Monday, June 8, 2015

२७ 

मिररींग वल्ड /श्रीधर तिळवे 

मला आत जाऊन
स्वतःचा प्रेझेन्स नाहीसा  करायचा आहे
आणि मी आहे कि
ज्ञानवृक्षाच्या contacts मध्ये
माझी मोबिलिटी फळपूर्वक सादर करतो आहे

माझ्या हॉलमध्ये असंख्य रंगीबिरंगी ऑपरेटर्स
त्यांच्या डोळ्यात मी उपस्थित नाही
ते त्यांच्या संगणकावर दृष्टी टोकवत
स्वःताला सादर करण्यात मग्न

कुणी इपेपर वाचतोय
कुणी टोरन्टवरून मुवीज डाउनलोड करतोय

मी माझ्या अमेरिकन मैत्रीशी chat करतोय
तिला दूरवर कधीकाळी होऊन गेलेल्या किंवा काल्पनिक
पण योगसुत्राने अस्तित्वात असलेल्या पतंजलीविषयी
माहिती हवी आहे तिचे प्रश्न माझ्या स्पिरिच्युअल स्मायलीज

मला शेजारच्या मुलीला विचारायचे आहे कि
ती नोकीयावर कोणत गाण आईकतीये
पण ती संगीताने शोषली जातीये
आणि तिला मी दिसत नाहीये

माझ्या समोरच्या टेबलावर फेस टू फेस कोणी बसलाय
त्याचे नाव काय
गेले दोन महिने त्याला मी नाव विचारायचे म्हणतोय
पण स्वारी संगणकात अशी तोंड खुपसून
जसा घोडा हरभऱ्यात

माझा बॉस तर चोवीस तास पोर्नोबाजित घुमणारा
त्याच्या अंगावर कपडे आणि डोळे मात्र नागडे
बुबुळे कायम इलेक्ट्रोनिक रेकोर्डिंग चालू असल्यासारखी

मोबाईल वाजला कि लोक पूर्वी डोकं वर काढायचे
आता तर रिंगटोन ऐकून सोडून देतात लोक
ज्याचा त्याला

डाव्या बाजूचा नेहमीप्रमाणे कॉम्पुटरगेम  खेळण्यात मग्न
त्याचा active फ्लो स्क्रीनवर ठहराव घेऊन

जे मांसल नाही त्याच्याशी संवाद साधत
ज्याची त्याची आगेकूच

मला फक्त डोकी दिसतायत
मेंदू आरसेबाजी करत नेटवर्कमध्ये
बीटबोल्ड गायब

श्रीधर तिळवे -नाईक 

(आगामी क व्ही २ मधून )

No comments:

Post a Comment