( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )
१कविंनो , तुम्ही कवितेच्या धंद्याला तयार आहात का ?श्रीधर तिळवे
कविंनो ,
एकविसाव्या शतकातील कविंनो
साधारण एक मिल्लीयन डोळे डीजीटल
पण कवितेला अवेलेबल फक्त दहा
इन्टरनेटवर नग्नता सिडक्शनचि लाल बाराखडी गिरवत बॉडीफोय होतीये
कम्युनिकेशनचि battery all time चार्ज होतीये
इन्फरमेशनला fashion चा दर्जा प्राप्त होतोय
आणि जो तो तिने डीझाईन केलेले कपडे घालून वेबसाईटतोय
ह्या बेसुमार काळात
कवितेच्या कपड्याखाली बॉडीच उरलेली नाहीये
कवितेची battery हृदयाला रिचार्ज करत नाहीये
कवितेच्या वेबसाईटवर कुणी राहायला येत नाहीये
अश्यावेळी कवितेच्या धंद्याला तुम्ही तयार आहात का कविंनो ?
चेहऱ्यांना मेकप करून त्यांना मुखवटा बनवणारे सौंदर्यशास्त्र आसपास
विशफील थिंकिंगचा सोप ओपेरा सादर करणारे व्यवहारज्ञान थेट श्वासात
हे पाईपड्रीम आहे की पाईपांचा बिझनेस आहे ?
हे टेकचे फ्युचर आहे कि रीवोल्युशनचे फीचर आहे ?
कंपन्या रीस्कमध्ये भळभळतायत कि फळफळतायत ?
हा काळावरचा आक्षेप आहे कि काळातला हस्तक्षेप आहे ?
माणसाला डीजीटीव नेटिव बनवणारा हा काळ
काळजाला सोशल मेडीआ बनवणारा हा इंटरनेटचा फाळ
कवितेचे फळकूट घेवून कुठे जाणार आहात कवींनो ?
जो स्नूझर तो लूझर
जो गेट तो ग्रेट
कॉम्पुटरपुढे सर्व समान
कॉम्पुटरपुढे सर्व सामान
साईझ इररिलेवन्ट होत चाललेल्या ह्या अवकाशात
कवितेच्या फॉर्मवर कसली बोडक्याची चर्चा करताय कवींनो ?
सर्वत्र रिटर्न मिळण्याऱ्या ह्या काळात
कवितेवर परतावा नाही
जगभर पळाली तरी
कौऊटिंगमध्ये तिच्या नावाने धावा नाहीत
ती चेंजचा ईवोल्विङ्ग फोर्स नाही
ती कशाचाही ओरीजनल सोर्स नाही
ना बेटर ना चीपर ना फास्टर
ना सेवर ना लीपर ना सर्वर
ती मार्केटमध्ये इतकी इररीलेवंट
कि तिला धन्द्यालाही बसवता येत नाही
ती पाळीत कायमची उभी कवींनो
मुलांना जन्म देवून जळतिये तिची नाभी
ती वाचकात नाहीशी होणार नाही
ती वाचक नसल्याने नाहीशी होणार आहे
तेव्हा
सेकंदाला दहा लाख ढग तयार करण्याऱ्या ह्या कूल वादळात
कवींचे कुल
एप्रिल फूल आहे………………कवींनो
( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )
श्रीधर तिळवे
क व्ही २/ श्रीधर
तिळवे
२
action
ईज
टर्नड इनटू acting
बॉडी has बिकम मेकप
इंटीलीजन्स
इज जस्ट अ सोफ्टवेअर
and
इमोशन्स
केमिकल लोच्या
ट्रोन्सफ़ोरमर्स
सर्वत्र बदल करायला सज्ज
रीवोल्युशन्स
ही हरदम घडवली जाणारी
स्पोन्सरेबल
इव्हेंट
मीच
होतो आहे आरटीफ़िशिअल फिनोमीना
मृत्यू भेटेल तेव्हा ओरीजनल
होईन .
श्रीधर तिळवे
क व्ही २/ श्रीधर
तिळवे
टाटू /श्रीधर तिळवे
हत्ती उंट कि कुत्रा
कुणाचा tattoo काढू ?
हात छाती कि पाठ
कुठे tattoo काढू ?
एटरनल वार्षिक कि पाक्षिक
किती काळ टिकणारा काढू ?
