मी शैव धम्मावर प्राचीन काळी लिहलेल्या कविता प्रकाशित करू लागल्यावर आमच्या काही मित्रांना विचित्र वाटू लागले आहे म्हणून ही पोस्ट . प्रत्येक माणसाला त्याच्या घरातून एक वारसा मिळत असतो . मी शैव परंपरेत जन्मलो आणि वाढलो त्यामुळे माझ्या पहिल्या अध्यात्मिक कविता ह्या शैव आहेत . मराठीत शैव परंपरा जवळ जवळ नाहीच आणि साठोत्तरीत तर वैष्णव प्रचंड . माझ्या ह्या शैव कविता काहीश्या रॉ आहेत आणि त्या कुठल्याही कॅटेगरीत म्हणजे वैष्णव कॅटेगरीत बसत नाहीत . पुढे मी जैन आणि बौध्द धम्माकडे वळलो आणि ह्या धम्माच्या अंगाने लिहिलेल्या कविता डेकॅथलॉन : ट्रान्सरीअल ह्या माझ्या प्रकाशित संग्रहामध्ये आल्या आहेत . मराठीत दलित साहित्यामुळे बौध्द कॅटेगरी ही प्रस्थापित कॅटेगरी झाली आहे . आश्चर्यकारकरित्या शैव अजूनही अनकॅटेगरीकल आहे पुढे माझी अध्यात्मिक वाटचाल ह्या सगळ्यांना ओलांडून गेली .
ह्या कविता आरामात प्रकाशित करायच्या होत्या कारण त्या डेकॅथलॉनच्या सिरीजमध्ये कुठे टाकाव्यात हेच कळत न्हवते पण अचानक सनातनचा प्रभाव वाढायला लागला आणि अडगळीत पडलेल्या ह्या कविता अचानक रीलेवन्ट वाटायला लागल्या म्हणून त्या फेसबुकवर टाकायला सुरवात केली .
अनेक कविंनी पुरस्कार परत करून प्रतिक्रिया दिली मी ह्या कविता टाकून ! शेवटी ज्याची त्याची पद्धत असते . जेव्हा समकालीन लोकांची प्रतिकाराची पद्धत तुम्हाला पटत नसते तेव्हा त्या पद्धतीवर टीका करणे म्हणजे परिवर्तनवादाला मागे खेचणे असते . त्या ऐवजी दुसरी पर्यायी पद्धत तुम्ही शोधू शकता . शैव कविता ही माझी पर्यायी पद्धत आहे .

No comments:
Post a Comment