Thursday, October 8, 2015

माझ्या आयुष्यातला  कोल्हापूरमधला  कालखंड  हा आता  प्राचीन वाटायला लागला म्हणूनच ह्या कालखंडात  लिहलेल्या कवितांना मी  प्राचीन  कविता असे नाव द्यायला  सुरवात केलीये डे कॅथलोन सिरीज मध्ये  मी ह्या सर्व कविता टाकायला सुरवात  केलीये . गमतीची गोष्ट अशी कि अनेकांना  ह्या कविता जास्त आवडतात.  हे चांगले कि वाईट हे ठरवणे कठीण आहे कारण हे कवी म्हणून माझे यश आहे कि समाज बदलला तरी वाचकाची संवेदनशीलता बदलली नसल्याचे ते लक्षण आहे कि  समाज बदललेलाच  नाही  कि माणूस  बदलत  नसल्याने हे घडते  ? जेव्हा जेव्हा कुणी ह्या कालखंडातील माझी कविता आवडली असे सांगतो तेव्हा तेव्हा हे प्रश्न मला पडतात .
श्रीधर तिळवे

No comments:

Post a Comment