काढून घेणारे उतावळे
मी विचारात संपलो .
श्रीधर तिळवे
४ माझी कविता / श्रीधर तिळवे
सगळच
बाजारात सरकवण्यात येतंय
आणि
मी
जो
कधी ईश्वरावर कुर्बान झाला नाही
कि
राष्ट्रासाठी ज्याने हौतात्म्य स्वीकारले नाही
ज्याने
गुड democrate
आणि
गुड communist
वा socialist व्हायला
कायम
नकार दिला
स्वतःच्या
दारावर पहारा देतोय
माझे
घर अद्याप बाजार झालेले नाहीये
धर्माचे
mall
ideology
चे mall
management
चे mall
उभे
करून
बाजार
माझ्या दारात उभाय
आणि
मी फक्त अध्यात्म बनून
स्वतःची
नाणी पाडायला नकार देतोय
खरेतर
भाषाही सेल ला लागून
शेवटी
विकली गेलीये
माझी
सर्व बाजूंनी कोंडी केली गेलीये
मी
मरण्याआधीच
माझ्या
शवाचा वास
सर्वत्र
धाडण्यात आलाय
माझ्या
हाताची सालटी सोलून
माझं
नशीब हिस्कावण्यात आलंय
माझी
कविता jokology
चा syllabus झालीये
तरीही
गरम रक्ताच्या झऱ्यात
मी
आंघोळ करतोय
माझे
श्वास
हवेवर
''प्राण'' लिह्तायात
माझी
प्रत्येक होम डीली व री
बंद
करण्यात आलीये
काहीही
करून मी बाजारात उतरावे म्हणून
हे
प्लांनिंग आहे
management
चे school पचवलेले लोक मला पटवताय त
प्रत्येक
माणूस कसा commodity
आहे
आणि
तरीही मी माझ्या आत्म्यात
गोसीपच्या
फुशारक्या मोडून काढत
येणारा
प्रत्यक्ष क्षण ''जिवंत '' वाजवतोच आहे
रोज
कुरियरने येणाऱ्या फॉर सेल च्या पाट्या
घराबाहेर
फेक्तोच आहे
लोकांना
वाटतय
मला
वेड लागलय
मला
माहित आहे
मी
माझ्या युगाची
कविता
जगतोय .
श्रीधर तिळवे
क व्ही २/ श्रीधर
तिळवे
५
बॉडी
मी केवळ ऑर्गनाईज झालेली
पेशींची पाशवी सेन्द्रीयता आहे का ?
टीशुजच्या टीशुज
पेपरपासून बनलेली होमो जीनस
झाडे
माझ्यात अहोरात्र जागी
मसल टिशश्यूची फसल प्रत्येक
क्षणी वाढ-वति
पेशींचा हा कलरफुल हंगामा
सर्व हंगामात डान्स करत
शिवनंगा
प्लाझ्मा मेम्ब्रान्सचा
ट्रान्सडिस्को
सायटोप्लाझ्मचे हेरीडेटरी
मटेरियल
हरदम परंपरेत स्टेज सेट करत
प्रत्येक पेशी माझ्या
फिजिकल body-स्टेटचा नागरिक
एका नागरीकातून दुसरा
दुसऱ्या नागरीकातून तिसरा तीसऱ्यातून चौथा
हा एक संरचित राजकीय प्लान
आहे कि
सायटोप्लाझ्मिक पुलांचे
बहुपेशीय नेटवर्किंग ?
प्रत्येक पेशीला
न्युक्लीयसचा टपोरा डोळा
स्वतःत वाकून
काय पाहतोय ?
अवयव ?
ईश्वर ?
सैतान ?
सत्ता ?
की फक्त स्वतःची पेशीयता ?
बेसिक कम्पोनन्टची ओरीजनल
सतत फोटोकॉपिवत
काय रिपीट करतीये ?
मी केवळ blocks ची
मांसबिल्डींग आहे का ?
सगळ एकत्र आलं कि सगळ
सगळीकडे बदलत नाही का ?
