Monday, August 31, 2015

समस्या - श्रीधर तिळवे naik
जो मेलाय
तो मला मारतोय

जो माणूस म्हणून जन्मलाच नाही '
जो आयुष्यभर केवळ जनावर राहिला
तो मला माणूस म्हणून मारतोय

त्याला वाटतय कि तो काहीतरी दैवी करतोय
त्याला माहित नाही
त्याच्या हातातील हथियार
हे त्याच्यातील जनावराचा पाचवा पाय आहे

हे अज्ञान आहे
जे हिंसेचे मूळ आहे
आणि हे एल्सेटरा
त्या महान जनावरांचे गुलाम आहे
ज्यांच्याजवळ  विचार आहे विवेक नाही

विवेक मरतोय
आणि मरताना त्याला कळत नाहीये
ह्या जनावर आणि विचार ह्या कॉम्बोचे काय करायचे ?

श्रीधर तिळवे नाईक
(डेकॅथलोन एलसेtra ह्या काव्यफायलीतून   )

No comments:

Post a Comment