Sunday, June 28, 2015

 संन्यासी आहेस
बुद्धापासून शंकराचार्यापर्यंत
बसवेश्वरापासून ओशो जीकेपर्यंत
सगळ्यापासून संन्यास घे

कटोरा आहेस
जी उपजीविका कटोऱ्यात पडेल
तिने जीव जगव
लोकांना काय सोशल रोल हवे असतात
तू कटोरा सोडू नकोस

पैसे खिश्यापुरतेच कमव
आजचा खिसा आजच फाड

नागडा रहा सर्व स्पॉन्सर कपड्यात
घरे भाड्याने घे
मालकी गुलाम बनवते

जे आत आहे तेच बोल
गांडू असशील तेव्हा गांडू आहेस असच म्हण

मुमेंट टू मुमेंट
जगू नकोस
 फक्त अस

आत्ता ह्या क्षणी ही कविता

 श्रीधर तिळवे -नाईक
(डेकॅथ लॉं न  : अनकॅटेगरीकल  ह्या काव्य फायलीतून  )
४१ आऊटडेटेड /श्रीधर तिळवे 

एकच नेटवर्क आहे 
सर्वांच्याबरोबर शेअर करत वाटचालतोय 

पृथ्वीपासून पळत नाहीये 
पृथ्वीमधून पृथ्वीभर उडतो आहे 

प्रतिमा पाठवतोय 
आणि  बायोकॉपिजही 

घनदाट शक्यतांचा पातळ माईन्डसेट 
आणि मेंदू install करणारा मॉसल डिझायनर 

पायाविना पसरतोय 
आणि कालच्या वाटचालीचा कचरा 
सकाळी उठल्याउठल्या आवरतोय 

आऊटडेटेड व्हायचे नाही 
पण आत्ताही ह्या क्षणी 
झालोय कि नाही 
खात्री नाही 

श्रीधर तिळवे -नाईक 
(क व्ही २ ह्या काव्यफाइलीतून )

Saturday, June 27, 2015

४० मुक्ति /श्रीधर तिळवे -नाईक 

माझ्यात कितीही मी असतील 
माझा देह जोवर एक आहे 
तोवर एकसंध मी सत्य आहे 

मी माझा फायनल ड्राफ्ट नाही 
मी जनुकीय जालाचे केवळ उद्घाटन आहे 
हे दुकान कितीकाळ चालणार मला माहित नाही 

माझे इंटेरियर ' सुपरसिमेट्रीचे मूळ ' आहे 

मी त्या झाडाचा इक्वेलीब्रीयम आहे 
ज्याची स्पिरिच्युअल पॉंसिबिलीटी फळ आहे 
जे खाऊन मी ईश्वर बनवणार आहे 

ह्या रेसीपीचे मी फक्त मटेरियल आहे 
आणि तुम्ही मला विचारताय 
रियल म्हणजे काय 

ईश्वर तयार होतोय 
पण त्याला तुम्ही ओळखू शकणार नाही 
कारण तो मी नाहीये 

तो माझ्यापासून तयार होतोय 

श्रीधर तिळवे -नाईक 
(क व्ही २ ह्या काव्यफायलीतून )

Friday, June 26, 2015

३९  नीघ / श्रीधर तिळवे 



तू ते देतोयस
जे ह्या संस्कृतीला पचत नाहीये

तू ते कपडे घालतोयस
जे वाळवायला ह्या संस्कृतीला अंगणच नाहीये

तू एक अशी कोल्हापुरी चप्पल आहेस
जी कोल्हापूरला पचली नाही

तू एक असा मुंबईकर गमबूट आहेस
ज्याने इथला पावसाळा पचवला
पण जो इथल्या पाण्याला पचलाच नाही

तू ह्या संस्कृतीचे असे अजीर्ण आहे
जे पोटातून फेकताही येत नाही
आणि पोटात ठेवताही येत नाही

अशा सर्वांनाच नकोश्या झालेल्या लोकांच्यात
तू च्युतीयासारखा काय करतोयस श्रीधर

संस्कृती ही समाजाने मारलेली शेवटची थाप आहे
तरी तुझी ह्या संस्कृतीत अशी तुझी दैना करणारी घूटमळ का

कि तुझ्या अंगातला हा शेवटचा मळ आहे ?

निघ बाबा
झाला तेवढा सिनेमा खूप झाला

चुकून सिनेमास्कोप दिसलास तर तुझ्या शरीराच थीअ टर फोडतील

नीघ !

श्रीधर तिळवे -नाईक
(क व्ही २ ह्या काव्य फायलीतून )

Tuesday, June 23, 2015

३८ वाऱ्यावरती विरून गेलेल्या विराण्या /श्रीधर तिळवे 


वाऱ्यावरती विरून गेलेल्या विराण्या

बासरी डिजिटल
कॅसिओत अंग जप्त झाले तरी श्वास फुन्कणारी

कॉम्पुटरमध्ये यैसपैस म्हस आणि रेडा

जंगल मे मंगल और डिजिटलमे दंगल

त्वचा सोलून दिली तर देताना स्क्रीन झाली

गंगेत घोडं न्हायील म्हणे तोवर गंगा बिस्लरीत पळालेली

VIRTUAL होता आलं नाही
विज्युअल होता आलं नाही
झालो काय तर विजुअलच्या पल्याडच्या ढगाला हात लावणारा कवी

रसिक पण असे कि कवितेतही चित्रपट आणि टीव्ही मालिका शोधणारे

दोस्त तर महानालायक
माझी मुळे खाऊन जागतिक फळे खाणारे

आता ह्या शिल्लक असलेल्या एकांताच्या मैदानावर
 विकेट उडायची वाट बघतोय तर
मृत्यू बॉल न टाकता
नेट PRACTICE साठी यमाकडे चाललेला

त्याला बहुधा कळून चुकलय
साध्या पाशाने काम होणार नाही
संपूर्ण नेटवर्क आवळावे  लागेल .

श्रीधर तिळवे -नाईक
(कव्ही २ ह्या काव्य फायलीतून )




Sunday, June 21, 2015

३७ तू शेतकरी आहेस /श्रीधर तिळवे 

कवी काय नागडे होणार ?

