संतोष पवार , सरंजामी देशी कसे झाले असं तू विचारतोयस पण वस्तुस्थिती अशी आहे कि सरंजामवाद्यानीच नेमाड पंथी देशीवाद जन्माला घातला आहे अन्यथा पूर्वी कृषी संस्कृती कृषी संस्कृती म्हणूनच साहित्यात येत होती . नामदेव तुकारामांना देशिवादाची गरज नाही लागली फक्त प्राकृत पुरली मराठी भाषा ही त्यांच्या दृष्टीने प्राकृत भाषा आहे देशी न्हवे . वसाहतवादानंतर इंग्लिश आणि वर्नाक्युलर असा संघर्ष निर्माण झाला आणि स्वातंत्र्यानंतर १९६० नंतर शरद पवार , पतंगराव कदम असे नवे सरंजामी नेतृत्व उदयाला आले ह्या नव्या नेतृत्वाला इंग्लिश नेतृत्व नको होते आणि अर्बन ही ! हे नेहरू घराण्याला दिल्लीचे नवे मुघल घराणे मानत त्याला मुजरा करत आणि इकडे आपली नवी सरंजामशाही चालवत आणि ती आपल्याच वारसदाराकडे राहील ह्याची काळजीही घेत . ह्यांचा सरंजामवाद कळलेला बहुजन समाज शिवाजीची प्रतीक्षाच करत होता आणि नव्या मावळ्यासकट शिवसेना आली आणि बाळासाहेब ठाकरे नवे शिवाजी म्हणून उदयाला आले . वास्तविक ठाकरे नवे शिवाजी न्हवतेच ते पेशवे होते त्यामुळेच मराठी जनता दोन्ही बाजूंनी नाडली गेली . तिला शिवाजी महाराज हवे आहेत आणि शिवाजी महाराज येत नाहीयेत . एकीकडे सरंजामदार आणि दुसरीकडे पेशवे अशी त्याची गोची आहे . नेमाडे हे साहित्यातले बाळासाहेब ठाकरे आहेत आणि त्यांची देशीवादी सेना ही साहित्यातील शिवसेना आहे . त्यांची भाजपशी छुपी युती आहे . ती सहजासहजी दिसत नाही कारण ती शिवसेनेप्रमाणे अधूनमधून भाजपवर टीका करते . ग्रामीण भागातले अनेकजण शिवसैनिक बनले तसे अनेक गावातले अनेक बहुजन देशीवादी बनलेत त्यांना त्यातला धोका आज ना उद्या कळेलच .
(संतोष पवार ह्यांच्या प्रश्नाला उत्तर )
(संतोष पवार ह्यांच्या प्रश्नाला उत्तर )
No comments:
Post a Comment