प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
१४ शैव धम्म :अध्यात्म
शैवांचे अध्यात्म सांगतो आहे श्रीधर
तू कान कर उघडा मेंदूस अनबायस कर
पहिली पायरी तिला म्हणतात 'मलीन '
झाला आहेस मळाने अंतर्बाह्य हीन
ज्ञानमळ क्रियामळ भावमळ असोशीमळ
त्यांनीच झाकली आहे कैवल्याची कळ
काढण्यासाठी मळ आहे पायरी दोन
म्हणतात शैव लोक गड्या तिला ''नलीन ''
लीन नको होऊस तू ह्या समाजापुढे
समाजामुळेच अडते अध्यात्माचे घोडे
समाज म्हणेल असत्य करेल तुला मालामाल
तू मात्र जीवनात सत्याची पकड चाल
समाज म्हणेल जगण्यास आवश्यक हिंसा
उपाशी मर पण तू पाळ तत्व अहिंसा
समाज म्हणेल प्राप्तीस कर तू प्रमाद
क्राइम करशील तर होईल तुझा प्रासाद
तू मात्र कायम पाळ मेंदूत अप्रमाद
चंगळीचा चॉइस येईल घालत वाद
समाज म्हणेल तुला सेक्स कर भरपूर
तू मात्र आवश्यक तेव्हाच जाळ कापूर
फास्ट सक्सेससाठी समाज म्हणेल चोरी
तू मात्र श्रमाचीच खा तुझ्या भाकरी
समाज म्हणेल तुला खूप संपत्ती जमव
तू संपत्ती कमव पण अलिप्तता ठेव
मोह मद माया वाढवतात आत मळ
समाज सदा पुरवतो त्या मळास चळ
समाजाच्या चळापुढे होऊ नको तू लीन
मळापासून मुक्त हो हीच पायरी ''नलीन ''
कणाहीनही वाईट आणि अहंकारही वाईट
समतोल साधण्यासाठी कर स्वत : शी फाईट
चांगुलपणाचाही स्वस चढतो माज
म्हणूनच तिसरीचे येते कामकाज
तिसरी पायरी येते नाव तिचे ''शालीन''
चांगुलपणातही तुझ्या वाजो वीणा क्लीन
कणाहीन नको जगू पण असू दे नम्रता
कुणाचीच घृणा नको सर्वांसाठी करुणा चौथी पायरी तू हो कैवल्यकुलीन
आतुन बाहेरून एकदम क्लीन
दररोज करावे शुद्धतम स्नान
काढून टाकावी अंगावरील घाण
सूर्याला करावे पहिले नमन
पाण्याला करावे दुसरे नमन
सूर्यामुळे तुला सर्व काही दिसते
डोळ्याचे तुझ्या पाऊल पुढे पडते
सूर्यामुळेच ढग होतात तैय्यार
त्यांच्यामुळे मिळतो पाऊस अपार
सूर्यामुळे तुझे वाळतात कपडे
अंग राहिले असते नाहीतर नागडे
सूर्यामुळेच वनस्पती जगतात
त्यांच्यावरच सर्व प्राणी तगतात
पाण्यामुळेच तुझी भागते तहान
वनस्पती रोज करतात जलपान
तुझ्या शरीरात सत्तर टक्के पाणी
शरीरात पाडते रक्ताची नाणी
रक्ताच्या इंधनावर देहगाडी चालते
मेंदुची बॉडी रक्तामुळे हालते
वायु पुरवतो तुला ऑक्सिजन
त्यामुळेच सर्व जगतात जन
पृथ्वीमुळे सर्वत्र उगवते अन्न
तिच्यामुळेच तुला आधार दणण
तू तिचा पुत्र वा तू तिची कन्या
तीच आपली आई वा आपली अम्मा
पाचवे नमन कर तू आकाशास
तेच तोलून धरते सर्व अधांतरास
त्याच्यातून लहरी होतात पास
त्याच्यातून शब्दनाद करतात प्रवास
तू जो आहेस तो ह्यांच्यामुळे आहेस
ह्यांच्यामुळे आहे आयुष्याला बेस
कृतज्ञता दाखव आणि कर नमस्कार
कैवल्य कुलीन होण्याचा हाच एक आकार
पांचवी पायरीही महत्वाची आहे
म्हणतात ''तल्लीन '' ती आतून वाहे
मलीन , नलीन , शालीन अन कैवल्यकुलीन
पायऱ्या पूर्ण करून तू हो तल्लीन
आत्तापर्यंत होते सर्व काही बाहेर
देहाच्या आत आता पहायचे चौफेर
नाकाची दोन डोळ्याची दोन कानाची दोन
तोंडाचे एक मलविसर्जनाचे एक एक लिंगाचा कोन
नऊ ही दारे दहावे दार आज्ञाचक्र
दहावे थेट शिवाकडे नऊ मात्र वक्र
नऊच्या नऊ दारे टाक करून बंद
इथून पुढे शोधायचा आतला आनंद
दा र बंद करण्याकरता स्थिर कर आसन
नाकाग्रावर केंद्रीभूत कर देहस्पंदन
सर्वच इंद्रियावर कठोर संयम साध
कुठल्याच गोष्टीस नको बनवू व्यसन वा नाद
प्रत्येक अवयवावर आता हवा संयम
देहावरती हवे तुझे संपूर्ण नियंत्रण
आता सोड अवयव पकड छोटे बिंदू
मन तुझे फोकस कर तूच हो तू स्पंदू
स्पन्दुसोबत थांब मग सिंधुसारखा वहा
त्याचा कर आरसा त्यात ओम पहा
मग एकेका चक्रावर मन कर एकाग्र
पाठीचा कणा बाण कर प्राणाचे बनव अग्र
एकेका चक्रातून प्राण वर पूर्ण खेंच
साधना सोडू नको वाटेत कदाचित लागेल ठेंच
प्राणाशी संपूर्ण होऊन जा तल्लीन
मळ सारे दूर होतील निघून जाईल मलीन
शेवटची पायरी नाव तिचे ''विलीन''
प्राणाला करायचे कैवल्यात विलीन
पाठीचा कणा कर चैतन्यात जिवंत
शिवाक्षास धडकत रहा बनेपर्यंत महंत
रोज प्रयत्न करत जा एक दिवस होईल स्फोट
अंगातून आनंद्लोट उठतील कडेलोट
जेव्हा तू होशील कैव्ल्यात नाहीसा
अमृताच्या पावसात होशील शून्यसा
जा आता साधनेला जाऊन सुरवात कर
अलख निरंजन म्हणून निरोप घेतो श्रीधर
श्रीधर तिळवे -नाईक
No comments:
Post a Comment