मी माझ्या बॉडीला प्रश्न
विचारतोय
आणि बॉडी मला पूर्ण
फाट्यावर मारत
स्वतःच्या प्रॉपर्टीज वाढवत
सेल्युलर मुसंडीज मारतीये
श्रीधर तिळवे /naik
( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )
क व्ही २/ श्रीधर
तिळवे
६
चेहरा
श्रीधर तिळवे
सिंग्युलर इफेक्टपासून मी
हे पोस्टर बनवलय
त्याच्या ब्याकग्राउंडवर
पहाट walk घेतीये
डाव्या कोपऱ्यात फस्ट लिस्ट
आहे
उजव्या हिट लिस्ट
मधोमध माझ्या मेंदूपासून
बनवलेला क्लोनल पाय आहे
बुटावर त्याच्या शेजारी
वूडबस्टर चा ठसा
ज्यांना माझा चेहरा हवाय
त्यांच्यासाठी दिलाय एक option
तळटीपेत कॅपिटलात
W W W .SHRIDHAR TILVE . COM
वर क्लिक करा
आणि फेसइफेक्ट मिळवा
मला हे पोस्टर सर्वत्र
लावायचे आहे
आणि माझा चेहरा आहे कि
अद्याप अवतरलेला नाही
क व्ही २/ श्रीधर
तिळवे
७
मला काय ठाऊक ?
कवी आर्कुटच्या फुटपाथवर
झोपी गेलेत
कायमचे कि तात्पुरते
नारायण सुर्वेना ठाऊक
शक्तीपुंज माझी प्रेयसी मला
रिप्लेस करून
अमेरिकेला गेलीये
नवा प्रियकर शक्तिमान कि
superman
दिलीप चित्रेंना ठाऊक
चांगदेव मिनीएचर्समधील
सिंहावर आरूढ होऊन
माझ्या कवितेत ज्ञानेश्वरांचा इमेलआयडी
शोधतोय
मिळाला कि नाही
अरुण कोल्हटकरांना ठाऊक
ईश्वर वन नाईट stand साठी
अभिताभ बच्चनच्या
बंगल्याबाहेर उभाय
कुणी भेटली कि नाही
वसंत डहाकेंना ठाऊक
गोलपीठा आख्खी मुंबई mallमध्ये शिल्गावतोय
शिलगली कि बिलगली
नामदेव ढसाळांना ठाऊक
श्रीधर तिळवे
आरश्यातला आरश्यात वारला
बेवारशी
त्याने मनोहर ओकची परमिशन
घेतली होती कि नाही
मनोहर ओकलाच ठाऊक
श्रीधर तिळवे
क व्ही २/ श्रीधर
तिळवे
८
सगळ कोरसमध्ये चाललय
सगळ कोरसमध्ये चाललय
सोलो गाणाऱ्याला
च्युत्यापात धाडल जातय
गोतावळा stamrतोय आणि
बक्षिसे मिळवतोय
स्वःताला सिलेक्ट करणारे
थेट स्पॅममध्ये जाताय्यत
सुजेला त्सुनामी समजा
आणि हजारो fans मिळवा
दरवाजे विंडोजची नोकरी
करतायत
आणि विंडोज घरातल्या
माणसांना हाताळतायत
कविता फक्त स्वप्नातच
स्फुरतायत
वास्तवात फुरफुरतायत
अंतहीन जोडण्यांची फक्त
वर्णने
मी कविता लिहणार होतो
तर हात जगायला अमेरिकेला
चाललाय
श्रीधर तिळवे
जतीन साठी केलेला उपदेश
९
रॉक करण्याचे दिवस संपले
अमेरिकन डायमंड खऱ्या भावात
विक
डोण्ट कनफ्युज
भाषा प्लास्टिक आहे
काहीही बनू शकते
निवड हीही सक्ती असू शकते
कधी कधी विंडो शॉपिन्गही कर
विजेचे लोड्शेडींग चालू
असताना
इन्फरमेशनच्या मुबलकतेवर चर्चा
नको
ईण्टींमेट हो इंटेन्स हो
पण डाव्या खिशात नेहमी
कंडोम बाळग
ईश्वर तुझ्यामाझ्याप्रमाणेच एकटा आहे
आस्तिकच बनणार असशील
तर
त्याला डिस्टर्ब न करता
प्रार्थना कर
न - असण्याला घाबर आणि
मृत्युनंतर काहीच परतत नाही
हे ओळखून नात्यांना
सांभाळ
राजकारणात पडणार असशील तर
एक सांगतो
हा जागा न बदलणारा समाज आहे
श्रीधर तिळवे
( क .
