४२ पारंपारिक परिवर्तनवादी मित्रांसाठी एक कविता /श्रीधर तिळवे
मी तुमच्या कुठल्याही आयडीऑंलॉंजीत बसणारा मनुष्यच न्हवे
मी नवदर्शनातून जन्मलेला चिन्हपुरुष आहे
जो वर्तमानाच्या भयप्रद वाळवण्टात कवितेची अध्यात्मिक शेती करतो आहे
आणि इतिहासजमा होत चाललेल्या आपल्या आयुष्याच्या डफलीवर
आपल्या ईररेग्युलर बोटांनी नवी गहनता वाजवतो आहे
माझी MATRIX तुम्हाला अगम्य आहेत ह्यात माझा काय दोष ?
ही टेन डायमेन्शनल सुपरसिमेट्रीक SAND-BODY
तुमच्यासाठी दुर्लभ - माझ्यासाठी सुलभ
माझ्या तीव्र संतापाचे फ्लोमॉडेल
तुमच्यावर अनप्रेडीकटेबल बनून आदळते म्हणून
मी माझ्या आवेगाचे CHANNEL थोडेच बंद करू ?
माझ्या त्वचेच्या बॉउंड्रीलेयर्स टरब्यूलेटिंग होत नाहीत म्हणून
मी माझे साईटशोविंग थोडेच ऑफ करू ?
मी समकालीन वाऱ्याला माझ्या श्वासात सिम्युलेट करतो म्हणून
तुम्ही एवढे जेलस का ?
कोसीनSQUARED फुफ्फुसाची टेकडी
माझ्यात रोज नवे आकार धारण करते म्हणून
तुमच्या आकलनार्थ
मी PAUSE ची न्यूमेरिकल STABILITY धारण करावी
हा अट्टाहास का ?
माझ्या glamour चा बेडफॉर्म
तुमच्या टोपोग्राफीत बसणारा नाही
माझ्या ऑराचे फ्लो कॉम्बीनेशन
तुमच्या स्केलमॉडेलमध्ये सामावणारे नाही
माझ्या परिवर्तनवादी मित्रांनो
मी वादी नाही
तर साक्षात परिवर्तन आहे
तेव्हा तुमची ट्रान्सपोर्ट सिस्टीम मी उधार घेत नाही म्हणून
मला दोष नका देवू
मी तुमच्या कनक्लूजनला रिलायबल मॉडेल्स पुरवत नाही म्हणून
मला कन्फुजनल शिव्या नका घालू
मी सोल्यूशनेबल नाहीच
माझी मिक्सिंगलेंग्थ
अनंत पावलांनी येणाऱ्या जालयुगाचा वर्डफ़ोलिओ शूट करते आहे
माझी रेफरन्स टचहाईट
भाषेचा अझ्युम्ड रफनेस
थोडा टची करते आहे
तेव्हा व्हा थोडे टचेबल
माझ्या बुटेबल पायात पाय ठेवून
माझ्या सरफेसचा स्पीडप
तुमच्याशी करन्सपॉन्ड करेल आणि तो थोडा सुधारेल
माझी त्वचा तुमच्या काळजांना पिसून
तुमच्या रक्ताला
थोडी डिफलेक्ट करेल मग रिफ्लेक्ट करेल
तेव्हा बघताय काय
सामील व्हा वाळवण्टात जन्माला आलेल्या
ह्या वॉटरसुपरसिमेट्रीला
अन्यथा
गाफीलपणाचे डाऊनग्रेडीयन्तस
वाटच पाहतायेत
तुमच्या मोडीत चाललेल्या पावलांची
जा त्यांना भंगारमध्ये विकून
फेमस करणारे डाऊनपेमेंट घ्या
आणि काळाच्या हॉटेलातून चेकऑऊट करा
मी ड्रेनेज नेटवर्क माझ्या शेजारी ठेवूनच फिरतो आहे
श्रीधर तिळवे -नाईक
(क . व्ही . २ ह्या काव्यफायलीतून )
No comments:
Post a Comment