Tuesday, October 13, 2015

प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभागश्रीधर तिळवे -नाईक

१० सनातन 
वैदिकांचे सनातन माठ 
आदळतात सतराशे  साठ 

डोक्यावर बनून कर्मठ 
कायम आखत नवे कट 

पसरवतात कल्पित  गोष्टी 
दहशत, थापा आणि भीती 

बुडवतात भाबडे लोक 
ह्यांचे लबाड ठोक टोक 

म्हणती जगास वेद पाजवा 
चहु खंडात वेद गाजवा 

ब्राह्मण्याची  भारतभर शेंडी 
भल्याभल्यांना बनवते मंडी 

ह्यांच्या नादी नको लागू 
मुर्खासारखे  नको वागू 

ह्यांना कधी शिव ना   कळला 
मार्केटसाठी शिव वापरला 

शैवांनो ह्यांच्यापासून सावध 
शिव धम्माचा करतील वध 

सावधपणाची बोंब जगभर 
मारत निघाला सर्वत्र श्रीधर 

श्रीधर तिळवे -नाईक

(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )

No comments:

Post a Comment