प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग/ श्रीधर तिळवे -नाईक
शैव कोण ?
लकुलीश नाही माझे मूळ
मी शैव समूळच्या समूळ
त्याने पाशुपत केला बामणी
माझा शिव सर्वांच्या मनी
वेदात टाकून त्याने केला घोळ
मी टोळभैरव भैरवांचा टोळ
कुणीही यावे घ्यावी दीक्षा
शैव होण्यास नको प्रतीक्षा
ब्राह्मणघोळ घालवावेत
अहंकाराचे दिवे मालवावेत
आपण आपलाच दिवा पेटवावा
काळजास प्रत्येक जीव लावावा
वर्ण , धर्म , जात काही न पहावे
माणसास फक्त माणूस म्हणून पहावे
म्हणा हर हर हर हर महादेव
जो सगळ्यांचा तोच खरा शैव
श्रीधर तिळवे -नाईक
(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )
No comments:
Post a Comment