल करून घेतले . पुढे इंग्रज लोकांच्या राज्यात सृष्टीय युग पुन्हा आले.  त्यातून
ज्योतिबा फुलेंनी समाजप्रधान  प्रबोधनवाद आणि वास्तववादाची पायाभरणी केली .
मराठीत त्यानंतर  दुसरा
व्यक्तिवाद जन्मला तो सौंदर्यवादाच्या रूपाने . केशवसुतांच्यात प्रथम त्याचे पडसाद
उमटले पण त्याची पायाभरणी बालकवींनी केली . ज्ञानेश्वर  चक्रधर आणि नामदेव  ह्या
त्रयीबाबत जे केले तेच मराठी संस्कृतीने केशवसुत व बालकवींच्या बाबत केले.  हे लेखक
मेल्यानंतर मराठी संस्कृतीत मराठी लोकांनी त्यांना सेटल करून घेतले  '' चौथी नवता बहुधा मेल्यानंतरच मराठी संस्कृती सेटल करून घेईल आणि त्यामुळे मी खात्री देतो मी मेल्यावर ही मुलाखत फार महत्वाची ठरेल . 
 
No comments:
Post a Comment