Tuesday, June 23, 2015

३८ वाऱ्यावरती विरून गेलेल्या विराण्या /श्रीधर तिळवे 


वाऱ्यावरती विरून गेलेल्या विराण्या

बासरी डिजिटल
कॅसिओत अंग जप्त झाले तरी श्वास फुन्कणारी

कॉम्पुटरमध्ये यैसपैस म्हस आणि रेडा

जंगल मे मंगल और डिजिटलमे दंगल

त्वचा सोलून दिली तर देताना स्क्रीन झाली

गंगेत घोडं न्हायील म्हणे तोवर गंगा बिस्लरीत पळालेली

VIRTUAL होता आलं नाही
विज्युअल होता आलं नाही
झालो काय तर विजुअलच्या पल्याडच्या ढगाला हात लावणारा कवी

रसिक पण असे कि कवितेतही चित्रपट आणि टीव्ही मालिका शोधणारे

दोस्त तर महानालायक
माझी मुळे खाऊन जागतिक फळे खाणारे

आता ह्या शिल्लक असलेल्या एकांताच्या मैदानावर
 विकेट उडायची वाट बघतोय तर
मृत्यू बॉल न टाकता
नेट PRACTICE साठी यमाकडे चाललेला

त्याला बहुधा कळून चुकलय
साध्या पाशाने काम होणार नाही
संपूर्ण नेटवर्क आवळावे  लागेल .

श्रीधर तिळवे -नाईक
(कव्ही २ ह्या काव्य फायलीतून )




No comments:

Post a Comment