व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )
खादाड
१०
श्रीधर तिळवे
झाडे सूर्यप्रकाश खाऊन गुजारा
करतायत
प्राणी झाडे खाऊन गुजारा करतायत
नॉन्वेज प्राणी व्हेज
प्राण्यांना खाऊन गुजारा करतायत
लम्प स्वतःला स्पिन करून
एकाच डिस्कमध्ये स्वतःला कोंबून
महालम्प्च्या पोटात चाललेत
महालम्प आपला सारा सूर्य प्रकाश
माळून
एका अज्ञात पोटात चाललेत
जे काळे कि गोरे हेही त्यांना
माहित नाही
प्रत्येकजण भक्ष्य आहे
प्रत्येकजण शिकारी
एक आहारसाखळी चालू आहे सर्वत्र
अपघात होतात
पण ते कुणाच्याच लक्ष्यात रहात
नाहीत
मी डायनोसर आठवणीत म्यान करून
मेमरीबाजीत डिजिटलतोय
ह्या डायनोसरमुळे मी
कधीकाळी भूमिगत झालो होतो
आणि आज त्यांना मी भूमीतून
फ़ोस्सिलवत उभे करतो आहे
माझ्या सूक्ष्म असण्याने
त्यांच्यावर कधीकाळी मात केली होती
हा विचारच मेंदूला हायबरनेट
करतोय
ते जिवंत असताना त्यांना
त्यांच्या टिकण्याविषयी
आत्मविश्वास वाटला असेल का ?
आणि जेव्हा ते नष्ट होत होते
तेव्हा त्यांना ते नष्ट होत
आहेत हे कळले असेल का ?
प्रकाश त्यांनीही खाल्ला असेल
झाडे त्यांनीही खाल्ली असतील
प्राणी त्यांनीही खाल्ले असतील
पण मिटींऑर डोक्यावर आदळायला
येत असतांना
त्यांना त्याचा सुगावा तरी
लागला असेल का ?
आहाराची साखळी डिस्टर्ब करायला
हा कोण आगंतुक आला
असे त्यांनी विचारले असेल का ?
कि त्यांनी त्याला खाण्याचा
विचार केला असेल ?
कदाचित ते निर्बुद्ध म्हणूनच
मेले असतील
किंवा फक्त खादाड म्हणून
खाली वाकून खाताना डोक्यावर काय
पडते आहे
ते थोडच दिसत ?
आपल्या डोक्यावर ग्लोबल
वार्मिंग लटकते आहे
आणि ये दिल मांगे मोर म्हणत
डायनासरच्या फ़ॊसीलभवती बसून
आपण कोक पितोच आहोत ना ?
श्रीधर तिळवे
( क .
व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )
११
रिसेशन
श्रीधर तिळवे
miracle मागणारी कंपनी
magic मागणारा बॉस
गोस्सिप मागणारी मैत्रीण
रिटर्न मागणारे शेअरहोल्डर्स
अंधश्रद्धा निर्मुलन समिती
इथेही अल्पमतात
मी रीझाईन करून
ही कविता लिहितोय .
श्रीधर तिळवे नाईक
alice इन
कॉम्पुटर land / श्रीधर तिळवे
१२
गुंतागुंतीचा करंट करंट
मोटिवेशन डब करतोय उमलत्या एरियात
सिम्बोइसिसला सतरा तोंन्ड इन्टरनेटीन्ग्ची
अन
ट्रेण्डसच्या अठरापगड
जाती च्यानेलमुडी
alice
इज
इनसीक्युर इन हर कम्प्युटरland हो ना alice ?
मेसेज ड्रोपऑउट होतायत तुझ्या श्वासल
डिझाईनमधून
काळीजरक्षक गुप्ततॆ तून अध्याप नरभक्षक
वहात नाहीये
पण कधीही वाहील
चल जिवंतपणाची अडवायजरी कमिटी
नेमू
आणि ह्या ब्यांफलिंग ब्याटल्स लढायला प्रपोज
करू
माझा कोड्ब्रेक्रर हात इनफेमस झालाय म्हणून काय
झालं ?