कविता हाच कपडा 

खरेतर फक्त गिरणी कामगारच 
स्वताच्या गिरणीतले कपडे वापरतात एवढच 

कापसाने मिसकॉल दिला का ?

तू शेतकरी आहेस 
तुझी कविता पीकापासून सुरु झाली पाहिजे 

श्रीधर तिळवे -नाईक 
(क . व्ही . २ ह्या  काव्यफायलीतून )

Saturday, June 20, 2015

३६ मुक्त गझल /श्रीधर तिळवे 

डोन्ट गो अवे 
आयल मेक अ वे 

बालकवी कधीच मेले 
उडतायत  पारवे 

किसने दिया जलाया 
काळजात पेटले काजवे 

घर कुठेही आढळले नाही 
द व्होल सिटी लुक लाईक गेटवे 

वन नाईट स्टे होता 
रक्तातून निघाले कालवे 

श्रीधर तिळवे -नाईक 

(क . व्ही . २ ह्या काव्यफाईलीतून )

Thursday, June 18, 2015

३५ वेग / श्रीधर तिळवे 

निसर्गाने प्राण पुरवला 
विश्वाने उर्जा 
सृष्टीने मटेरीअल दिले 
प्रतिसृष्टीने structure 

आता चिन्ह्सृष्टी घेऊन येतीये 
चिन्हवेग आणि चिन्हगति 

जो फास्ट तो फस्ट 
जो स्लो तो लास्ट 

आता फक्त वेगायचे 
वेगात बसून धावायचे 
वेग देत धावायचे 
वेगायचे 

माझ्यात वेगाचा ब्लास्ट झालाय 
आणि माझे सर्वच तुकडे फक्त वेगतायत 

मृत्यू येईल
 तेव्हाच एकसंध होतील 

तोवर आहेतच 
वेगाची आवेगी निशाचरे 
आणि काळजात तीव्रतेची बिअर !

श्रीधर तिळवे -नाईक 
(क व्ही  २ ह्या  काव्यफाइलीतून )

Wednesday, June 17, 2015

३४ कविता /श्रीधर तिळवे 

प्रथम मी कविता कागदावर लिहली 
मग मी कागदावर ते लिहले 
ज्याला कविता म्हंटले जाते 

आता मी कवितेत कागद लिहतोय 
तर आख्खी रद्दी चालून येतीये माझ्यावर 

स्पॅमचा ऑप्शन मला अवेलेबल नाही 
आणि रद्दी डीलीट करण्याचा सोफ्टवेअर 
माझ्या laptop वर तयार झालेला नाही 

रद्दी मला गीळतिये 
आणि मी रद्दीच तोंडही न पाहता 
कागद लिहित 
तिच्या गुदद्वारातून बाहेर पडतोय 

एक झाड सर्वत्र उगवतय 
आणि लोकांना माहित नाही 
तो मी लिहलेला कागद आहे 

श्रीधर तिळवे -नाईक 
(क व्ही २ ह्या काव्यफाईलीतून )

Monday, June 15, 2015

३३ मांजर , वाघ आणि माउस /श्रीधर तिळवे 

catastrophe कडून mousastrophe कडे सरकणारा काळ 
मांजर वाघाला बीलोंग करायची 
माउस कुणाला बिलोंग करतो ?

कॅटवॉक अस्थेटिकली strong 
 माउस वॉक करायला कुणाला आवडेल ?

इन्फर्मेशन बोडक्यावर बसली म्हणून 
डोके थोडेच बदलणार आहे ?

पडद्यावर मी मेलो वा जखमी झालो 
तर प्रत्यक्ष मला कुठे इजा होणाराय ? 

मग माझं रक्त का घाबरतंय ह्या mousastrophe ला ?

कि हा माउस मांजराला गिळून 
सिलिकॉन काशीत जाऊन 
माझेही पुण्य कमवेल 
ह्याची मला भीती वाटतीये ?

पडद्यावर मांजर ऐटीने कॅटवॉक करत 
प्रकाशझोत कमावतीये 
आणि माउस मंदगतीने 
कीबोर्ड बडवत 
डिलीटकडे सरकतोय 

माझ्या रक्तात वाघ नाहीसे होतायत 

श्रीधर तिळवे -नाईक 
(क . व्ही . २ ह्या काव्यफाइलीमधून )

Sunday, June 14, 2015

३२ मेकअप लावून जगणाऱ्याचा तांडा /श्रीधर तिळवे 

आपण फेमस होणार नाही 
ह्याचे भय बाळगत 
मेकअप लावून जगणाऱ्याचा हा  तांडा
कुठे चाललाय ?

डीसमेम्ब्रिंग करणारा हा स्ट्रगल 
त्यांना नेहमीच भीतीदायक वाटतो का ?

स्वतःचा वारसा इरेज करत 
प्रस्थापितांचा वारसा सोसत 
योग्य त्या वाराची वाट पहात 
ते अभिनयाच्या तलवारीला धार काढतायत 
शरीर वाऱ्यावर घासत 

एक अनसेटल कल्पनाविलास 
अनसिग्नीफिकंट /magnificent  दरम्यान 
दोलायमान होत राहण्याचे पर्मनन्ट प्रपोजल 

स्वतःच्या करिअरचे landscape दिसत नाही 
पण प्रत्येकाच्या खिश्यात 
स्वतःच्या प्रतिभेचा फोटो आहे 

डोळ्यांना  identity दिसत नाही 
पण फेम दिसते 

मोर आणि डायनासॉर 
ह्यांना एकत्र नाचवणारे हे शहर 
माणसाहारी आहे 
हे त्यांना फक्त ऐकून माहित आहे 
आणि माहीती कन्फर्म करायला लागणारा निवांत वेळ 
हे शहर त्यांना देत नाहीये 

ग्लोबल झालेला कोकोकला पीत 
ते  struggle करतायत 
दिवसरात्र
रात्रंदिवस 

काळ त्यांना struggle मध्ये मुरवतोय 
पण त्यालाही माहीत नाही 
ते काय होणार आहेत 
लोणचे कि मुरंबा ?

