Sunday, June 14, 2015

३२ मेकअप लावून जगणाऱ्याचा तांडा /श्रीधर तिळवे 

आपण फेमस होणार नाही 
ह्याचे भय बाळगत 
मेकअप लावून जगणाऱ्याचा हा  तांडा
कुठे चाललाय ?

डीसमेम्ब्रिंग करणारा हा स्ट्रगल 
त्यांना नेहमीच भीतीदायक वाटतो का ?

स्वतःचा वारसा इरेज करत 
प्रस्थापितांचा वारसा सोसत 
योग्य त्या वाराची वाट पहात 
ते अभिनयाच्या तलवारीला धार काढतायत 
शरीर वाऱ्यावर घासत 

एक अनसेटल कल्पनाविलास 
अनसिग्नीफिकंट /magnificent  दरम्यान 
दोलायमान होत राहण्याचे पर्मनन्ट प्रपोजल 

स्वतःच्या करिअरचे landscape दिसत नाही 
पण प्रत्येकाच्या खिश्यात 
स्वतःच्या प्रतिभेचा फोटो आहे 

डोळ्यांना  identity दिसत नाही 
पण फेम दिसते 

मोर आणि डायनासॉर 
ह्यांना एकत्र नाचवणारे हे शहर 
माणसाहारी आहे 
हे त्यांना फक्त ऐकून माहित आहे 
आणि माहीती कन्फर्म करायला लागणारा निवांत वेळ 
हे शहर त्यांना देत नाहीये 

ग्लोबल झालेला कोकोकला पीत 
ते  struggle करतायत 
दिवसरात्र
रात्रंदिवस 

काळ त्यांना struggle मध्ये मुरवतोय 
पण त्यालाही माहीत नाही 
ते काय होणार आहेत 
लोणचे कि मुरंबा ?

श्रीधर तिळवे -नाईक 



No comments:

Post a Comment