४० मुक्ति /श्रीधर तिळवे -नाईक
माझ्यात कितीही मी असतील
माझा देह जोवर एक आहे
तोवर एकसंध मी सत्य आहे
मी माझा फायनल ड्राफ्ट नाही
मी जनुकीय जालाचे केवळ उद्घाटन आहे
हे दुकान कितीकाळ चालणार मला माहित नाही
माझे इंटेरियर ' सुपरसिमेट्रीचे मूळ ' आहे
मी त्या झाडाचा इक्वेलीब्रीयम आहे
ज्याची स्पिरिच्युअल पॉंसिबिलीटी फळ आहे
जे खाऊन मी ईश्वर बनवणार आहे
ह्या रेसीपीचे मी फक्त मटेरियल आहे
आणि तुम्ही मला विचारताय
रियल म्हणजे काय
ईश्वर तयार होतोय
पण त्याला तुम्ही ओळखू शकणार नाही
कारण तो मी नाहीये
तो माझ्यापासून तयार होतोय
श्रीधर तिळवे -नाईक
(क व्ही २ ह्या काव्यफायलीतून )
No comments:
Post a Comment