श्रीधर तिळवे -नाईक 



Friday, June 12, 2015

३१ आणि मला 

समुद्र रक्तात आहे कि स्क्रीनसेवरवर 

जहाजे MANMADE आहेत कि मशीनमेड 

पाणी डाउनलोड होतय कि पीपीटी 

बीपमध्ये सरोवर आहे कि डबक 

मी BACKSPACE दाबतोय 
आणि मला रक्ताच्या उलट्या होतायत 

श्रीधर तिळवे -नाईक 
(क . व्ही . २ ह्या अप्रकाशित काव्यफाईलीतून  )चॅनेल सीरीज 
काबा जाके तुम क्या करोगे श्रीधर
तुम तो पत्थर हो  पत्थरही  रहोगे
श्रीधर तिळवे -नाईक 

Thursday, June 11, 2015

३० पिझ्झाहंटनंतर /श्रीधर तिळवे 

एका टिश्यूपेपरवर समग्र उष्ट 

पोटात गेलेले पिझ्झाटायगर 
नीट पचतायत बहुतेक 
जठराचा एपिक SLAB 
डाव उजवं नीट चघळतोय 

प्रोटीन्सची SPANISH गीटार 
परफेक्ट तंतुतारा जुळवतीये आतड्यात 

मैदद्य्याचा हिडन डेंजरझोन 
खाजगी निवडीत माझा चेंदामेंदा करतोय 

एक लम्बोदर पाद कधीपासून सभ्यतेत अडकून 

त्याला कळत नाहीये 
आवाज न करता सभ्यतेतून कसं बाहेर पडायचं ?

श्रीधर तिळवे -नाईक 
(क . व्ही . २ ह्या  आगामी कवितासंग्रहातून )

Wednesday, June 10, 2015

२९ तोंडाला फेस आणण्याऱ्या/देण्याऱ्या  फे . बु . रेगे ह्यांच्या फेसार्थ 

कवितेत कवी जो फेसबुकावर फेस ठेवतो 

असते फेसबुकच पुन्हा त्या फेसात 
जो फेस कवितेत कवी म्हणून उमटतो 


फेसबुकत जे  कवितेत कवी म्हणून  ठेवतो 
असतो कविताच फेस म्हणून त्या फेसबुकात
जो कवी फेसात फेसबुक म्हणून उमटतो 


फे . बु . तिळवे -नाईक 
(क व्ही २ ह्या आगामी कवितासंग्रहातून )

Tuesday, June 9, 2015

२८

 समतोल /श्रीधर तिळवे 


फेसबुक , आर्कूट ,ट्वीटर आणि मी 
काहीच फरक नाही 

वाचायचे काचायचे टाचायचे 
फेक व्हायचे फेकायचे 

मश्रुमच्या माश्या होतायत म्हणून 
डंख ओरीजनल होणार आहेत का ?
मध रियल होणार आहेत का ?

hackersनी आयुष्य क्लेम केलय 
ही विटम्बना कि कीर्तीमहाल ?

डिजिटल स्फोट मांसल होतायत 
आणि डोळे त्यांना बांधून घेत 
मेंदूला सेल्फ madness मध्ये उडवतायत 

सर्वत्र माझीही आयडी फेक 

ही मडोनाची disorder नाही 
स्पेकट्रमचा कॉम्प्लेक्स ब्रेनbalance आहे 
श्रीधर तिळवे -नाईक 
(आगामी क व्ही २ ह्या    काव्यसंग्रहातून )

Monday, June 8, 2015

२७ 

मिररींग वल्ड /श्रीधर तिळवे 

मला आत जाऊन
स्वतःचा प्रेझेन्स नाहीसा  करायचा आहे
आणि मी आहे कि
ज्ञानवृक्षाच्या contacts मध्ये
माझी मोबिलिटी फळपूर्वक सादर करतो आहे

माझ्या हॉलमध्ये असंख्य रंगीबिरंगी ऑपरेटर्स
त्यांच्या डोळ्यात मी उपस्थित नाही
ते त्यांच्या संगणकावर दृष्टी टोकवत
स्वःताला सादर करण्यात मग्न

कुणी इपेपर वाचतोय
कुणी टोरन्टवरून मुवीज डाउनलोड करतोय

मी माझ्या अमेरिकन मैत्रीशी chat करतोय
तिला दूरवर कधीकाळी होऊन गेलेल्या किंवा काल्पनिक
पण योगसुत्राने अस्तित्वात असलेल्या पतंजलीविषयी
माहिती हवी आहे तिचे प्रश्न माझ्या स्पिरिच्युअल स्मायलीज

मला शेजारच्या मुलीला विचारायचे आहे कि
ती नोकीयावर कोणत गाण आईकतीये
पण ती संगीताने शोषली जातीये
आणि तिला मी दिसत नाहीये

माझ्या समोरच्या टेबलावर फेस टू फेस कोणी बसलाय
त्याचे नाव काय
गेले दोन महिने त्याला मी नाव विचारायचे म्हणतोय
पण स्वारी संगणकात अशी तोंड खुपसून
जसा घोडा हरभऱ्यात

माझा बॉस तर चोवीस तास पोर्नोबाजित घुमणारा
त्याच्या अंगावर कपडे आणि डोळे मात्र नागडे
बुबुळे कायम इलेक्ट्रोनिक रेकोर्डिंग चालू असल्यासारखी

मोबाईल वाजला कि लोक पूर्वी डोकं वर काढायचे
आता तर रिंगटोन ऐकून सोडून देतात लोक
ज्याचा त्याला

डाव्या बाजूचा नेहमीप्रमाणे कॉम्पुटरगेम  खेळण्यात मग्न
त्याचा active फ्लो स्क्रीनवर ठहराव घेऊन

जे मांसल नाही त्याच्याशी संवाद साधत
ज्याची त्याची आगेकूच

मला फक्त डोकी दिसतायत
मेंदू आरसेबाजी करत नेटवर्कमध्ये
बीटबोल्ड गायब

श्रीधर तिळवे -नाईक 

(आगामी क व्ही २ मधून )

Sunday, June 7, 2015

ग्राफीटी 

२६
कविंनी ग्राफिटी लिहायला सुरवात केलीये 

व्यक्तिमत्वे सुलभ शौचालायासारखी झालीयेत का ?

