प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
पन्ढरपुरातून ४ वैदिक शैव ब्राह्मणासाठी
जे ब्राह्मण शैव झाले त्यांना नाही माझा विरोध
त्यांचे धाडस मानले पाहिजे आत जाऊन घेतला शोध
त्यांच्या मुळेच ब्राह्मण्याचे कर्मठ टाके झाले सैल
महाभारत पुराणांनी पुढे न्हेला वैदिक बैल
शिवभक्त श्रीकृष्णाचा त्यांच्यामुळेच झाला हरी
वैदिक , ब्राह्मण धर्मात झाली मोक्ष ज्ञानाची खुली बासरी
वैदिक ,ब्राह्मण केले ढिले शैवांना थोडे केले ब्राह्मणी
वैष्णव आगम मांडून त्यांनी चालवली शैव नाणी
वेद उच्च वर्णासाठी आगम सर्वास खुले policy
वेद सर्वांस देण्याचे न धाडस हे धोरण म्हणावे कि चापलुसी
आगम स्वीकारून ब्राह्मण्य न सुटे मग कसे शैव म्हणावे ?
मोक्षास शिव मात्र धर्म वैदिक डबल standard कसे सहावे ?
त्यापेक्षा बरे जर ब्राह्मण्याचा असता केला संपूर्ण त्याग
जातीवर्ण व्यवस्थेस लावता आली असती भारतभर आग
सोशली तडजोड स्पिरिच्युअलि अजोड अशा बांधकामाचे करायचे काय
लकुलीश , कश्मीरी , शैव विशिष्टाद्वैत ,सिद्धांत शैवमत सारेच नाकारून उभे करतोय पाय
माझेच शैव दर्शन उभे करीन मी मीच ठेवेन शिव जसा होता खरा तसा
आता तर मेंदू होता माझा कासव ताबडतोब झाला जागृत ससा
श्रीधर तिळवे -नाईक
(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )
No comments:
Post a Comment