Sunday, June 7, 2015

ग्राफीटी 

२६
कविंनी ग्राफिटी लिहायला सुरवात केलीये 

व्यक्तिमत्वे सुलभ शौचालायासारखी झालीयेत का ?

भिंती स्लिक होतायत 
द WALL होतायत 

शेवटी कविंची इज्जत करायला हवी 

लेखणी स्विंग होतीये 
सिगरेट आणि कॉफ्फी दरम्यान 

साखरेचे शुगरफ्री क्यूब 
आणि लिक्विड मिठाची शाही ट्यूब 

इथेही वाचक नसल्याने 
कवी फक्त नाश्ता करतायत 

वॉलवरची स्वनिर्मित ग्राफिटी 

मला संशय आहे 
ते आंधळे आहेत 

किंवा 

ही वॉल  चालवत चालवत 
ते थेट चांगदेवापर्यंत पोहचणार आहेत 

श्रीधर तिळवे -नाईक 
(आगामी क . व्ही २ मधून )

No comments:

Post a Comment