भिंती स्लिक होतायत 
द WALL होतायत 

शेवटी कविंची इज्जत करायला हवी 

लेखणी स्विंग होतीये 
सिगरेट आणि कॉफ्फी दरम्यान 

साखरेचे शुगरफ्री क्यूब 
आणि लिक्विड मिठाची शाही ट्यूब 

इथेही वाचक नसल्याने 
कवी फक्त नाश्ता करतायत 

वॉलवरची स्वनिर्मित ग्राफिटी 

मला संशय आहे 
ते आंधळे आहेत 

किंवा 

ही वॉल  चालवत चालवत 
ते थेट चांगदेवापर्यंत पोहचणार आहेत 

श्रीधर तिळवे -नाईक 
(आगामी क . व्ही २ मधून )

Wednesday, June 3, 2015


 ( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )
 १कविंनो , तुम्ही कवितेच्या धंद्याला तयार आहात का ?श्रीधर तिळवे

कविंनो ,
एकविसाव्या शतकातील कविंनो


साधारण एक मिल्लीयन डोळे डीजीटल
पण कवितेला अवेलेबल फक्त दहा



इन्टरनेटवर नग्नता सिडक्शनचि लाल बाराखडी गिरवत बॉडीफोय होतीये
कम्युनिकेशनचि battery all time चार्ज होतीये
इन्फरमेशनला fashion चा दर्जा प्राप्त होतोय
आणि जो तो तिने डीझाईन केलेले कपडे घालून वेबसाईटतोय


ह्या बेसुमार काळात
कवितेच्या कपड्याखाली बॉडीच उरलेली नाहीये
कवितेची battery हृदयाला रिचार्ज करत नाहीये
कवितेच्या वेबसाईटवर कुणी राहायला येत नाहीये


अश्यावेळी कवितेच्या धंद्याला तुम्ही तयार आहात का कविंनो ?


चेहऱ्यांना मेकप करून त्यांना मुखवटा बनवणारे सौंदर्यशास्त्र आसपास
विशफील थिंकिंगचा सोप ओपेरा सादर करणारे व्यवहारज्ञान थेट श्वासात


हे पाईपड्रीम आहे की पाईपांचा बिझनेस आहे ?
हे टेकचे फ्युचर आहे कि रीवोल्युशनचे फीचर आहे ?


कंपन्या रीस्कमध्ये भळभळतायत कि फळफळतायत ?
हा काळावरचा आक्षेप आहे कि काळातला हस्तक्षेप आहे ?


माणसाला डीजीटीव नेटिव बनवणारा हा काळ
काळजाला सोशल मेडीआ बनवणारा हा इंटरनेटचा फाळ


कवितेचे फळकूट घेवून कुठे जाणार आहात कवींनो ?


जो स्नूझर  तो लूझर
जो गेट तो ग्रेट


कॉम्पुटरपुढे सर्व समान
कॉम्पुटरपुढे सर्व सामान


साईझ इररिलेवन्ट होत चाललेल्या ह्या अवकाशात
कवितेच्या फॉर्मवर कसली बोडक्याची चर्चा करताय कवींनो ?


सर्वत्र रिटर्न मिळण्याऱ्या ह्या काळात
कवितेवर परतावा नाही
जगभर पळाली तरी
कौऊटिंगमध्ये तिच्या नावाने धावा नाहीत


ती चेंजचा ईवोल्विङ्ग फोर्स नाही
ती कशाचाही ओरीजनल सोर्स नाही


ना बेटर ना चीपर ना फास्टर
ना सेवर ना लीपर ना सर्वर


ती मार्केटमध्ये इतकी इररीलेवंट
कि तिला धन्द्यालाही बसवता येत नाही


ती पाळीत कायमची उभी  कवींनो
मुलांना जन्म देवून जळतिये तिची नाभी


ती वाचकात नाहीशी होणार नाही
ती वाचक नसल्याने नाहीशी होणार आहे


तेव्हा
सेकंदाला दहा लाख ढग तयार करण्याऱ्या ह्या कूल वादळात
कवींचे कुल
एप्रिल फूल आहे………………कवींनो


 ( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

श्रीधर तिळवे
क व्ही २/ श्रीधर तिळवे 

action ईज टर्नड इनटू acting 
बॉडी has बिकम मेकप 
इंटीलीजन्स इज जस्ट अ सोफ्टवेअर 
and इमोशन्स केमिकल लोच्या 

ट्रोन्सफ़ोरमर्स सर्वत्र बदल करायला सज्ज 
रीवोल्युशन्स ही हरदम घडवली जाणारी 
स्पोन्सरेबल इव्हेंट 

मीच होतो आहे आरटीफ़िशिअल फिनोमीना 

मृत्यू भेटेल तेव्हा ओरीजनल होईन . 

श्रीधर तिळवे 

क व्ही २/ श्रीधर तिळवे 








टाटू /श्रीधर तिळवे 

हत्ती उंट कि कुत्रा 
कुणाचा tattoo काढू ?

हात छाती कि पाठ 
कुठे tattoo काढू ?


एटरनल वार्षिक कि पाक्षिक 
किती काळ टिकणारा काढू ?

काढून घेणारे उतावळे 


मी विचारात संपलो .

श्रीधर तिळवे 

४ माझी कविता / श्रीधर तिळवे 

सगळच बाजारात सरकवण्यात येतंय
आणि मी
जो कधी ईश्वरावर कुर्बान झाला नाही
कि राष्ट्रासाठी ज्याने हौतात्म्य स्वीकारले नाही

ज्याने गुड democrate आणि गुड communist वा socialist व्हायला
कायम नकार दिला

स्वतःच्या दारावर पहारा देतोय

माझे घर अद्याप बाजार झालेले नाहीये

धर्माचे mall
 ideology चे mall
management चे mall
उभे करून
बाजार माझ्या दारात उभाय
आणि मी फक्त अध्यात्म बनून
स्वतःची नाणी पाडायला नकार देतोय

खरेतर भाषाही सेल ला लागून
शेवटी विकली गेलीये

माझी सर्व बाजूंनी कोंडी केली गेलीये

मी मरण्याआधीच
माझ्या शवाचा वास
सर्वत्र धाडण्यात आलाय
माझ्या हाताची सालटी सोलून
माझं नशीब हिस्कावण्यात आलंय
माझी कविता jokology चा syllabus झालीये