ह्या डीफिकल्ट टू ब्रेकमधून ब्रेकथ्रू मिळवून
देईन
तहहयात कंपनीला
आत्ता ह्यातही तुला इनबिल्ट जेलचा चेहरा दिसत
असेल
तर माझ्या स्वातंत्र्याचा नाईलाज आहे
जा पळण्याऱ्या जहाजासारखी
मात्र एक लक्ष्यात ठेव
पळण्याऱ्या जहाजाच्या गांडीला
समुद्र ढुंकूनही पहात नाही
जा तुझी एकुलती एक न्यूड body
लीड करत alice
( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )
सफर /श्रीधर तिळवे
१३
परतताना
चार्म उरलेला नाहीये
माउथवॉश
केला तर दात मावळले
चमत्कार
केला तर चेहऱ्यावरील जादू मावळली
ब्युटीपार्लरमध्ये
थांबलो तर ग्रेस गेली
बोलायला
गेलो तर तोंडात ब्रेकडाऊन
अक्सिसना
अक्सेस मिळाला नाही
रिलेशनशिपला सक्सेस
प्रेक्षक
मावळले
रिसिव्हर
मावळले
कम्युनिकेशन
मावळले
उगवायचा
प्रयत्न केला
तेव्हा
कळाले
पेरलेलेच
न्हवते काही
मग
इन्फ़्लुएन्स न टाकता
मुकाट
परतलो
नवा
पासवर्ड टाकण्यासाठी
( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित
कवितासंग्रहातून )
१४
पेजर
/श्रीधर तिळवे
पेजर
व्हायब्रटरतोय
मेसेज
डोक्यात जातोय
पुन्हा
पेजरमध्ये परततोय
तीन
बटण तीन दिशा
अविरत
पण भसाभसा
माझं
प्रेत वाहतय
सर्व
सखोल पेजरत पेजरत
उथळ
होतय
श्रीधर
तिळवे
( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित
कवितासंग्रहातून )
१५
किर्केगार्द
काफ्का काम्यू हायडेगर सात्र ह्यांच्यासाठी एक कविता
श्रीधर
तिळवे
अस्तित्वावर निर्णय सोपवण्याचे दिवस
संपत
चाललेत
अस्तित्व
आहे फक्त फुटबाल
ज्याच्याशी
मैदानात उतरलेले कुणीही खेळतय
आता
चोईस हा त्रास नाही
चंगळ
आहे
प्रत्येकाच्या
वाट्याला आलेली
आता
आत काय आहे विचारू नकोस
जे
काही असेल ते फक्त जाहिरात असेल
बाहेर
काय आहे ते स्पष्टच आहे
सर्वच
विक्रीला ठेवले गेले आहे
आणि
ग्राहक म्हणून तुला काही हक्कही दिले गेले आहेत
फक्त
तुला स्वःताला विकायचे आहे
जेणेकरून
तुला जे हवे आहे
ते तू
खरेदी करू शकशील
हे
डील आहे
आणि
ह्यातून मुक्तता नाही
तेव्हा
सर्वस्व पणाला लावून स्वः ताला विक
खरीदला गेला नाहीस तर
पडून
पडून एक्स्पायर होशील
स्वः
ताला न विकण्याचे स्वातन्त्र्य तुला आहे
पण
ह्या स्वातन्त्र्यात आणि मरण्यात
काहीच
फरक नाही
मला
आनंद आहे कि तू स्वातंत्र्य निवडलंस
बघ
बाजाराच्याबाहेर
मरणाचा आनंद आहे
आनंद
!
श्रीधर
तिळवे-नाईक
( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित
कवितासंग्रहातून )
फुले /श्रीधर
तिळवे
१६
फुलांचा सुवास ओळखता न
आल्याने
माझ्या खोलीतील रिअल माळी
फुलांत नाहीसे होतायत
इन्टरनेटवर सुवास नाही
आणि फुले अशी कचकचीत नवी कि
…
मला कळत नाहीये ह्या नव्या
फुलांचा
सामना कसा करावा ?
जगातले प्रत्येक फुल
इन्टरनेटवर थोडेच आहे?
