प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
कुणी सांगितले पीत होता भोळा शंकर प्रचंड भांग
हे एक गॉसीप आहे पिकवलेले पद्धतशीर छान
शिवाचे दुसरे नाव आहे वैद्येश्वर आहे का माहित
शिव उत्तम वैद्य होता मेडिकल सायन्सचा पाईक
ह्या काळात ऑपरेशनसाठी नव्हता उपलब्ध अनेस्थेशिया
शिवाने भांग शोधून वापरली करून तिचा अनेस्थेशिया
आयुष्यात कधी प्याला नाही चिमुटभर शिव भांग
त्याच्या नावे फाडू नका बिले भांगेसाठी नका लावू रांग
होळीमध्ये करायची असते अवगुणांची आपल्या होळी
व्यसने सारी सोडायची असतात शुद्ध करायची देहझोळी
सोडण्याऐवजी व्यसने पकडता हातात घेता भांगेचा पेला
हा तर शिवाचा अपमान आहे केलेला म्हणवून घेत चेला
आत्ताच फेका नाहीतर श्रीधरला होळीत तुमच्या बोलवू नका
अलख निरंजन म्हणत श्रीधरने जैन गल्लीचा सोडला नाका
श्रीधर तिळवे -नाईक
(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )
No comments:
Post a Comment