तरीही गरम रक्ताच्या झऱ्यात
मी आंघोळ करतोय
माझे श्वास
हवेवर ''प्राण'' लिह्तायात

माझी प्रत्येक होम डीली व री
बंद करण्यात आलीये

काहीही करून मी बाजारात उतरावे म्हणून
हे प्लांनिंग आहे

management चे school पचवलेले लोक मला पटवताय त
प्रत्येक माणूस कसा commodity आहे

आणि तरीही मी माझ्या आत्म्यात
गोसीपच्या फुशारक्या मोडून काढत
येणारा प्रत्यक्ष क्षण ''जिवंत '' वाजवतोच आहे

रोज कुरियरने येणाऱ्या फॉर सेल च्या पाट्या
घराबाहेर फेक्तोच आहे

लोकांना वाटतय
मला वेड  लागलय
मला माहित आहे
मी माझ्या युगाची
कविता जगतोय .


श्रीधर तिळवे 

क व्ही २/ श्रीधर तिळवे 
बॉडी 
मी केवळ ऑर्गनाईज झालेली पेशींची पाशवी सेन्द्रीयता आहे का ?

टीशुजच्या टीशुज 
पेपरपासून बनलेली होमो जीनस झाडे 
माझ्यात अहोरात्र जागी 
मसल टिशश्यूची फसल प्रत्येक क्षणी वाढ-वति 

पेशींचा हा कलरफुल हंगामा 
सर्व हंगामात डान्स करत शिवनंगा
प्लाझ्मा मेम्ब्रान्सचा ट्रान्सडिस्को 
सायटोप्लाझ्मचे हेरीडेटरी मटेरियल 
हरदम परंपरेत स्टेज सेट करत  

प्रत्येक पेशी माझ्या फिजिकल body-स्टेटचा  नागरिक 
एका नागरीकातून दुसरा दुसऱ्या नागरीकातून तिसरा तीसऱ्यातून चौथा 
हा एक संरचित राजकीय प्लान आहे कि 
सायटोप्लाझ्मिक पुलांचे बहुपेशीय नेटवर्किंग ?

प्रत्येक पेशीला न्युक्लीयसचा टपोरा डोळा 
 स्वतःत   वाकून काय पाहतोय ?

अवयव ?
ईश्वर ?
सैतान ?
सत्ता ?
की फक्त स्वतःची  पेशीयता ?

बेसिक कम्पोनन्टची ओरीजनल सतत फोटोकॉपिवत 
काय रिपीट करतीये ?

मी केवळ blocks ची मांसबिल्डींग आहे का ?

सगळ एकत्र आलं कि सगळ सगळीकडे बदलत नाही का ?

मी माझ्या बॉडीला प्रश्न विचारतोय 
आणि बॉडी मला पूर्ण फाट्यावर मारत 
 स्वतःच्या प्रॉपर्टीज वाढवत 
सेल्युलर मुसंडीज मारतीये 

श्रीधर तिळवे /naik


 ( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )
क व्ही २/ श्रीधर तिळवे 
चेहरा 
श्रीधर तिळवे 
सिंग्युलर इफेक्टपासून मी हे पोस्टर बनवलय 

त्याच्या ब्याकग्राउंडवर पहाट walk घेतीये 
डाव्या कोपऱ्यात फस्ट लिस्ट आहे 
उजव्या हिट लिस्ट 


मधोमध माझ्या मेंदूपासून बनवलेला क्लोनल पाय आहे 
बुटावर त्याच्या शेजारी वूडबस्टर चा ठसा 


ज्यांना माझा चेहरा हवाय त्यांच्यासाठी दिलाय एक option 
तळटीपेत कॅपिटलात 


 W W W  .SHRIDHAR TILVE . COM 
वर क्लिक करा 
आणि फेसइफेक्ट मिळवा 

मला हे पोस्टर सर्वत्र लावायचे आहे 
आणि माझा चेहरा आहे कि 
अद्याप अवतरलेला नाही 


क व्ही २/ श्रीधर तिळवे 
मला काय ठाऊक ?

कवी आर्कुटच्या फुटपाथवर झोपी गेलेत 
कायमचे कि तात्पुरते 
नारायण सुर्वेना ठाऊक 

शक्तीपुंज माझी प्रेयसी मला रिप्लेस करून 
अमेरिकेला गेलीये 
नवा प्रियकर शक्तिमान कि  superman
दिलीप चित्रेंना ठाऊक 

चांगदेव मिनीएचर्समधील सिंहावर आरूढ होऊन 
माझ्या कवितेत ज्ञानेश्वरांचा   इमेलआयडी शोधतोय 
मिळाला कि नाही 
अरुण कोल्हटकरांना ठाऊक  

ईश्वर वन नाईट stand साठी 
अभिताभ बच्चनच्या बंगल्याबाहेर उभाय 
कुणी भेटली कि नाही 
वसंत डहाकेंना ठाऊक 

गोलपीठा आख्खी मुंबई mallमध्ये शिल्गावतोय 
शिलगली कि बिलगली 
नामदेव ढसाळांना ठाऊक 

श्रीधर तिळवे 
आरश्यातला आरश्यात वारला बेवारशी 
त्याने मनोहर ओकची परमिशन घेतली होती कि नाही 
मनोहर ओकलाच ठाऊक 


