४४ डायनोसोर श्रीधर तिळवे नाईक
अर्धा सांगाडाअर्धा डिजिटल
प्रत्यक्ष जो मी पाहिलेलाच नाही
अवतरतोय
बीट बाय बीट
तो आरश्यात आहे कि नाही
कि मी आरश्यात आहे
कि आम्ही दोघेही महाआरश्यात आहोत ?
तो मला घाबरवतो
पण माझ्या आतील घबराव
डिजिटल आहे
तो काल्पनिक झाडांच्या झुंडीतून मुसंडी मारत
माझ्या डोळ्यावर येतोय
आणि मी माझा डिलीटवरचा सायबरी हात
फिक्शनल बोटांनी रिअलाईज करत
तोलतोय
हायपरसेन्सिटीविटीची कपाटे उघडली जातायत
आणि त्यांच्या तील आरसे मेकप करत
माझ्या डोळ्यावर चालून आलेल्या त्यावर
माझ्या कलेक्टीव BODIES क्लिक करतायत
तो अर्थपूर्ण आहे कि नाही
मला माहित नाही
पण तो माझ्या इलाक्यात आहे
हे निश्चित
तो अंडी घालतोय
आणि माझ्या बुबुळातील ऑम्लेट बनवणाऱ्या वर्च्युअल तव्याला
हे निश्चित करता येत नाहीये कि
हि अंडी डिजिटल कि रिअल ?
अंडी फुटतायत BLACK MATTER भर
आणि मी पळून चाललोय
हे निश्चित करण्यासाठी
कि ही पिल्लं डिजिटल अंड्यांची रिअल निर्मिती आहे
कि रिअल अंड्यांची डिजिटल
कि रिअलची रिअल
कि डिजिटलची डिजिटल
मी पळतोय
आणि त्यांनी सुरु केलेला माझा पाठलाग
माझ्या रिअल पाठीवर डिजिटली आदळतोय
श्रीधर तिळवे नाईक
( क . व्ही . २ ह्या अप्रकाशित कवितासंग्रहातून )
No comments:
Post a Comment