फुले माझ्या दारावर थापा न मारता
जमतायत
त्यांना त्यांच्याविषयी
शास्त्रीय माहिती हवीये
केवळ सुवासाने माळी नाहीशी
करणारी फुले
रिअल फुले
मला ओळखता येत नाहीयेत
माझ्या घराची बाग हादरलिये
अबोली लाल पडतीये
अनंत अंत शोधतोय
जास्वंदी ओसाड गावची
महाराणी बनतीये
थेट घरात घुसणारी ही पहलीच फुले
आख्खी नागेशी शांत आहे
फुले शंकराचा तिसरा डोळा
असल्यासारखी
मला LAPTOP ला थेट
पाहतायत
बाग हादरलिये माळी नाहीशी
झाल्याने
माझे घर जे फुलण्यासाठी फेमस
होते
ह्या फुलांमुळे आपण बदनाम
होणार म्हणून
भिंतीत येरझाऱ्या करतय
ओळख झाली कि सामना करता
येईल म्हणून मीही
फुलांची आय़्डेण्टीटी शोधतोय
फुले माझ्या आसपास बसून नागडा स्क्रीन
पाहतायत
फुलांना कधीपासून ओळखीचे
कपडे अंगावर लागू लागले ?
सर्च इंजिन नन्नाचा पाढा
वाचतय
LAPTOP वर माझी बोट डिजिटल असल्यासारखी नाहीशी
होतायत
त्यांचा सुवास माझ्या
रूममध्ये भोजन करतोय
पुस्तके सीडीज डीविडीज फस्त
होतायत
मी नाहीसा होतोय
आणि फुले कि -बोर्डाला
रिप्लेस करत
सुवासनृत्य करतायत
श्रीधर तिळवे -नाईक
( क .
व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )
साउन्ड / श्रीधर तिळवे
१७
स्टूडीओत डिजिटल स्फोट होतायत
कानांत लोट
आवाजातून लंगोट काढून घेऊन
नग्न ध्वनी मेंदूपर्यंत सौम्यरस पीत हेलकांडतोय
साउन्डची चित्रे
अतिग्राफिकवादात माझा गळा बुच्काळतायत
माझा टेरीरीस्ट आवाज
गातोय
आवाजातून गाणहीं उगवतय
मात्र त्याचा अर्थ लागत
नाही
निर्माता म्हणतोय
गाण्यातून गाण्यात इनवेस्ट
केलेला अर्थ
प्राप्त व्हायला हवा
आपली ''गुड अर्थ '' हलायला हवी
बाकी अर्थ-बिर्थ निघाला
निघाला
नाही निघाला नाही निघाला
आपणाला कुठ ऑस्करला जायचय ?
मी बहिरा होतोय
मी ठार बहिरा होत गातोय
साऊ न्ड रेकॉरडीस्ट म्हणतोय
''हिट साहेब लय हिट
पब्लिक डोक्यावर घेणार ''
श्रीधर तिळवे -नाईक
( क .
व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )
खरखर /श्रीधर तिळवे
१८
ग्राविटीज डिसलोकेट
करून
आत्मविश्वास बलाढ्यतेत
उडतोय
चांगले आणि वाईट
दोघेही नक्कलच करतायत
ट्रेण्डसची
मी मेमरीजही ट्रान्झीटरी करतोय
अर्थाशिवायही शब्द
उडवता येतो
फक्त अभिनयात विश्वास हवा
मिडीयात माझी वर्णने
आहेत
ही फोटोवरील खरखर व्हिडीओत
काय खाजवतीये ?
श्रीधर तिळवे -नाईक
1.1 ( क .
व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )
सेट /श्रीधर
तिळवे
१९
प्रोप्स जांभया देतायत
शरीराच्या प्रत्येक modelled कॉर्नरवर
चान्स मोल्ड होतायत
कल्पनेचा त्याग केला तरी
fashion प्रोजेक्शन काल्पनिक
मी ramps चा
मांजरात लिलाव करतोय
कुणीतरी कॅटवॉक करत येईलच
येईल .