श्रीधर तिळवे 












क व्ही २/ श्रीधर तिळवे 
सगळ कोरसमध्ये चाललय 
सगळ कोरसमध्ये चाललय 


सोलो गाणाऱ्याला च्युत्यापात धाडल जातय 

गोतावळा stamrतोय आणि बक्षिसे मिळवतोय 

स्वःताला सिलेक्ट करणारे 
थेट स्पॅममध्ये जाताय्यत 

सुजेला त्सुनामी समजा 
आणि हजारो fans मिळवा 


दरवाजे विंडोजची नोकरी करतायत 
आणि विंडोज घरातल्या माणसांना हाताळतायत 

कविता फक्त स्वप्नातच स्फुरतायत 
वास्तवात फुरफुरतायत 

अंतहीन जोडण्यांची फक्त वर्णने 

मी कविता लिहणार होतो 
तर हात जगायला अमेरिकेला चाललाय 

श्रीधर तिळवे 
जतीन साठी केलेला उपदेश 


रॉक करण्याचे दिवस संपले
अमेरिकन डायमंड खऱ्या भावात विक

डोण्ट कनफ्युज
भाषा प्लास्टिक आहे
काहीही बनू शकते

निवड हीही सक्ती असू शकते
कधी कधी विंडो शॉपिन्गही कर

विजेचे लोड्शेडींग चालू असताना
इन्फरमेशनच्या मुबलकतेवर चर्चा नको

ईण्टींमेट हो इंटेन्स हो
पण डाव्या खिशात नेहमी कंडोम बाळग

ईश्वर तुझ्यामाझ्याप्रमाणेच  एकटा आहे
आस्तिकच बनणार असशील  तर
त्याला डिस्टर्ब न करता प्रार्थना कर

न - असण्याला घाबर आणि मृत्युनंतर काहीच परतत नाही
हे  ओळखून नात्यांना सांभाळ

राजकारणात पडणार असशील तर एक सांगतो
हा जागा न बदलणारा समाज आहे

श्रीधर तिळवे
 ( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )



खादाड 
१०
श्रीधर तिळवे 

झाडे सूर्यप्रकाश खाऊन गुजारा करतायत 
प्राणी झाडे खाऊन गुजारा करतायत  
नॉन्वेज प्राणी व्हेज प्राण्यांना खाऊन गुजारा करतायत 


लम्प स्वतःला स्पिन करून 
एकाच डिस्कमध्ये स्वतःला कोंबून 
महालम्प्च्या पोटात चाललेत 


महालम्प आपला सारा सूर्य प्रकाश माळून 
एका अज्ञात पोटात चाललेत 
जे काळे कि गोरे हेही त्यांना माहित नाही 

प्रत्येकजण भक्ष्य आहे 
प्रत्येकजण शिकारी 

एक आहारसाखळी चालू आहे सर्वत्र 

अपघात होतात 
पण ते कुणाच्याच लक्ष्यात रहात नाहीत 

मी डायनोसर आठवणीत म्यान करून 
मेमरीबाजीत डिजिटलतोय 

ह्या डायनोसरमुळे मी कधीकाळी भूमिगत झालो होतो 
आणि आज त्यांना मी भूमीतून फ़ोस्सिलवत उभे करतो आहे 

माझ्या सूक्ष्म असण्याने त्यांच्यावर कधीकाळी मात केली होती 
हा विचारच मेंदूला हायबरनेट करतोय 

ते जिवंत असताना त्यांना त्यांच्या टिकण्याविषयी 
आत्मविश्वास वाटला असेल का ?
आणि जेव्हा ते नष्ट होत होते 
तेव्हा त्यांना ते नष्ट होत आहेत हे कळले असेल का ?

प्रकाश त्यांनीही खाल्ला असेल 
झाडे त्यांनीही खाल्ली असतील 
प्राणी त्यांनीही खाल्ले असतील 
पण मिटींऑर डोक्यावर आदळायला येत असतांना 
त्यांना त्याचा सुगावा तरी लागला असेल का ?

आहाराची साखळी डिस्टर्ब करायला हा कोण आगंतुक आला 
असे त्यांनी विचारले असेल का ?
कि त्यांनी त्याला खाण्याचा विचार केला असेल ?

कदाचित ते निर्बुद्ध म्हणूनच मेले असतील 
किंवा फक्त खादाड म्हणून 

खाली वाकून खाताना डोक्यावर काय पडते आहे 
ते थोडच दिसत ?

आपल्या डोक्यावर ग्लोबल वार्मिंग लटकते आहे 
आणि ये दिल मांगे मोर म्हणत 
डायनासरच्या फ़ॊसीलभवती बसून 
आपण कोक पितोच आहोत ना ?

श्रीधर तिळवे 



क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )








११

रिसेशन 

श्रीधर तिळवे 



miracle मागणारी कंपनी 

magic मागणारा बॉस 

गोस्सिप मागणारी मैत्रीण 

रिटर्न मागणारे शेअरहोल्डर्स 



अंधश्रद्धा निर्मुलन समिती 
इथेही अल्पमतात 


मी रीझाईन करून 
ही कविता लिहितोय . 

श्रीधर तिळवे नाईक 

 alice  इन कॉम्पुटर  land / श्रीधर तिळवे 

१२

गुंतागुंतीचा करंट करंट 
मोटिवेशन डब करतोय उमलत्या एरियात 

सिम्बोइसिसला सतरा तोंन्ड इन्टरनेटीन्ग्ची  अन 
ट्रेण्डसच्या अठरापगड जाती च्यानेलमुडी 

alice इज इनसीक्युर इन हर कम्प्युटरland हो ना alice ?

मेसेज ड्रोपऑउट होतायत तुझ्या श्वासल डिझाईनमधून 

काळीजरक्षक गुप्ततॆ तून  अध्याप नरभक्षक वहात नाहीये 
पण कधीही वाहील 

चल जिवंतपणाची अडवायजरी  कमिटी  नेमू 
आणि ह्या ब्यांफलिंग ब्याटल्स लढायला प्रपोज करू 

माझा कोड्ब्रेक्रर हात इनफेमस झालाय म्हणून काय झालं ?
ह्या डीफिकल्ट टू ब्रेकमधून ब्रेकथ्रू मिळवून देईन 
तहहयात कंपनीला 

आत्ता ह्यातही तुला इनबिल्ट जेलचा चेहरा दिसत असेल 
तर माझ्या स्वातंत्र्याचा नाईलाज आहे 

