३५ वेग / श्रीधर तिळवे
निसर्गाने प्राण पुरवला
विश्वाने उर्जा
सृष्टीने मटेरीअल दिले
प्रतिसृष्टीने structure
आता चिन्ह्सृष्टी घेऊन येतीये
चिन्हवेग आणि चिन्हगति
जो फास्ट तो फस्ट
जो स्लो तो लास्ट
आता फक्त वेगायचे
वेगात बसून धावायचे
वेग देत धावायचे
वेगायचे
माझ्यात वेगाचा ब्लास्ट झालाय
आणि माझे सर्वच तुकडे फक्त वेगतायत
मृत्यू येईल
तेव्हाच एकसंध होतील
तोवर आहेतच
वेगाची आवेगी निशाचरे
आणि काळजात तीव्रतेची बिअर !
श्रीधर तिळवे -नाईक
(क व्ही २ ह्या काव्यफाइलीतून )
No comments:
Post a Comment