प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
११ सनातनी ब्राह्मण्यधारकांनो
सनातनी ब्राह्मण्यधारकांनो केलात शैवधम्म भ्रष्ट
म्हणूनच पुन्हा एकदा सांगतो आहे स्पष्ट
तुम्ही sponsor केलेला शिव नाही मानत
शिवाशिव तुमची आम्ही नाही पाळत
वर्ण जाती ब्राह्मणग्रंथ आमच्यासाठी शत्रू
वेद स्मृती पुराणे नाहीत आमचे पितृ
आगमाच्या अंगाने जाते आमचे अंग
रक्तातून उठतात आगमांचे तरंग
महावीर आणि बुद्ध आमचे धाकटे भाऊ
त्यांनाही काळजाने लिहू आणि गाऊ
तुमच्या सगळ्या बंद्या नीच आणि हलकट
आम्ही मुक्त आम्हास नको त्यांची कटकट
बघा जमेल तर तुम्ही द्या त्यांना फेकून
दास करतो तोही जातो दास बनून
कधीतरी मुक्तीचा आंबा चाखा हापूस
अजून किती शतके रक्ताचा पिणार ज्यूस
स्वत : च्या पायावर पाडून स्वत : च धोंडे
स्वत : च्या हातांना घालून कड्या कोयंडे
किती काळ बसणार थोडेतरी चाला
हत्ती गेले पुढे निदान मेंदूत तरी हला
श्रीधर तिळवे -नाईक
(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )
No comments:
Post a Comment