जा पळण्याऱ्या जहाजासारखी 

मात्र एक लक्ष्यात ठेव 

पळण्याऱ्या जहाजाच्या गांडीला 
समुद्र ढुंकूनही पहात नाही 

जा तुझी एकुलती एक न्यूड  body 
लीड करत alice 

( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

सफर  /श्रीधर तिळवे 
१३
परतताना चार्म उरलेला नाहीये 

माउथवॉश केला तर दात मावळले 
चमत्कार केला तर चेहऱ्यावरील जादू मावळली 

ब्युटीपार्लरमध्ये थांबलो तर ग्रेस गेली 
बोलायला गेलो तर तोंडात ब्रेकडाऊन 

अक्सिसना अक्सेस मिळाला नाही
 रिलेशनशिपला सक्सेस 

प्रेक्षक मावळले 
रिसिव्हर मावळले 
कम्युनिकेशन मावळले 


उगवायचा प्रयत्न केला 
तेव्हा कळाले 
पेरलेलेच न्हवते काही 

मग इन्फ़्लुएन्स न टाकता 
मुकाट परतलो 
नवा पासवर्ड टाकण्यासाठी 

 ( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )
१४
पेजर /श्रीधर तिळवे 
पेजर व्हायब्रटरतोय 
मेसेज डोक्यात जातोय 
पुन्हा पेजरमध्ये परततोय 


तीन बटण तीन दिशा 
अविरत पण भसाभसा 
माझं प्रेत वाहतय 

सर्व सखोल पेजरत पेजरत 
उथळ होतय 
श्रीधर तिळवे 

 ( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

१५ 
किर्केगार्द काफ्का काम्यू हायडेगर सात्र ह्यांच्यासाठी एक कविता 
श्रीधर तिळवे 
अस्तित्वावर निर्णय सोपवण्याचे दिवस 
संपत चाललेत 
अस्तित्व आहे फक्त  फुटबाल 
ज्याच्याशी मैदानात उतरलेले कुणीही खेळतय 


आता चोईस हा त्रास नाही 
चंगळ आहे 
प्रत्येकाच्या वाट्याला आलेली 

आता आत काय आहे विचारू नकोस 
जे काही असेल ते फक्त जाहिरात असेल 

बाहेर काय आहे ते स्पष्टच आहे 


सर्वच विक्रीला ठेवले गेले आहे 
आणि ग्राहक म्हणून तुला काही हक्कही दिले गेले आहेत 

फक्त तुला स्वःताला विकायचे आहे 
जेणेकरून तुला जे हवे आहे 
ते तू खरेदी करू शकशील 

हे डील आहे 
आणि ह्यातून मुक्तता नाही 


तेव्हा सर्वस्व पणाला लावून स्वः ताला विक 
 खरीदला गेला नाहीस तर 
पडून पडून एक्स्पायर होशील 


स्वः ताला न विकण्याचे स्वातन्त्र्य तुला आहे 


पण ह्या स्वातन्त्र्यात आणि मरण्यात 
काहीच फरक नाही 


मला आनंद आहे कि तू स्वातंत्र्य निवडलंस 


बघ 
बाजाराच्याबाहेर मरणाचा आनंद आहे 

आनंद !

श्रीधर तिळवे-नाईक 

क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

 

फुले /श्रीधर तिळवे  

१६

फुलांचा सुवास ओळखता न आल्याने 
माझ्या खोलीतील रिअल माळी फुलांत नाहीसे होतायत 

इन्टरनेटवर सुवास नाही 
आणि फुले अशी कचकचीत नवी कि

मला कळत नाहीये ह्या नव्या फुलांचा 
सामना कसा करावा

जगातले प्रत्येक फुल इन्टरनेटवर थोडेच आहे?

 फुले  माझ्या दारावर थापा न मारता 
जमतायत 
त्यांना त्यांच्याविषयी शास्त्रीय माहिती हवीये 

केवळ सुवासाने माळी नाहीशी करणारी फुले 
रिअल फुले
मला ओळखता येत नाहीयेत 

माझ्या घराची बाग हादरलिये 
अबोली लाल पडतीये 
अनंत अंत शोधतोय 
जास्वंदी ओसाड गावची महाराणी बनतीये 

थेट घरात घुसणारी ही पहलीच   फुले  
आख्खी नागेशी शांत आहे 

फुले शंकराचा तिसरा डोळा असल्यासारखी 
मला LAPTOP ला   थेट पाहतायत 

बाग हादरलिये माळी नाहीशी झाल्याने 
माझे घर जे फुलण्यासाठी फेमस होते 
ह्या फुलांमुळे आपण बदनाम होणार म्हणून 
भिंतीत येरझाऱ्या करतय 

ओळख झाली कि सामना करता येईल म्हणून मीही 
फुलांची आय़्डेण्टीटी शोधतोय 
 फुले  माझ्या आसपास बसून नागडा स्क्रीन पाहतायत 
फुलांना कधीपासून ओळखीचे कपडे अंगावर लागू लागले ?

सर्च इंजिन नन्नाचा पाढा वाचतय 

LAPTOP वर  माझी बोट डिजिटल असल्यासारखी नाहीशी होतायत 

त्यांचा  सुवास माझ्या रूममध्ये  भोजन करतोय 

पुस्तके सीडीज डीविडीज फस्त होतायत 

मी नाहीसा होतोय 
आणि फुले कि -बोर्डाला रिप्लेस करत 
सुवासनृत्य करतायत  

श्रीधर तिळवे -नाईक 

 ( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

 

साउन्ड / श्रीधर तिळवे 

१७

स्टूडीओत डिजिटल स्फोट होतायत 

कानांत लोट 
आवाजातून लंगोट काढून घेऊन 
नग्न ध्वनी मेंदूपर्यंत सौम्यरस पीत हेलकांडतोय 

साउन्डची चित्रे अतिग्राफिकवादात माझा गळा  बुच्काळतायत 

माझा  टेरीरीस्ट  आवाज गातोय
आवाजातून गाणहीं  उगवतय 
मात्र त्याचा अर्थ लागत नाही 

निर्माता म्हणतोय 
गाण्यातून गाण्यात इनवेस्ट केलेला अर्थ प्राप्त व्हायला हवा 
आपली ''गुड अर्थ '' हलायला हवी 
बाकी अर्थ-बिर्थ निघाला निघाला 
नाही निघाला नाही निघाला 
आपणाला कुठ ऑस्करला जायचय ?

