२८
समतोल /श्रीधर तिळवे
फेसबुक , आर्कूट ,ट्वीटर आणि मी
काहीच फरक नाही
वाचायचे काचायचे टाचायचे
फेक व्हायचे फेकायचे
मश्रुमच्या माश्या होतायत म्हणून
डंख ओरीजनल होणार आहेत का ?
मध रियल होणार आहेत का ?
hackersनी आयुष्य क्लेम केलय
ही विटम्बना कि कीर्तीमहाल ?
डिजिटल स्फोट मांसल होतायत
आणि डोळे त्यांना बांधून घेत
मेंदूला सेल्फ madness मध्ये उडवतायत
सर्वत्र माझीही आयडी फेक
ही मडोनाची disorder नाही
स्पेकट्रमचा कॉम्प्लेक्स ब्रेनbalance आहे
श्रीधर तिळवे -नाईक
(आगामी क व्ही २ ह्या काव्यसंग्रहातून )
No comments:
Post a Comment