Thursday, November 5, 2015

प्राचीन कविता/ डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभागश्रीधर तिळवे -नाईक

सुवासासाठी  (दुर्वासासाठी )एक कविता 


सुवासा , तुला केला संतापाचा आखाडा
खरेतर ब्राह्मण्याशी केला होतास बखेडा

तीन पुत्रांना तू  दिल्या तीन शिव अवस्था
ज्याच्या त्याच्या कलाने स्वीकारायची  व्यवस्था

त्र्यम्ब्काला दिलेस अद्वैत अमर्द्काला अन द्वैत
श्रीनाथाला शिकवलेस शिवशक्ती द्वैताद्वैत

त्याची कॉपी मारून शेवटी वेदी वेदांत जन्मला
मायापिसारा फुलवून मोर निष्क्रियतेचा नाचला

निष्क्रीयतेने मजबूत केली जातीक्रिया कायमची
पिण्याऐवजी समुद्र बसले तीर्थात जाऊन अगस्ती

शंकराचार्य रामानुजाचार्य वल्लभाचार्य मध्वाचार्य
मुस्लिम चालून आले तेव्हा उरले ना कुणात वीर्य

तुझ्यासारखा हवा होता संताप लढण्यासाठी
ह्यांच्या हाती फक्त वेद कपाळावर सूक्ष्म आठी

आगमकांची वीर्यनाश होऊन देवळे गळपटली
हे नालायक विष्णुसाठी ह्यांची गुडी धडपडली

बुद्ध गेला , महावीर गेला , मुळचा शिवशंकर  गेला
मुस्लिम आणि वैष्ण्वांच्यात आगमांचा चेहरा मेला

सर्वच देश झाला वैष्णव शैव बनून गेले शव
मोजू लागले अवतारांचे मासे डुक्कर अन कासव

हाईट म्हणजे जे  देत होते कर्मठवादी झोके
मुस्लिम राजापुढे ह्यांचे  वाकू लागले  डोके

रामायण महाभारत दंतकथांची कवळी बसली
मनुस्मृतीच्या बोळक्या तोंडात संस्कृति फसफसली

सॉलिड ना पचले तर चालू करतील लिक्विड डायट
शंकराचार्यांपुढे  बसतील रोज  काम अन्ड क्वायट

मला थोडा संताप दे मलाही बनू दे रागीट
घेतो काढून पायाखालची नपुंसक वैदिक वीट


श्रीधर तिळवे -नाईक

(डेकॅथलॉन -अनकॅटेगरीकल /मंत्र विभाग ह्या काव्यफायलीतून )









No comments:

Post a Comment