मी बहिरा होतोय 
मी ठार बहिरा होत गातोय  

साऊ न्ड रेकॉरडीस्ट म्हणतोय 
''हिट साहेब लय हिट 
पब्लिक डोक्यावर घेणार ''

श्रीधर तिळवे -नाईक  

क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )


 खरखर /श्रीधर तिळवे 

१८

ग्राविटीज  डिसलोकेट करून 
आत्मविश्वास बलाढ्यतेत उडतोय 


चांगले आणि वाईट 
दोघेही नक्कलच करतायत ट्रेण्डसची 

मी मेमरीजही ट्रान्झीटरी  करतोय 

अर्थाशिवायही शब्द उडवता  येतो 
फक्त अभिनयात विश्वास हवा 

मिडीयात  माझी वर्णने आहेत 


ही फोटोवरील खरखर व्हिडीओत काय खाजवतीये ?

श्रीधर तिळवे -नाईक 

1.1       क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )

 सेट /श्रीधर तिळवे
१९


प्रोप्स जांभया देतायत

शरीराच्या प्रत्येक modelled कॉर्नरवर
चान्स मोल्ड होतायत

कल्पनेचा त्याग केला तरी
fashion प्रोजेक्शन काल्पनिक

मी ramps चा मांजरात लिलाव करतोय

कुणीतरी कॅटवॉक करत येईलच येईल .

श्रीधर तिळवे -नाईक
(क. व्ही .  २ ह्या आगामी काव्यसंग्रहातून )




















चिमणी /श्रीधर तिळवे 
२०
नाव म्हणजे मी न्हवे 
इतकं शहाणपणही दुर्मिळ होत चाललय 

आकलनाचे कण 
मेंदूपासून वेगळे होतायत 

शहाणपण माहितीचा भुसा भरून 
मँनिफ़ेस्टेशनवर लटकतय 

एक चिमणी रोज तयार होतीये 
शुभशकुन घेतल्यासारखी घरट बांधायला 

मोबॊइल वाजतोय 
आणि ती त्याच्यात मरून पडतीये 

श्रीधर तिळवे -नाईक 

(क व्ही २ ह्या  अप्रकाशित  कवितासंग्रहातून )

 

अपेक्षा /श्रीधर तिळवे 

२१
लोक अतिस्वतंत्र झाले कि 
वाद म्हणून भांडायला लागतात 

लोक अतिगुलाम झाले कि 
वाद म्हणून बंड उभारतात 

मी ना अतिस्वतंत्र ना अतिगुलाम

विविधतेचा मला सराव आहे 
आणि ते जे आहे 
त्याला ठाव आहे 

जे ठाऊक  ते घाऊक 
जे ठाऊक नाही ते किरकोळीला MALL काढून देत 

मला मेमरीचा एनसायक्लोपीडीया फ्री करायचा नाहीये 
फक्त कवितेसाठी अवेलेबल होणारे SOFT पेज 
निर्विकार कोरे असावे 
एवढीच अपेक्षा 
ह्या गुरुत्वमध्यात आहे 

श्रीधर तिळवे -नाईक 
(क  व्ही  २   ह्या  आगामी अप्रकाशित  काव्यसंग्रहातून )

 २२ त्यांनाही माहित नाही / श्रीधर तिळवे 


माझ्या जीन्सचे हे natural  कलेक्शन 
रिअल पव्हिलिअनचे फोटोस्टील वाजवतंय 
फुलांनी तोंड बंद केलेल्या म्युझिकल नोटस अवगत करत 

कृष्णवर्णीय त्रीमितीयता डिझाईनमधून प्रकट करतीये 
सूर्यातही अस्तित्वात असलेली वजनदार स्पेस 
क्लास्सिकल मिनीएचर्सही समकालीन होतायत 
फोटोशोप्पिकल टाटूइफेक्ट्समध्ये 

माझे पोर्ट्रेट माझ्यापासून सुरु होते 
पण माझ्यापाशी संपत नाही 
डीजीटूल्स त्याला वाढीव सोंदर्य पुरवून 
डीस्पोज करतायत प्रतिसेकंद साठच्या स्पीडने 

रोमांटिक स्वभावाची झाडे 
शुभ्र शंखातून सौष्ठव फुन्क्तायात 
मात्र ते त्यांच्या भावनांचे आत्मचरित्र असेलच असे नाही 

एक इन्स्टालेश्नर आपल्या आईला 
installation म्हणून सादर करतोय 

माझ्या कार्सची चाकं रस्त्यावरून कविता लिहित धावतायत 
माझ्या स्वीम्मिंग tank मध्ये माझी गर्लफ्रेंड प्रत्यक्ष पोहतीये 
कि पोहण्याचा अभिनय करतीये 
हे सांगणे कठीण आहे 

हवेने कंट्रोल केलेला माझा श्वास 
माझ्या फुफ्फुसाचे डीजीशिल्प बनवतोय 

एक सब्लाइम grand सौंदर्य 
डोळ्यातून विजा कडाडवत 
शांतीचे बनावट मूग गिळत गप्प बसतय 

मी ह्या जगण्यात आनंदी आहे कि दु;खी 
हे मला ठरवता येत नाहीये  

मी उत्सव साजरा करायला सर्वांनाच बोलवलय 
आणि प्रत्येकजण डिझायनर्स कपडे घालण्यासाठी 
शहरातल्या डिझायनर्सना कॉल करतोय 

त्यांनाही माहित नाही 
उत्सव साजरा करताना 
ते आनंदी असणार आहेत कि दु : खी ?

श्रीधर तिळवे -नाईक 

(क व्ही  २ ह्या  अप्रकाशित  कविता संग्रहातून )

 २३

समोर आपल्या नावाने /श्रीधर तिळवे 

क्रिमिनल अंतरावर उभय यश
आयडीयाlogy गुन्हेगारी चेहरा करून
समोर अंगठे धरून उभी
दु:स्वप्ने रचून रचून
शिणून गेलेले शतक

स्व:ताच रक्तही  बनावट असल्याचा
संशयकल्लोळ
अधूनमधून काळजाच्या फेक गल्लीत
चकाचक चेक वाटले गेले अर्थांचे
पण authenticity वटवायला गेलो
तर सही अत्तरासारखी उडून गेलेली

A T M unlock करून
कॅश घेऊन पळाला सिक्युरिटी गार्डनर

समोर आपल्या नावाने फक्त एक कागदी फूल
With Love
And With God's Grace



श्रीधर तिळवे -नाईक