श्रीधर तिळवे -नाईक
(क. व्ही . २ ह्या आगामी काव्यसंग्रहातून )
चिमणी /श्रीधर तिळवे
२०
नाव म्हणजे मी न्हवे
इतकं शहाणपणही दुर्मिळ होत
चाललय
आकलनाचे कण
मेंदूपासून वेगळे होतायत
शहाणपण माहितीचा भुसा भरून
मँनिफ़ेस्टेशनवर लटकतय
एक चिमणी रोज तयार होतीये
शुभशकुन घेतल्यासारखी घरट
बांधायला
मोबॊइल वाजतोय
आणि ती त्याच्यात मरून
पडतीये
श्रीधर तिळवे -नाईक
(क व्ही २ ह्या अप्रकाशित
कवितासंग्रहातून )
अपेक्षा /श्रीधर तिळवे
२१
लोक अतिस्वतंत्र झाले कि
वाद म्हणून भांडायला लागतात
लोक अतिगुलाम झाले कि
वाद म्हणून बंड उभारतात
मी ना अतिस्वतंत्र ना अतिगुलाम
विविधतेचा मला सराव आहे
आणि ते जे आहे
त्याला ठाव आहे
जे ठाऊक ते घाऊक
जे ठाऊक नाही ते किरकोळीला MALL काढून
देत
मला मेमरीचा
एनसायक्लोपीडीया फ्री करायचा नाहीये
फक्त कवितेसाठी अवेलेबल
होणारे SOFT पेज
निर्विकार कोरे असावे
एवढीच अपेक्षा
ह्या गुरुत्वमध्यात आहे
श्रीधर
तिळवे -नाईक
(क व्ही २
ह्या आगामी अप्रकाशित काव्यसंग्रहातून )
२२ त्यांनाही माहित नाही / श्रीधर
तिळवे
माझ्या जीन्सचे हे natural कलेक्शन
रिअल पव्हिलिअनचे फोटोस्टील
वाजवतंय
फुलांनी तोंड बंद केलेल्या
म्युझिकल नोटस अवगत करत
कृष्णवर्णीय त्रीमितीयता
डिझाईनमधून प्रकट करतीये
सूर्यातही अस्तित्वात
असलेली वजनदार स्पेस
क्लास्सिकल मिनीएचर्सही
समकालीन होतायत
फोटोशोप्पिकल
टाटूइफेक्ट्समध्ये
माझे पोर्ट्रेट माझ्यापासून
सुरु होते
पण माझ्यापाशी संपत नाही
डीजीटूल्स त्याला वाढीव
सोंदर्य पुरवून
डीस्पोज करतायत प्रतिसेकंद
साठच्या स्पीडने
रोमांटिक स्वभावाची झाडे
शुभ्र शंखातून सौष्ठव
फुन्क्तायात
मात्र ते त्यांच्या
भावनांचे आत्मचरित्र असेलच असे नाही
एक इन्स्टालेश्नर आपल्या
आईला
installation म्हणून सादर करतोय
माझ्या कार्सची चाकं
रस्त्यावरून कविता लिहित धावतायत
माझ्या स्वीम्मिंग tank मध्ये
माझी गर्लफ्रेंड प्रत्यक्ष पोहतीये
कि पोहण्याचा अभिनय करतीये
हे सांगणे कठीण आहे
हवेने कंट्रोल केलेला माझा
श्वास
माझ्या फुफ्फुसाचे
डीजीशिल्प बनवतोय
एक सब्लाइम grand सौंदर्य
डोळ्यातून विजा कडाडवत
शांतीचे बनावट मूग गिळत
गप्प बसतय
मी ह्या जगण्यात आनंदी आहे
कि दु;खी
हे मला ठरवता येत नाहीये
मी उत्सव साजरा करायला
सर्वांनाच बोलवलय
आणि प्रत्येकजण डिझायनर्स
कपडे घालण्यासाठी
शहरातल्या डिझायनर्सना कॉल
करतोय
त्यांनाही माहित नाही
उत्सव साजरा करताना
ते आनंदी असणार आहेत कि दु
: खी ?
श्रीधर तिळवे -नाईक
(क व्ही २ ह्या
अप्रकाशित कविता संग्रहातून )
२३
समोर आपल्या नावाने /श्रीधर तिळवे
क्रिमिनल अंतरावर उभय यश
आयडीयाlogy गुन्हेगारी
चेहरा करून
समोर अंगठे धरून उभी
दु:स्वप्ने रचून रचून
शिणून गेलेले शतक
स्व:ताच रक्तही बनावट
असल्याचा
संशयकल्लोळ
अधूनमधून काळजाच्या फेक
गल्लीत
चकाचक चेक वाटले गेले
अर्थांचे
पण authenticity वटवायला
गेलो
तर सही अत्तरासारखी उडून
गेलेली
A T M unlock करून
कॅश घेऊन पळाला सिक्युरिटी
गार्डनर
समोर आपल्या नावाने फक्त एक
कागदी फूल
With Love
And With God's Grace
श्रीधर तिळवे -नाईक
No comments:
Post a Comment