Sunday, December 6, 2015

प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग


माणूस इथे लागतो श्रीधर तिळवे -नाईक


चालण्यास बोलण्यास  माणूस इथे लागतो 
सुरवातिस शिकावयास  माणूस इथे लागतो 


एकट्याने जन्मलास एकट्याने मरशीलही 
पण मध्ये जगावयास माणूस इथे लागतो 

येताना शून्य होतास जाताना शून्य असशील 
पण बोटे मोजावयास माणूस इथे लागतो 

अन्न वस्त्र निवारा एकट्याने कसा निर्मशील 
संन्यास निभावयास  माणूस इथे लागतो

गेला जो शून्यात तो समाजात परतला 
नवा धम्म सांगावयास  माणूस इथे लागतो 

श्रीधर तिळवे नाईक 
 (डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून ) 


No comments:

Post a Comment