Monday, November 9, 2015

बगळेपंची  -श्रीधर तिळवे 

उदासीचा काळा बगळा 
उभा सगळ्याच्या सगळा 

उडावा अन  निघून जावा 
आनंदाचा वाजावा पावा 

पण पावा वाजत नाही 
बगळा  काही उडत नाही 

सरोवर पडत चाल्ले  काळे 
भक्ती तुझी वाटतीये चाळे 

दु :खविभोर कठीण गाठ 
अभ्यासक्रम तीला पाठ 

सवयीने येते दाटून 
काळिज माझे जाते फाटुन 

काळा बगळा आधिक काळा 
राजहंसाच्या स्वप्नी माळा 

हे असेच असेच राहणार 
मी काळ्या बगळ्यात मरणार 

बगळेपंची झाली बोलुन 
तू अंगणात कुलपे खोलून 

श्रीधर तिळवे नाईक 





No comments:

Post a Comment